Swift Chat App Attendance Login Step by Step Guide : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या 1 ली ते 12 वीच्या 100% शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत परिपत्रक दिनांक 04/10/2026 रोजी शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. या लेखात Swift Chat App SMART Attendance Registration, Login करून शिक्षक उपस्थिती (मुख्याध्यापक), विद्यार्थी उपस्थिती (वर्गशिक्षक) यांच्या मार्फत कशी नोंदवायची याची सविस्तर माहिती दिली आहे.
Table of Contents
राज्यातील सर्व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत सूचना | Swift Chat App Attendance Guidelines
समग्र शिक्षा, PM पोषण, स्टार्स, पी.एम. श्री अंतर्गत उपक्रमांचे सनियंत्रण तसेच राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राद्वारे तयार करण्यात आलेल्या ६A framework अंतर्गत Attendance, Assessment, Accreditation, Administration, Adaptive Learning व Artificial intelligence यांचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे.
संदर्भ क्र. ६ नुसार, भारत सरकारचे राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र (RVSK) वरीलपैकी ६A framework अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) Real-Time पद्धतीने Dashboard द्वारे सनियंत्रित करणार आहे. Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.
संदर्भ क्र. ५,६ व ७ अन्वये, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीच्या १००% शाळांतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर २०२६ पासून Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” (SMART Attendance) या Bot द्वारे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सर्व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच याबाबत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा, क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापकांना याबाबत आवश्यक सूचना देण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे.
शिक्षक ऑनलाइन उपस्थिती – मार्गदर्शक सूचना | SMART Teacher Attendance
1. SwiftChat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती मुख्याध्यापकांनी नोंदवावी व मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीत प्रभारी मुख्याध्यापकांनी सदर उपस्थिती नोंदविणे अनिवार्य असेल.
2. ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये आहेत, अशा सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांनी SwiftChat या Application मध्ये उपस्थिती नोंदविताना मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यू-डायस कोड व स्वतःचा शालार्थ आय. डी. चा वापर करावा. तसेच शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.
3. ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये नाहीत, अशा सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी यू-डायस+ पोर्टलमधील १० अंकी National Teacher Code व UDISE+ पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करावा.
- National Teacher Code टाकण्यापूर्वी NTC लिहून पुढे १० अंकी National Teacher Code टाकावा. (उदा. यू-डायस+ पोर्टलवर एखाद्या मुख्याध्यापकांचा National Teacher Code TPXXXXX32 असा असेल तर त्या code पूर्वी NTC हा उपसर्ग (Prefix) लावल्यानंतर तो क्रमांक असा दिसायला पाहिजे. (NTCTPXXXXX32) उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यू-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसांत आपोआप दूर होतील.
4. ज्या मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापकांना उपस्थिती नोंदविण्यासाठी शिक्षकांची यादी दिसत नसेल तर त्यांनी शालार्थ पोर्टल व यू-डायस+ पोर्टलवर Acting Headmaster म्हणून नोंद अद्ययावत करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर शिक्षकांची यादी पुढील काही दिवसांत दिसेल.
5. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. राज्यशाळांना आपली उपस्थिती रात्री ०९.०० पर्यंत नोंदविता येईल.
6. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्राम याकामी त्यांना मदत करतील. शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
7. राज्यस्तरावरून याबाबतचा नियमित आढावा घेण्यात येईल.
8. ऑनलाइन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.
Swift Chat App SMART Attendance Registration
आवश्यक: मोबाइल, इंटरनेट, शाळेचा 11 अंकी UDISE कोड आणि शिक्षक कोड – शालार्थ आयडी (Shalarth ID) किंवा राष्ट्रीय शिक्षक कोड (National Teacher Code) यापैकी कोणताही एक

टप्पा १ : ॲप डाउनलोड व नोंदणी (एकदाच करावयाची) | Swift Chat App SMART Attendance Registration
- Google Play Store वरून SwiftChat App डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
- आपला मोबाइल क्रमांक टाका व OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
- वरील QR कोड स्कॅन करा किंवा बॉट लिंकवर क्लिक करा — स्मार्ट उपस्थिती बॉट उघडेल.
- चॅटमध्ये Hi लिहून पाठवा आणि भाषा म्हणून मराठी निवडा.
- शाळेचा 11 अंकी UDISE कोड टाका; दिसणारी शाळेची माहिती तपासून Yes, this is my school निवडा.
- आपला शिक्षक कोड टाका – शालार्थ आयडी (Shalarth ID) किंवा राष्ट्रीय शिक्षक कोड (National Teacher Code) यापैकी कोणताही एक. दिसणारी माहिती तपासून खात्री करा – नोंदणी पूर्ण होईल.
- जर शालार्थ आयडी लागू नसल्यास आपण UDISE+ वरील राष्ट्रीय शिक्षक कोड (National Teacher Code) वापरावा व सदरील code प्रविष्ट करण्याआधी NTC हा उपसर्ग (prefix) लावून प्रविष्ट करावा. उदा. NTCTP12345678
टप्पा २ : शिक्षक उपस्थिती (मुख्याध्यापक)
- Home Menu मधील Take Teacher Attendance निवडा.
- Record Attendance या बटणावर क्लिक करा.
- प्रत्येक शिक्षकासमोरील ड्रॉप-डाउनमधून स्थिती निवडा — Present / Absent / Half Leave / Full Leave / Training-Workshop इत्यादी.
- Submit वर क्लिक करा. उपस्थिती नोंदल्याचा संदेश चॅटमध्ये दिसेल.
टप्पा ३ : विद्यार्थी उपस्थिती (वर्गशिक्षक)
- Home Menu मधील Take Student Attendance निवडा.
- आपली इयत्ता (Class) व तुकडी (Section) निवडा.
- Record Attendance या बटणावर क्लिक करा.
- फक्त गैरहजर विद्यार्थ्यांसमोर Absent निवडा; उर्वरित विद्यार्थी Present राहतील.
- Submit वर क्लिक करा. पुढील वर्गासाठी Change Class निवडा.
टप्पा ४ : उपस्थिती अहवाल (PDF) डाउनलोड करणे
- चॅट बॉक्स शेजारील मेनू बटण (Persistent Menu) दाबून Attendance Status निवडा.
- Teachers Attendance Report किंवा Students Attendance Report यापैकी हवा तो अहवाल निवडा.
- Daily Report / Download Class Report निवडा आणि तयार झालेली PDF उघडून पहा किंवा जतन करा.
लक्षात ठेवा
- नोंदणी एकदाच करावी लागते. माहिती दुरुस्ती आवश्यक असल्यास मेनूमधील Edit Registration वापरा.
- शिक्षक कोड म्हणून शालार्थ आयडी किंवा राष्ट्रीय शिक्षक कोड यापैकी कोणताही एक वापरता येतो.
- चॅटची भाषा बदलण्यासाठी मेनूमधील Change Medium वापरा.
- उपस्थिती दररोज नोंदवावी; नोंद Submit केल्यानंतरच जतन होते.
- एकाच मोबाइलवरून एकापेक्षा अधिक वर्गांची उपस्थिती Change Class वापरून नोंदविता येते.
Swift Chat App SMART Attendance परिपत्रक, शासन निर्णय
- राज्यातील सर्व शिक्षकांची उपस्थिती ऑनलाईन नोंदविणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा
- SwiftChat App Download
- शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक (User Manual for HM’s & Teacher) PDF Download
- बॉट लिंक (मोबाइलवर क्लिक करा) https://links.swiftchat.ai/Vjz5EM
- राज्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा
Related
VSK Swift Chat Bot Attendance: विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना









