Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

सन 2026 मधील महापुरुष जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी; शासन निर्णय

सन 2026 मधील महापुरुष जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी; शासन निर्णय PDF लिंक डाउनलोड या लेखात दिली आहे.

Jayanti GR Maharashtra List

Jayanti GR Maharashtra List 2026 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2026 मध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांच्या जयंती तसेच विविध राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार मंत्रालयासह राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, तसेच राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळांमध्ये संबंधित कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिनांचे नियोजन करता यावे, यासाठी शासनाने 2026 सालातील कार्यक्रमांची दिनांक वार निहाय यादी परिशिष्टासोबत प्रसिद्ध केली आहे. या वर्षातील ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 या महिन्यातील जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी या लेखात दिली आहे.

सन 2026 मधील जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिनांची संपूर्ण यादी

अ.क्र.जयंती / राष्ट्रीय दिनदिनांककार्यक्रमाचे स्वरूप
1सावित्रीबाई फुले जयंती3 जानेवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
2जिजाऊ माँसाहेब जयंती12 जानेवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
3स्वामी विवेकानंद जयंती12 जानेवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
4नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती23 जानेवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
5बाळासाहेब ठाकरे जयंती23 जानेवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
6संत रविदास महाराज जयंती1 फेब्रुवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
7संत सेवालाल महाराज जयंती15 फेब्रुवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
8छत्रपती शिवाजी महाराज जयंती19 फेब्रुवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
9बाळशास्त्री जांभेकर जयंती20 फेब्रुवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
10संत गाडगे बाबा जयंती23 फेब्रुवारी 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
11यशवंतराव चव्हाण जयंती12 मार्च 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
12शहीद दिन23 मार्च 2026भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार
13महात्मा ज्योतिबा फुले जयंती11 एप्रिल 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
14डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती14 एप्रिल 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
15महात्मा बसवेश्वर जयंती19 एप्रिल 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
16राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती30 एप्रिल 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
17छत्रपती संभाजी महाराज जयंती14 मे 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
18दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस21 मे 2026दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ
19स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती28 मे 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
20अहिल्यादेवी होळकर जयंती31 मे 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
21महाराणा प्रतापसिंह जयंती17 जून 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
22राजर्षी शाहूमहाराज जयंती26 जून 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
23वसंतराव नाईक जयंती1 जुलै 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
24लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती23 जुलै 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
25साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती1 ऑगस्ट 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
26क्रांतिसिंह नाना पाटील जयंती3 ऑगस्ट 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
27सद्भावना दिवस20 ऑगस्ट 2026सद्भावना दिवसाची शपथ
28राजे उमाजी नाईक जयंती7 सप्टेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
29भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन13 सप्टेंबर 2026स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील
30केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती17 सप्टेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
31पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती – अंत्योदय दिवस25 सप्टेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
32महात्मा गांधी जयंती2 ऑक्टोबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
33लाल बहादूर शास्त्री जयंती2 ऑक्टोबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
34डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती15 ऑक्टोबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
35महर्षी वाल्मिकी जयंती26 ऑक्टोबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
36इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस31 ऑक्टोबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
37वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस31 ऑक्टोबर 2026पुष्पहार अर्पण व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ
38पंडित नेहरू जयंती14 नोव्हेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
39बिरसा मुंडा जयंती15 नोव्हेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
40इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन19 नोव्हेंबर 2026पुष्पहार अर्पण व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ
41संविधान दिवस26 नोव्हेंबर 2026भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
42संत संताजी जगनाडे महाराज जयंती8 डिसेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
43अटल बिहारी वाजपेयी जयंती25 डिसेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
44वीर बाल दिवस26 डिसेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
45डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती27 डिसेंबर 2026प्रतिमेस पुष्पहार अर्पण
maharashtra jayanti List 2026
maharashtra jayanti List 2026

वरील दिनांक व कार्यक्रमांचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाच्या परिशिष्टात नमूद केले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश राज्य शासनाच्या २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने (GAD) १५ जुलै २०२६ रोजी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

परिपत्रकानुसार, २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी राज्यभर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

maharashtra jayanti New gr 2026

ऑक्टोबर महिन्यातील जयंती व राष्ट्रीय दिन

ऑक्टोबर 2026 महिन्यात महत्त्वाचे अनेक जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यात येणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी केली जाणार असून या दिवशी संबंधित महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती, तर 26 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जाणार आहे. तसेच 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा केला जाणार असून त्याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस देखील साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्याचेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील जयंती व राष्ट्रीय दिन

नोव्हेंबर 2026 मध्येही महत्त्वाचे जयंती व राष्ट्रीय दिन आहेत. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती, तर 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जाणार असून यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासोबत राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जाणार असून या दिवशी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

डिसेंबर महिन्यातील जयंती व राष्ट्रीय दिन

डिसेंबर 2026 महिन्यात 8 डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती, 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस आणि 27 डिसेंबर रोजी डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती साजरी करण्यात येणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार या जयंतींच्या दिवशी संबंधित महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

शाळा व महाविद्यालयांसाठी महत्त्वाची सूचना

या शासन परिपत्रकाचा लागू क्षेत्र केवळ मंत्रालय किंवा शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळांनाही हे परिपत्रक लागू राहणार आहे. त्यामुळे शाळांनी वर्षभरातील संबंधित जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमांचे नियोजन करताना सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या जयंती व पुण्यतिथी 2026 मूळ शासन निर्णय PDF डाउनलोड करून त्यानुसार अटी व शर्ती नुसार जयंती व पुण्यतिथी, राष्ट्रीय दिन साजरा करावा.

सुट्टीच्या दिवशी जयंती किंवा राष्ट्रीय दिन आल्यास काय करावे?

परिपत्रकात याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. एखादा कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, शनिवार-रविवार किंवा स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असल्यास आणि केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल करण्याच्या सूचना दिल्यास त्यानुसार कार्यक्रम साजरा करावा. अन्यथा संबंधित कार्यक्रम त्याच दिवशी साजरा करण्यात यावा.

Jayanti Day Holiday GR Maharashtra

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची कार्यवाही करावी, असे शासनाने नमूद केले आहे.

परिपत्रकात विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी संबंधित शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील सूचनांनुसार कार्यवाही करण्याचेही नमूद करण्यात आले आहे.

जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय दिन संपूर्ण यादी शासन निर्णय PDF 2026

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment