Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

एक दिवसाचे वेतन कपात गणना कशी होणार? ऑनलाईन चेक करा

One Day Salary Donation

One Day Salary Donation GR 2026 : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह इतर विभागतील सर्व कर्मचारी यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन कपात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून जमा करण्याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केले आहे. या लेखात एक दिवसाचे वेतन कपात गणना कशी होणार? वेतनकपात, हरकतपत्र आणि आयकर सवलती संबंधीच्या सूचना काय आहे? सविस्तर माहिती दिली आहे.

एक दिवसाचे वेतन कपात शासन निर्णय कोणासाठी? | One Day Salary Donation GR 2026

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय वन सेवा (IFS) तसेच महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एक दिवसाचे वेतन (One Day Salary Donation) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून देण्याचे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये मंत्रालयीन विभाग, शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांचा समावेश आहे.

एक दिवसाचे वेतन कपात कार्यपद्धती

अधिकारी/कर्मचारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन (माहे ऑक्टोबर, २०२६) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपध्दती प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

  • माहे ऑक्टोबर, २०२६ या महिन्याचे वेतन देयक संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे. तथापि, वेतनातील नियमित वजातीनंतर (उदा. NPS, विमा, आयकर इ.) व एक दिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरीत रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश/रोखीने/विहित पध्दतीने अदा करण्यात यावी.
  • सध्या ज्या अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करुन दिलेल्या त्यांच्या बँक खात्याच्या तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून ऑक्टोबर, २०२६ मधील वेतनातून १ दिवसाचे वेतन कमी करुन शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कळविण्यात यावे.
  • सदर १ दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन व महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावे.
  • वेतन वितरणाच्या वेळी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्या रकमेची नोंद घेण्यासाठी (माहे ऑक्टोबर २०२६ करिता) एक स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यामध्ये वसूल केलेल्या रकमांची नोंद कर्मचारी निहाय घेण्यात यावी.

एक दिवसाचे वेतन कपात गणना कशी होणार? चेक करा

माहे ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची रक्कम वसूल करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. एक दिवसाच्या वेतनाची गणना करताना मूळ वेतन (Basic Pay) आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) यांच्या एकूण रकमेचा आधार घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उदा. एका शासकीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Pay) ₹41,000 आहे आणि महागाई भत्ता (DA) 58% आहे. तर महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी ₹41,000 × 58 ÷ 100 असे केल्यास ₹23,780 महागाई भत्ता मिळतो. त्यामुळे मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून एकूण मासिक वेतन ₹64,780 होते. आता एका दिवसाचे वेतन काढण्यासाठी ₹64,780 ला 30 ने भागल्यास एका दिवसाचे वेतन ₹2,159.33 येते.

खाली दिलेल्या कॅल्क्युलेटरमध्ये तुमचे मूळ वेतन टाका, महागाई भत्त्याचा योग्य दर निवडा आणि गणनेसाठी 30 किंवा 31 दिवस निवडा. त्यानंतर ‘वेतनाची गणना करा’ या बटणावर क्लिक करा. तुमचे एका दिवसाचे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि दोन्ही मिळून होणारे एकूण दैनिक वेतन लगेच दिसेल.

एका दिवसाचे वेतन कॅल्क्युलेटर

मूळ वेतन आणि महागाई भत्त्यानुसार एका दिवसाचे वेतन मोजा.

गणनेचा तपशील

मूळ वेतन ₹41,000.00
महागाई भत्ता दर 58%
मासिक महागाई भत्ता ₹23,780.00
मासिक मूळ वेतन + DA ₹64,780.00
एका दिवसाचे मूळ वेतन ₹1,366.67
एका दिवसाचा DA ₹792.67
एका दिवसाचे एकूण वेतन (Basic + DA) ₹2,159.33

टीप: ही गणना निवडलेल्या 30 किंवा 31 दिवसांच्या आधारावर केली जाते. प्रत्यक्ष वेतन कपात किंवा थकबाकीची गणना संबंधित शासन नियमांनुसार वेगळी असू शकते. इतर भत्ते व कपाती यात समाविष्ट नाहीत.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई दर येथे चेक करा

वेतन कपातीस हरकत असल्यास दोन दिवसांत अर्ज

वेतनातून एक दिवसाचे वेतन वसूल करण्यास हरकत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासन परिपत्रकासोबत दिलेल्या विहित नमुन्यात हरकतपत्र सादर करावे. हे पत्र संबंधित कार्यालयाच्या नियंत्रक किंवा आस्थापना अधिकाऱ्यामार्फत आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे दोन दिवसांच्या आत जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

तसेच, एक दिवसाच्या एकूण वेतनाइतक्या रकमेपेक्षा कमी रक्कम कपात करण्यास परवानगी देऊ नये, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

एक दिवस वेतन कपात हरकतपत्र, प्रमाणपत्र नमूना

एक दिवसाचे वेतन कपात संदर्भातील हरकतपत्र, प्रमाणपत्र नमूना बद्दलची माहिती व नमूना पत्र PDF डाउनलोड करा.

हरकतपत्र: वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास हरकत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विहित नमुना.

One Day Salary Donation Harkat Certificate

परिशिष्ट-अ – आयकर प्रमाणपत्र: देणगीदाराने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या रकमेचे प्रमाणपत्र देण्यासाठी.

One Day Salary Donation Income Tax

परिशिष्ट-ब – कार्यालयनिहाय रकमेचा तपशील: कार्यालयाचे नाव व पत्ता, आहरण व संवितरण अधिकाऱ्याचे नाव, बँक व शाखा, धनादेश किंवा धनाकर्ष क्रमांक, दिनांक आणि रक्कम यांची नोंद करण्यासाठी.

परिशिष्ट-क – जिल्हाधिकारी कार्यालयासाठी देणगीदारांचा तपशील: देणगीदाराचे पूर्ण नाव व पत्ता, बँकेचे नाव व शाखा, धनादेश किंवा धनाकर्षाचा क्रमांक, दिनांक आणि रक्कम यांची नोंद करण्यासाठी.

परिशिष्ट-ड – देणगीदारांची माहिती: अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे नाव, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि देणगीची रक्कम यांची माहिती संकलित करण्यासाठी.

देणगीदारांना आयकर सवलत मिळणार

आयकर अधिनियम, 1961 मधील कलम 80G अंतर्गत देणगीदारांना आयकर सवलतीसाठी पात्र ठरण्याबाबत नमूद केले आहे.

या सवलतीसाठी देणगीदारांची माहिती आयकर विभागाकडे Form 10BD मध्ये विहित मुदतीत सादर करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. माहिती सादर करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 200 रुपये दंड लागू होऊ शकतो.

संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील आणि अधिनस्त शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती परिशिष्ट-डमधील नमुन्यानुसार संकलित करावी.

ही माहिती Excel स्वरूपात २५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे ई-मेलवर पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून जमा करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित केली आहे. या परिपत्रकात वेतनकपात, हरकतपत्र, निधी जमा करणे, देणगीदारांची माहिती आणि आयकर सवलतीसाठी आवश्यक कागदपत्रे यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

एक दिवस वेतन कपात शासन निर्णय हरकतपत्र, प्रमाणपत्र नमूना PDF

राज्यात यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, 2026 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत – एक दिवस वेतन कपात शासन निर्णय हरकतपत्र, प्रमाणपत्र नमूना PDF येथे डाउनलोड करा

Related
अतिरिक्त शिक्षकांसह त्रुटी असलेल्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणाली द्वारे वेतन करणेबाबत – परिपत्रक
शालार्थ प्रणाली वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! ई-केवायसीसाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment