Anganwadi Poshan Aahar Maharashtra update: महाराष्ट्र राज्यातील बालकांना मिळणारा पोषण आहार दर्जेदार आणि योग्य स्थितीत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
NEW Update: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व सेवांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने पोषण आहाराच्या पुरवठ्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री कु.आदिती तटकरे यांनी खालीलप्रमाणे नवीन सूचना दिल्या आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या यंत्रणेला नवीन सूचना
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (ICDS) यंत्रणेला खालील नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.
- Food Corporation of India (FCI) कडून मिळणाऱ्या पोषण आहाराबाबत प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित करावी. याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी FCI प्रशासनासोबत संवाद साधून सदर आहार ६ महिने ते ६ वर्षांच्या बालकांना देण्यात येत असल्याने अतिरिक्त काळजी घेण्याची विनंती करावी.
- अंगणवाडी सेविकांनी केंद्रात पोषण आहार स्वीकारताना दर्जाची खात्री करूनच स्वीकारावा.
- THR प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने लाभार्थ्यांना वितरण करावे.
- लाभार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहार शिल्लक राहिल्यास कालबाह्य होण्यापूर्वी वितरण करावे.
- आहाराबाबत तक्रार असल्यास अंगणवाडी सेविकेने मुख्यसेविकेच्या माध्यमातून प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवावे.
- तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ अंगणवाडी केंद्रास भेट देऊन शहानिशा करावी.
- कालबाह्य आहाराचे वितरण करू नये.
पोषण आहार पुरवठादारांना सूचना
- पोषण आहाराचा पुरवठा निर्धारित वेळेत करावा.
- आहाराचा पुरवठा करण्यापूर्वी बॅचनुसार लॅब तपासणी करून घ्यावी.
- आहाराचा पुरवठा करताना स्वच्छ करून व मोजून द्यावा.
- FCI कडून मिळणारे धान्य स्वच्छ करून पॅक करावे.
- तक्रार प्राप्त झाल्यास दोन दिवसांच्या आत आहार बदलून द्यावा.
- तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पुरवठादाराने आपला प्रतिनिधी अंगणवाडी केंद्रात पाठवावा व याबाबत आयुक्त कार्यालयास माहिती द्यावी.
- कालबाह्य आहार पुरवठा करू नये, पुरवठा करताना त्या आहाराची किमान ८०% कालमर्यादा शिल्लक असावी.
- THR पुरवठा करताना दर्जा, प्रोटीन्स व कॅलरीज यांची दक्षता घ्यावी.
बालकांचे उत्तम पोषण व उत्तम आरोग्य हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रमुख ध्येय आहे. येथे साध्य करण्यासाठी पुरवण्यात येणारा पोषण आहार सर्वोत्तम दर्जाचा असावा यासाठी संपूर्ण यंत्रणेने सतर्क व कार्यरत राहावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचना
बालकांचे उत्तम पोषण व उत्तम आरोग्य हे महिला व बालविकास विभागाचे प्राथमिक ध्येय असून, हे ध्येय साध्य करण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
अंगणवाडी केंद्रांमार्फत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही समस्या आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविकांनी ती बाब योग्य मार्गाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. अशा तक्रारीची योग्य दखल घेण्यात येईल आणि आवश्यक असल्यास १२ तासांच्या आत पोषण आहाराचा पुरवठा बदलून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांच्या सूचनांचा सकारात्मक विचार
अंगणवाडी सेविका या महिला व बालविकास विभागाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत अंगणवाडी सेविकांकडून येणाऱ्या सूचना आणि तक्रारींचा सकारात्मक विचार केला जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या उत्तम पोषणासाठी जबाबदारीने पुढे येणारा कोणताही आवाज दाबण्याची महिला व बालविकास विभागाची भूमिका नसून, बालकांच्या पोषणाशी संबंधित प्रत्येक सूचना आणि तक्रारीचे स्वागत करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकेवरील निलंबनाची कारवाई मागे
पोषण आहाराबाबत प्रसारमाध्यमांमधून एका अंगणवाडी सेविकेने मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर जिल्हा पातळीवर संबंधित अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मात्र, या निलंबनाची कारवाई करण्याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कार्यालयाकडून किंवा विभागाच्या सचिव व आयुक्त कार्यालयाकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निलंबनाबाबत माहिती मिळताच संबंधित अंगणवाडी सेविकेवरील निलंबनाची कारवाई तातडीने मागे घेण्याचे निर्देश विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले. तसेच, संबंधित पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुढील ४८ तासांत सर्व अंगणवाड्यांची तपासणी

महाराष्ट्रातील बालकांच्या पोषण आहाराचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी विभागाकडून क्षेत्रीय पातळीवर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका व पर्यवेक्षिका यांनी पुढील ४८ तासांत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पोषण आहाराची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासन यांनीदेखील आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पोषण आहाराची तपासणी करावी, असे निर्देश आहेत.
पोषण आहाराची सखोल तपासणी करण्याचे निर्देश
अंगणवाडी केंद्रात प्राप्त झालेला पोषण आहार योग्य आहे की नाही आणि तो सुस्थितीत आहे की नाही, याची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे.
तपासणीदरम्यान पोषण आहार अयोग्य किंवा सुस्थितीत नसल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो तात्काळ बदलून घेण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार
पोषण आहाराची तपासणी केल्यानंतरही संबंधित अंगणवाडी केंद्रातून पोषण आहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची राहील.
अशा प्रकरणात संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य
बालकांचे उत्तम पोषण आणि आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देत पोषण आहाराच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही समस्या आढळल्यास ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत योग्य मार्गाने तातडीने पोहोचवावी.
तक्रार करणाऱ्या किंवा सूचना देणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल. बालकांच्या उत्तम पोषणासाठी जबाबदारीने पुढे येणाऱ्या कोणत्याही आवाजाला दाबण्याची भूमिका नसून, अशा प्रत्येक सूचनेचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पोषण माह 2026: आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ – 5 प्रमुख विषय आणि उपक्रम यादी










