Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

NISHTHA ECCE Course Enroll Link DIKSHA APP

DIKSHA Portal वरील निष्ठा (NISHTHA) अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) हा ऑनलाइन कोर्स पूर्ण करणेबाबत संपूर्ण माहिती.

NISHTHA ECCE Course

NISHTHA ECCE Course Enroll Link DIKSHA APP : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत निष्ठा Early Childhood Care and Education (ECCE) हा ऑनलाइन कोर्स विकसित केलेला आहे. हा कोर्स Enroll करण्यासाठी डायरेक्ट लिंक व माहिती या लेखात दिलेली आहे.

महत्वाची अपडेट: NISHTHA ECCE कोर्स पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबर, २०२६ अंतिम तारीख आहे.

  • NISHTHA Full Form : National Initiative for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement
  • ECCE Full Form: Early Childhood Care and Education

NISHTHA ECCE Course Duration सदर कोर्सचा कालावधी १५ तासांचा असून, “हा अभ्यासक्रम दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पायाभूत ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये प्रदान करतो. हा अभ्यासक्रम पायाभूत स्तरातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे खेळ-आधारित वातावरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतो.

हा कोर्स DIKSHA Portal वर अपलोड केलेला असून आपल्या अधिनस्त DIET चे अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांतील पायाभूत स्तरावरील (इ. १ ली व २ री) शिक्षक, मुख्याध्यापक, D.El.Ed. अध्यापकाचार्य यांच्या साठी हा कोर्स लागू आहे.

सदर कोर्स हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभ्यासक्रमाची पहिल्या बॅचसाठी ३१ ऑगस्ट, २०२६ पर्यंत नोंदणी करता येईल. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर, २०२६ अशी आहे.

NISHTHA ECCE Course अभ्यासक्रमाचे वर्णन

‘निष्ठा प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षण कार्यक्रम’ हा अंगणवाडी आणि पूर्व-प्राथमिक शाळांमधील मुलांना उच्च दर्जाचे प्रारंभिक शिक्षण देण्यासाठी आवश्यक मूलभूत ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करतो.

या अभ्यासक्रमात प्रारंभिक वर्षांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले असून, मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे खेळाधारित वातावरण निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

कुटुंबे आणि समुदायांना सहभागी करून घेणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे तसेच जन्मापासून तीन वर्षांपर्यंत विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रारंभिक हस्तक्षेप करण्यासाठी आवश्यक रणनीती या अभ्यासक्रमात दिल्या आहेत.

सर्व मुलांसाठी समान आणि त्यांच्या विकासात्मक गरजांनुसार अनुभव विकसित करण्याचे प्रशिक्षण या मॉड्यूलमध्ये दिले जाते, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आयुष्यभराच्या शिकण्यास उपयुक्त ठरते.

NISHTHA ECCE Course अभ्यासक्रमाची रूपरेषा

  • मॉड्यूल ०१: प्रारंभिक वर्षांचे महत्त्व
  • मॉड्यूल ०२: खेळाधारित अध्ययन वातावरणाचे नियोजन
  • मॉड्यूल ०३: सर्वांगीण विकासासाठी खेळाधारित उपक्रम
  • मॉड्यूल ०४: पालक आणि समुदायांसोबत भागीदारी
  • मॉड्यूल ०५: शाळेसाठी तयारी
  • मॉड्यूल ०६: जन्मापासून ३ वर्षे – विशेष गरजांसाठी प्रारंभिक हस्तक्षेप
  • मूल्यमापन
  • प्रमाणपत्र

Course Activities & Duration

  • 179 Activities
  • 15 hrs

Batch Details

NISHTHA ECCE Hindi_Batch 8
  •  Start Date : 21 Apr 2026
  •  End Date : 15 Sep 2026
  •  Enrollment End : 31 Aug 2026

How to Enroll DIKSHA APP NISHTHA ECCE Course

कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारीः १. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

(अ) DIKSHA App डाउनलोड करणे: Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी. प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे.

(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणेः प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store वरून DIKSHA Courses है App डाउनलोड करावे. हिंदी व इंग्रजी भाषेतील कोर्सच्या लिंक्स पुढीलप्रमाणे आहेत. खालीलपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा.

DIKSHA APP NISHTHA ECCE Course

NISHTHA ECCE Course Link

हिंदी – https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=११२६&section=२३७३

इंग्रजी – https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=११२५&section=२३७४

Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी करावी. DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही.

प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी. Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये “NISHTHA ECCE Hindi” किंवा “NISHTHA ECCE English” कोर्स शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश घ्यावा. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे.

करिता आपल्या स्तरावरून अधिनस्त DIET मधील अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांतील पायाभूत स्तरावरील (इ. १ ली व २ री चे) शिक्षक, मुख्याध्यापक, D.El.Ed. अध्यापकाचार्य यांना सदर कोर्ससाठी विहित कालावधीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करण्यासाठी आदेशित करावे. अशा सूचना SCERT Pune राज्य कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी : DIKSHA Portal वरील निष्ठा (NISHTHA) अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) हा ऑनलाइन कोर्स पूर्ण करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा

AI Saathi for Educators Course नोंदणी डायरेक्ट लिंक

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment