Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी (SSC) आणि इयत्ता १२वी (HSC) परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Maharashtra SSC HSC Exam Time Table 2027

Maharashtra SSC HSC Exam Time Table 2027 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी (SSC) आणि इयत्ता १२वी (HSC) परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार लेखी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

Maharashtra SSC HSC Exam Time Table 2027

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळांतर्गत फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र बोर्ड १०वी, १२वी परीक्षा २०२७ संभाव्य तारखा

  • १२वी लेखी परीक्षा: ०८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७
  • १०वी लेखी परीक्षा: १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७
  • १२वी प्रात्यक्षिक/तोंडी/अंतर्गत मूल्यमापन: २० जानेवारी ते ०६ फेब्रुवारी २०२७
  • १०वी प्रात्यक्षिक/तोंडी/अंतर्गत मूल्यमापन: २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७
  • विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक: नंतर मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी महत्त्वाची सूचना

परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने नियोजन करता यावे, यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे मंडळाने कळविले आहे.

या परीक्षांचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम विषयवार वेळापत्रकासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.

Maharashtra SSC HSC Exam Time Table 2026-27

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.mahahsscboard.in/

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment