Shalarth Portal ekyc : शालार्थ (Shalarth) प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी eKYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित कार्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या असून, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी e-KYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 चे वेतन (Salary) काढता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता ई केवायसी साठी मुदत वाढविण्यात आले आहे. (Shalarth Portal ekyc Date Extension)
शालार्थ प्रणाली ई-केवायसीसाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ | Shalarth Portal ekyc Date Extension
राज्यातील क्षेत्रियस्तरावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेताला असता, सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि.5 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात. असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने यापूर्वी सेवार्थ (Sevaarth) प्रणालीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी e-KYC अनिवार्य करणारे शासन परिपत्रक जारी केले होते. या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख, बँक खाते (Bank Account), आधार (Aadhaar) आणि PAN यांची माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे. त्यामुळे चुकीच्या खात्यावर वेतन जाणे किंवा एकाच व्यक्तीच्या नावावर चुकीची नोंद होण्याची शक्यता टाळता येईल.

यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती
27 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार एप्रिल 2026 च्या वेतनापूर्वी e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर अनेक विभागांमध्ये प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे 23 एप्रिल 2026 रोजी शासनाने आणखी एक संधी देत मुदत वाढवली होती. त्या वेळी मे 2026 देय जून 2026 च्या वेतनापूर्वी e-KYC पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते आणि त्यानंतर पुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
आता शालार्थ (Shalarth) प्रणालीसाठी नवीन आदेश

28 जुलै 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर शिक्षण संचालनालयाने नवीन पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 च्या वेतनापूर्वी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र आता दि. 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
e-KYC पूर्ण न केल्यास काय होईल?
दि. 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही.
e-KYC करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार e-KYC सुरू करण्यापूर्वी काही बाबी तपासणे आवश्यक आहे.
प्रथम, वेतन जमा होणारे बँक खाते आधार क्रमांकाशी (Aadhaar) लिंक असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवलेला PAN क्रमांक अचूक असावा. चुकीचा PAN असल्यास तो आधी दुरुस्त करून अद्ययावत करावा.
तसेच e-KYC प्रक्रिया संबंधित कर्मचारी यांनी स्वतः पूर्ण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांच्याकडे जमा करावे, अशीही सूचना शासनाने केली आहे.
हे आदेश कोणाला लागू आहे?
हे निर्देश शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या खालील घटकांवर लागू आहेत.
- सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षक.
- जिल्हा परिषद शाळांतील संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
- शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणारे सर्व पात्र कर्मचारी.
शालार्थ प्रणालीतील e-KYC ही आता केवळ औपचारिकता राहिलेली नाही, तर वेतन मिळण्यासाठी आवश्यक अट बनली आहे. त्यामुळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोणतीही विलंब न करता आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. अन्यथा सप्टेंबर 2026 चे वेतन थांबण्याची शक्यता शासनाने स्पष्टपणे नमूद केली आहे.











