Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

UDISE Plus मधून आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढणे बाबत – परिपत्रक जारी

सन २०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढण्याची कार्यवाही दि. १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत पूर्ण करण्याबाबत..

UDISE Plus APAAR ID Aadhaar Validation Deadline

UDISE Plus APAAR ID Aadhaar Validation Deadline: राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस प्रणालीमधून आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही दि. ३० जून, २०२६ पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. ०१ जुलै, २०२६ रोजी आढावा घेण्यात आला.

यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनमध्ये मुंबई, पालघर, धुळे, ठाणे, नंदुरबार या जिल्ह्याच्या Aadhaar Validation मध्ये मागे असल्याबाबत दिसून आले आहे आणि अपार आयडी तयार करण्यामध्ये धुळे, मुंबई, नागपूर, नांदेड, लातूर सर्वात मागे असल्याबाबत दिसून आले आहे.

याबाबत जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात येते की, दि. १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत आधार उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी दिले आहे.

आधार व अपार आयडी काढतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे व झालेल्या प्रगतीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शाळेमधील यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले असल्याची खात्री करण्यासाठी सूचित करावे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमधून नोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे.

तसेच मुख्यध्यापकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Coordinator व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना आपल्या स्तरावर आदेशित करावे. जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील अपार नोंदणीबाबत सर्व अडचणी एकत्रिक करून या कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे, या कार्यालयाकडून आवश्यकते तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल. असे दिनांक 31 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये कळविले आहे.

UDISE Plus APAAR ID Aadhaar Validation Deadline
UDISE Plus APAAR ID Aadhaar Validation Deadline

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment