10th Application Date : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाकडून प्रकटन जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे-
शुल्क प्रकार व आवेदनपत्र भरण्याच्या तारखा

नियमित शुल्क
- माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा:
- बुधवार, दिनांक-१९/०८/२०२६ ते
- शनिवार, दिनांक-३१/१०/२०२६
- माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाच्या तारखा:
- सोमवार, दिनांक-३१/०८/२०२६ ते
- शनिवार, दिनांक-३१/१०/२०२६
विलंब शुल्क
- माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची मुदत:
- रविवार, दिनांक-०१/११/२०२६ ते
- रविवार, दिनांक-१५/११/२०२६
- माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाची मुदत:
- रविवार, दिनांक-०१/११/२०२६ ते
- रविवार, दिनांक-१५/११/२०२६
अतिविलंब शुल्क
- माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची मुदत:
- सोमवार, दिनांक-१६/११/२०२६ ते
- सोमवार, दिनांक-३०/११/२०२६
- माध्यमिक शाळांनी विहित पद्धतीने शुल्क भरावयाची मुदत:
- (प्रति विद्यार्थी प्रति दिन रु.५०/-)
- सोमवार, दिनांक-१६/११/२०२६ ते
- सोमवार, दिनांक-३०/११/२०२६
शुल्क पावती / प्रिलिस्ट जमा करण्याची तारीख
माध्यमिक शाळांनी शुल्क पावती/ विद्यार्थ्यांच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख सोमवार दिनांक-०७/१२/२०२६

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करून दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बाबी
१. माध्यमिक शाळांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल.
२. पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणार विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत.
३. कौशल्य विषयात Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.
४. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
५. सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा SBI बँकेच्या Online पेमेंट गेटवेद्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलानाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी.
रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये “Draft” चा “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा “Send to Board” व “Paid” Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्ये राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
६. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकेच्या जुन्या चलानाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.
७. आवेदनपत्रातील फोटोच्या सविस्तर सूचना खालीलप्रमाणे –
Photo Instructions
परीक्षेसाठी फोटो अपलोड करताना व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. फाईलचे स्वरूप JPG असावे आणि आकार 25 KB ते 40 KB च्या दरम्यान असावा (जास्तीत जास्त 40 KB पर्यंत), फोटो गेल्या ६ महिन्यांत काढलेला असावा.
छायाचित्रासाठी महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
१. स्वरूप आणि गुणवत्ता (Format & Quality):
- फोटो हाय-क्वालिटी आणि स्पष्ट रंगाचा असावा.
- फोटोचा पार्श्वभाग (Background) पांढरा किंवा साध्या रंगाचा असावा.
२. विद्यार्थ्यांचे स्वरूप (Student Appearance):
- विद्यार्थ्यांचा चेहरा स्पष्ट आणि समोर असावा. दोन्ही डोळे आणि कान उघडे असावेत.
- चेहरा पूर्णपणे दिसत असावा (चेहऱ्यावर केस किंवा मास्क नसावा).
- विद्यार्थ्याने शक्यतो अधिकृत शालेय गणवेश घातलेला असावा.
- जर विद्यार्थी चष्मा लावत असेल, तर डोळ्यांवर प्रकाश पडून फोटो खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
३. तंत्रज्ञानाची माहिती (Technical Details):
- फोटो JPEG (.jpg) फॉरमॅटमध्येच सेव्ह केलेला असावा. इतर FORMAT मधील (.PNG, BMP) फाईल .JPG म्हणून RENAME करू नये.
- फाईलचा आकार 25 KB ते 40 KB दरम्यान असावा.
आवेदनपत्रे मंडळाकडे पाठविल्यानंतर व प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर कोणताही फोटो बदलता येणार नाही.
८. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्याच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे prelist वर अथवा आवेदनपत्राच्या print out वर विद्यार्थ्याची / पालकांची स्वाक्षरी घ्यावी.
९. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी माध्यमिक शाळांनी अनेक दुय्यम login, शाळेच्या main login मध्ये तयार करून computer lab मध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून मुख्य login द्वारे त्याची तपासणी करावी.
१०. माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्राचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
११. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
अधिक माहितीसाठी : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत प्रकटन पीडीएफ डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट: https://mahahsscboard.in/










