Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

15 ऑगस्ट 2026 रोजी कवायत संचलन (विविध उपक्रम) कार्यक्रम घेण्याबाबत आदेश

15 aug Programs Activities: दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमित केले आहे.

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत शासन परिपत्रक दि. ३१ डिसेंबर, २०२४ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तसेच दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.

शासन पत्र दि.२४ जुलै, २०२६ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत.

शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर साधारणतः २० मिनिटांचा सामुहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात यावा. यासाठी आवश्यक मार्गदर्शक व्हिडीओची लिंक सोबत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळास्तरावर कवायत संचलन कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ बाबतची माहिती भरण्यासाठी सुविधा शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील स्कुल पोर्टलमध्ये मुख्याध्यापकांच्या लॉगिन वर उपलब्ध करून दिली जाईल.

कवायत संचलन कार्यक्रमाचा व्यावसायिक माहितीपट (Professional Documentary) तसेच त्याचा डिजिटल अहवाल संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शासनास व या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविले आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी करावे.

तरी, याबाबत आपल्या स्तरावरुन आवश्यक अतिरिक्त सूचना शाळांना देऊन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत परिपत्रक डाउनलोड करा

15 AUG 2026 KAVAYAT SANCHALAN

विविध उपक्रम शासन परिपत्रक | 15 aug Programs Activities

१) प्रभात फेरी : शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी.

२) भाषण स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

३) कविता स्पर्धा : विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे.

४) नृत्य स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

५) चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी.

६) निबंध स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी.

७) खेळ : विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत.

८) प्रदर्शनी : विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी.

उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर अधिकृत शासन परिपत्रक डाउनलोड करा

सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत शासन परिपत्रक दि. ३१ डिसेंबर, २०२४ डाउनलोड करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment