PRASHAST Inclusive Education Sensitization Module 2026 : विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (CwSN) शाळेतील वातावरण अधिक संवेदनशील, समावेशक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने 7 ऑक्टोबर 2026 रोजी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 30 मिनिटांचे Sensitization Module PRASHAST HM Login द्वारे दाखविण्यात येणार आहे. याबाबत MPSP कडून सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या निर्देशानुसार हे 30 मिनिटांचे Sensitization आणि Orientation Module तयार करण्यात आले आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या गरजा, अडचणी आणि त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागण्याबाबत शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि समावेशक दृष्टिकोन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
PRASHAST Inclusive Education Sensitization Module 2026 HM Video Tutorial Login Guide
हे व्हिडिओ मॉड्यूल 7 ऑक्टोबर 2026 पासून PRASHAST पोर्टलवर उपलब्ध होईल. शाळेच्या PRASHAST मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधून Video Tutorial या पर्यायामध्ये हे मॉड्यूल पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
स्टेप 1 : सर्वप्रथम PRASHAST Portal किंवा PRASHAST App मध्ये Tutorial Login या टॅबवर क्लिक करा.

स्टेप 2 : त्यानंतर Role मध्ये Headmaster निवडा आणि शाळेचा UDISE Code आणि Mobile Number व Captcha Code टाकून लॉगिन करा.
स्टेप 3 : आता स्क्रीन वर Inclusive Education Sensitization Module हा Video पाहा.

PRASHAST पोर्टलवर हे मॉड्यूल पाहण्यासाठी https://prashast.education.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल. महाराष्ट्राच्या पत्रानुसार मॉड्यूल पाहणाऱ्या शाळांची संख्या राष्ट्रीय, राज्य आणि ब्लॉक स्तरावरील लॉगिनमध्ये दिसणार असून त्याची पडताळणीही करता येणार आहे.


कोणत्या कर्मचाऱ्यांनी मॉड्यूल पाहायचे?
या उपक्रमात केवळ शिक्षकांनी सहभागी व्हायचे नसून शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये शिक्षकांसोबतच आया, चालक, लिपिक, रिसेप्शनिस्ट, डीन, वॉर्डन, विभागप्रमुख इतर शिक्षकेतर व सहाय्यक कर्मचारी
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शाळेतील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी हे मॉड्यूल पाहणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या पत्रातही सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
30 मिनिटांच्या मॉड्यूलमध्ये काय समजणार?
या Sensitization Module च्या माध्यमातून Children with Special Needs (CwSN) म्हणजेच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्यास शाळेतील कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे.
मॉड्यूलमध्ये व्यावहारिक उदाहरणे आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांशी शाळेच्या वातावरणात योग्य, आदरयुक्त आणि समावेशक पद्धतीने कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हे मॉड्यूल 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार असल्याचे महाराष्ट्राच्या पत्रात नमूद आहे.
शाळांनी कार्यक्रमाचे आयोजन कसे करावे?
7 ऑक्टोबर रोजी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल अशा पद्धतीने या 30 मिनिटांच्या मॉड्यूलचे आयोजन करावे. मात्र, यामुळे शाळेतील आवश्यक शैक्षणिक किंवा इतर कामकाजात अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
PRASHAST Screening Initiative शी संबंध
हा उपक्रम केवळ स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम नसून PRASHAST Screening Initiative चाच एक महत्त्वाचा भाग आहे. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये संभाव्य दिव्यांगत्वाची ओळख करण्यासाठी PRASHAST अंतर्गत स्क्रीनिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची संभाव्य दिव्यांगत्वासाठी वेळेत तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी लवकर हस्तक्षेप आणि मदत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आवश्यकतांबाबत शाळेतील कर्मचाऱ्यांचे संवेदनशीलता प्रशिक्षणही या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केवळ विशेष शिक्षक किंवा वर्गशिक्षकांनी संवेदनशील असणे पुरेसे नाही. विद्यार्थी शाळेत प्रवेश केल्यापासून त्याचा शाळेतील विविध कर्मचाऱ्यांशी संपर्क येतो. त्यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरणच समावेशक आणि सहकार्यपूर्ण असणे आवश्यक आहे.
याच उद्देशाने 7 ऑक्टोबर रोजी हे 30 मिनिटांचे मॉड्यूल जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी पाहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे CwSN विद्यार्थ्यांसाठी अधिक समावेशक, सुलभ, सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण शालेय वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.
PRASHAST Inclusive Education Sensitization Module 2026 HM Login Link
- PRASHAST Inclusive Education Sensitization Module HM Login
- Prashast Official Website Portal
- Prashast App 2.0 Official App
Related Article
PRASHAST App Teachers Assigning Part 1 Screening Step By Step Guide
PRASHAST App 2.0 Download Latest Version










