Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

TAIT 2025 पवित्र पोर्टल शिक्षक भरती: मुलाखतीसह निवड फेरीतील उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर

TAIT 2025 Interview Round

TAIT 2025 Interview Round: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ (TAIT 2025) नुसार खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या जाहिरातीतील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या मुलाखती व अध्यापन कौशल्य फेरीबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी गैरसमज किंवा सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवता नियोजित मुलाखतींना उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

TAIT 2025 Interview Round उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर

शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह फेरीसाठी एकूण १०,३२८ रिक्त जागांवर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ११,४९३ उमेदवारांची २७,१५४ प्राधान्यक्रमांवर शिफारस करण्यात आली आहे. या नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित उमेदवारांच्या मुलाखती व अध्यापन कौशल्याची कार्यवाही ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार प्राप्त झालेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांना ३१ ऑक्टोबर रोजीच कळविण्यात आले असून, नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या स्तरावर पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, काही समाजमाध्यमांवर उमेदवारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी राज्यस्तरावर येऊन विचारणा करण्याऐवजी आपल्या शिफारस झालेल्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवड प्रक्रियेत राज्यातील एकूण १,३१,५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते. त्यापैकी ११,४९३ उमेदवारांची २७,१५४ प्राधान्यक्रमांवर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली आहे. उमेदवारांनी उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी स्वतःच्या सोयीनुसार निवडक ५० प्राधान्यक्रम लॉक केले होते. त्यापैकीच गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अंतिम निवडीची शक्यता लक्षात घेता मुलाखतींना उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.

सध्या संबंधित शैक्षणिक व्यवस्थापनांना उपलब्ध उमेदवारांच्या मर्यादेनुसार प्रत्येक पदासाठी १:३ या प्रमाणात उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, एखाद्या पदासाठी शिफारस झालेले तिन्ही उमेदवार मुलाखतीला गैरहजर राहिल्यास ते पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सूचनेत नमूद केले आहे.

किती प्राधान्यक्रमांवर मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक?

उमेदवारांची जितक्या प्राधान्यक्रमांवर निवडीसाठी शिफारस झाली आहे, त्यानुसार मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या उमेदवारांची तीन प्राधान्यक्रमांवर निवडीसाठी शिफारस झाली आहे, त्यांनी किमान दोन ठिकाणी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दोन प्राधान्यक्रमांवर शिफारस झालेल्या उमेदवारांनी किमान एका ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

तसेच, ज्या उमेदवारांची केवळ एका प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे, त्यांनी त्या संबंधित प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

त्यामुळे TAIT 2025 अंतर्गत मुलाखतीसह फेरीत शिफारस झालेल्या उमेदवारांनी सोशल मीडियावरील अपुऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता संबंधित शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनेनुसार मुलाखतीला उपस्थित राहावे. मुलाखतीस अनुपस्थित राहिल्यास उपलब्ध रिक्त पदांवरील निवडीची संधी गमावली जाऊ शकते.

TAIT 2025 पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेबसाईट लिंक

TAIT 2025 Interview Round Notice
TAIT 2025 Interview Round Notice

Related
पवित्र पोर्टल शिक्षक भरती अधिकृत वेबसाईटवर निवड याद्या जाहीर

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment