Anganwadi Sevika Diwali Bonus 2026-27 : महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) म्हणून मंजूर करण्यात आला आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने 14 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) शासन निर्णय PDF डाउनलोड लिंक या लेखात दिली आहे.)
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांच्या कामाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) मंजूर
महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका 1,08,627 आणि मदतनीस 1,05,470 असे एकूण 2,14,097 पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट (Diwali Bonus) देण्यात येणार आहे. यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेण्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
भाऊबीज भेट (Diwali Bonus) कधी मिळणार?
सन 2026 या वर्षातील दिवाळी हा सण 8 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. तर भाऊबीज 11 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच 8 नोव्हेंबर च्या पूर्वी ही रक्कम मिळणार आहे. शासन निर्णयामध्ये भाऊबीज भेटीची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई येथील आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) शासन निर्णय PDF
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. अधिकृत शासन निर्णय PDF येथे डाउनलोड करा.


Related
अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट; ग्रॅच्युइटी आणि वयोमर्यादा 60 वर्षे करण्याबाबत शासन सकारात्मक











