Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

राज्यातील या जिल्ह्यात दिवाळी सुटयांच्या तारखा जाहीर

Diwali School Holiday 2026

Diwali School Holiday 2026: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील दिवाळी सुट्ट्या आता जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच सांगली, परभणी, नांदेड, बुलढाणा, पुणे, यवतमाळ,जालना आणि लातूर जिल्हा परिषदेकडून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्टीबाबत महत्त्वाचे पत्र जारी करण्यात आले आहे. सुट्टी बाबतचे सर्व शासन परिपत्रक PDF लिंक या लेखात दिलेली आहे.

या आदेशानुसार विद्यार्थ्यांना दिवाळीच्या २० दिवसांची सुट्टी मिळणार असून, शाळा पुन्हा सुरू होण्याची तारीखही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी खालील वेळापत्रकाची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे.

दिवाळी सुट्टी परिपत्रक सांगली 2026

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांमध्ये अंशतः बदल करणेबाबतचे सुधारित परिपत्रक सांगली जिल्हा परिषदेकडून जारी करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासन निर्णयानुसार सार्वजनिक व इतर सुट्टया निश्चित करण्यात आलेले आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिपावली सुट्टी दि.०२ नोव्हेंबर २०२६ ते दि.१४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत यापूर्वी जाहीर करणेत आलेली होती. तथापि दिपावली सुट्टीमध्ये खालीलप्रमाणे अंशतः बदल करणेत येत आहे.

दिपावली सुट्टी दि.०५ नोव्हेंबर २०२६ ते दि.१८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहील. तरी याबाबत सर्वांनी नोंद घेऊन सुट्टीबाबत या पत्रान्वये कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Diwali School Holiday 2026 Sangali

दिवाळी सुट्टी परिपत्रक परभणी 2026

परभणी जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांना सुटयांबाबत कळविण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे परभणी जिल्हयातील (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या) शाळांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील सुटयांचे नियोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

दिवाळी सुट्ट्या दिंनाक ०५ नोव्हेबर २०२६ वार गुरुवार ते २३ नोव्हेंबर २०२६ वार-सोमवार (१९ दिवस) दि.२४ नोव्हेबर २०२६ वार- मंगळवार रोजी गुरुनानक जयंती सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे दिनाक २५ नोव्हेबर २०२६ बार बुधवार रोजी नियमित शाळा सुरू होतील.

०२. शेक्षणिक वर्ष २०२६-२७ चे कार्यदिन नियोजन-

  • एकुण वार्षिक दिवस – ३६५
  • रविवार ५२ दिवस
  • अन्य सार्वजनिक सुटया- ५७ दिवस
  • मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील सुटया ०३ दिवस
  • संस्था/शाळा घोषित या कार्यालयाचे परवानगीने घोषित सुटया-०२ दिवस
  • दिवाळी सुट्ट्या ०५ नोव्हेबर ते २०२६ (१४ दिवस) रविवार व सार्वजनिक सुटटया या वगळुन एकुण सुटटया -१२८
  • अंतिम एकुण कार्यदिन २३७ दिवस

प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर सोडून इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दीर्घ सुट्ट्या अनुदेय नाहीत. मात्र दीर्घ सुटयांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्या असतील त्या शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू राहतील.

Diwali School Holiday Parbhani

दिवाळी सुट्टी परिपत्रक नांदेड 2026

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्यात आले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांना सुट्यांबाबत कळविण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे नांदेड जिल्हयातील (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या) शाळांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील सुटयांचे नियोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

दिवाळी सुटया- दिनांक 05 नोव्हेंबर 2026 वार-गुरुवार ते 23 नव्हेंबर 2026 वार-सोमवार (19 दिवस) दिनांक 24 नोव्हेंबर 2026 वार-मंगळवार रोजी गुरुनानक जयंती सार्वजनिक सुटटी असल्यामूळे दिनांक 25 नोव्हेंबर 2026 वार-बुधवार रोजी नियमित शाळा सुरु होतील.

शैक्षणिक वर्ष 2026-27 चे कार्यदिन नियोजन
अ) एकुण वार्षिक दिवस- 365.
आ) रविवार- 52 दिवस
इ) अन्य सार्वजनिक सुटया- 57 दिवस
ई) मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील सुटया-03 दिवस

संस्था/शाळा घोषित यां कार्यालयाचे परवानगीने घोषित सुटया 02 दिवस.
ऊ) दिवाळी सुटया-05 नोव्हेंबर 2026 तें 23 नोव्हेंबर 2026 (14 दिवस) रविवार व सार्वजनिक सुटटया वगळून,
ऋ) एकूण सुटट्या- 128 दिवस
छ) अंतिम एकूण कार्यदिन- 237 दिवस.

प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर सोडून इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दीर्घ सुट्टया अनुदेय नाहीत, मात्र दीर्घ सुट्टयाच्या कालावधीत ज्या सार्बजनिक सुट्टया असतील त्या शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू राहतील.

Diwali School Holiday Nanded Circuler 2026

दिवाळी सुट्टी परिपत्रक जालना 2026

जालना जिल्ह्यातील सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी व दिवाळी सुट्याबाबत परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार दिवाळी सुट्या खालील प्रमाणे जाहिर करण्यात आल्या आहेत.

  • दिवाळी सुटी:- दिनांक ०२/११/२०२६ ते २१/११/२०२६ दिवस दि. २२/११/२०२६ रोजी रविवार सुटी व दिनांक २३/११/२०२६ पासून शाळा सुरू होतील.
  • तसेच राजामाता जिजाऊ जयंती निमित्त दिनांक १२ जानेवारी २०२७ रोजी प्रतिवर्षी प्रमाणे सुटी राहिल.

तरी सदरील पत्र सर्व संबधिताच्या निर्देशनास आणून देण्याचे आदेश जिल्हा परिषद जालना यांनी दिले आहे.

diwali holiday circular jalna 2026

दिवाळी सुट्टी कधीपासून कधीपर्यंत?

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातील संबंधित शाळांना दि. ५ नोव्हेंबर २०२६ ते दि. २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यंदा दिवाळी सुट्टी एकूण २० दिवसांची असणार आहे. यानंतर दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पूर्ववत सुरू होतील.

दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक

विषयतारीख
दिवाळी सुट्टी सुरू५ नोव्हेंबर २०२६
दिवाळी सुट्टी समाप्त२४ नोव्हेंबर २०२६
सुट्टीचा कालावधी२० दिवस
शाळा पुन्हा सुरू२५ नोव्हेंबर २०२६

कोणत्या शाळांना लागू?

हे आदेश लातूर जिल्ह्यातील संबंधित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू आहेत. यामध्ये विविध व्यवस्थापनांच्या तसेच विविध माध्यमांच्या शाळांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित शाळांनी दिवाळी सुट्टीचे नियोजन व शाळा सुरू करण्याची कार्यवाही या वेळापत्रकानुसार करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय सुट्ट्यांची संपूर्ण यादी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना

प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर यांना सोडून शिक्षकेतर कर्मचा-यांना दिर्घ सुट्टया अनुजेय नाहीत. मात्र दिर्घ सुट्टीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टया असतील त्या सुट्टया शिक्षकेतर कर्मचा-याला अनुज्ञेय राहतील.

दिर्घ सु‌ट्टी कालावधीमध्ये खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये व शिक्षकेतर कर्मचा-यानी मुख्याध्यापकांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.

Diwali School Holiday 2026 Latur

मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

दिवाळीच्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.

तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब विशेषतः दीर्घ सुट्टीच्या कालावधीत शाळेच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

दिवाळी सुट्टी परिपत्रक 2026 जिल्हा पुणे

Diwali School Holiday 2026 Pune: पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने 8/10/2026 रोजी शुद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता दिवाळी सुट्टीच्या सुधारित वेळापत्रकानुसार, यंदा दिवाळीची सुट्टी 5 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत असणार आहे.

या सुट्टीच्या कालावधीत दिवाळी सण, दीपावली पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्षातील सत्रनिहाय नियोजन, दिवाळी सुट्टीचे दिवस आणि शाळा सुरू होण्याची तारीख याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

तपशीलतारीख
दिवाळी सुट्टी सुरू5 नोव्हेंबर 2026
दिवाळी सुट्टीचा शेवटचा दिवस18 नोव्हेंबर 2026
दिवाळी सुट्टीचा कालावधी14 दिवस
diwali school holiday pune

दिवाळी सुट्टीदरम्यान येणारे सण व सार्वजनिक सुट्ट्या

सन २०२६ मधील दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत खालील सण आणि महत्त्वाचे दिवस येत आहेत.

दिनांकवारसण / सुट्टी
६ नोव्हेंबर २०२६शुक्रवारधनत्रयोदशी
१० नोव्हेंबर २०२६मंगळवारदिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा)
११ नोव्हेंबर २०२६बुधवारभाऊबीज

शाळांना दिवाळी सुट्टीच्या कालावधीत बदल करता येणार का?

परिपत्रकानुसार, शाळांना दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ किंवा इतर सणांच्या प्रसंगी सुट्ट्यांचे नियोजन करण्याची मुभा संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात आली आहे. मात्र, शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होता कामा नयेत आणि कामकाजाचे दिवस किमान २३० असणे आवश्यक आहे.

शाळांनी मुख्याध्यापकांच्या अधिकारातील स्थानिक सुट्ट्या निश्चित करून त्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना कळवायची आहे. तसेच शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या घेणे बंधनकारक आहे.

कोणत्या शाळांसाठी हे वेळापत्रक लागू आहे?

उपलब्ध परिपत्रकानुसार, पुणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सैनिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे सुट्टीचे नियोजन देण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांतील शाळांसाठी संबंधित शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक तपासणे आवश्यक आहे.

दिवाळी सुट्टी परिपत्रक बुलढाणा 2026

बुलढाणा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ३० जून २०२६ पासून सुरु झाल्यामुळे, शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता सुट्ट्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

१. उन्हाळी सुटी २ मे २०२६ ते २९ जून २०२६ अशी राहील.

२. उन्हाळी सु‌ट्टीनंतर शै. सत्र २०२६-२७ मध्ये सर्व शाळा ३० जून २०२६ पासून सुरु करण्यात याव्यात.

३. प्रथम सत्र दिनांक ३० जून २०२६ ते ०५ नोव्हेंबर २०२६ असे राहील.

४. दिपावली सुटी दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६ अशी राहील.

५. द्वितीय सत्र दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ ते ०१ मे २०२७ पर्यंत राहील.

६. शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील एकूण कामाचे दिवस व सुट्यासंबंधी विवरण तक्ता सोबत दिला आहे.

७. शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये माध्यमिकसाठी एकूण कामाचे दिवस २३१ राहतील.

८. २०२६-२७ या शै. सत्रातील ३० एप्रिल २०२७ हा शालेय कामकाजांचा शेवटचा दिवस राहील दि. १ मे २०२७ रोजी ध्वजा रोहन करून महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा करुन निकाल जाहीर करावा व विद्यार्थ्यांना सुट्टी जहीर करावी.

Diwali School holiday buldhana
Buldhana Diwali School List

दिवाळी सुट्टी परिपत्रक यवतमाळ 2026

Diwali School Holiday Yavtmal

दिवाळी सुट्टी परिपत्रक 2026 | Diwali School Holiday Circuler 2026 PDF Download

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment