Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इ 2 री ते 12 वी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना – SO2 फॉर्म PDF डाउनलोड

UDISE Plus SO2 Form PDF Download

UDISE Plus SO2 Form PDF Download : यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य कार्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आले असून, यासाठी SO2 फॉर्म PDF Download लिंक या लेखात दिली आहे.

SO2 प्रपत्र भरून घेण्याची सुविधा उपलब्ध

केंद्र शासनामार्फत इयत्ता २री ते १२वीपर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी तालुका स्तरावरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये तालुका स्तरावरून इयत्ता २री ते १२वीपर्यंत विद्यार्थ्यांचे नोंदणी पूर्ण करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याकरिता केंद्र शासनाने मुख्याध्यापकांकडून SO2 प्रपत्र भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यानुसार सदरचे प्रपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांकडून भरून घेण्यात यावे. तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी झालेली नसल्याची खात्री करून घेण्यात यावे. त्यानंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावरील MIS-Coordinator/Data Entry Operator यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर SO2 प्रपत्र तालुका स्तरावर जतन करून ठेवण्यात यावे. अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

इयत्ता २री ते १२वीपर्यंत च्या विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची कार्यवाही दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ केंद्र शासनाकडून देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच, जिल्ह्यातील इयत्ता २री ते १२वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद झाली आहे, याची खात्री करून घेण्यात यावी.

UDISE Plus SO2 Form PDF Download

UDISE Plus SO2 Form म्हणजे UDISE+ प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या इयत्ता २री ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांची विद्यार्थी नोंदणी पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे प्रपत्र आहे.

UDISE Plus SO2 Form PDF Download

UDISE Plus SO2 Form PDF Download

अधिक माहितीसाठी: यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता 2 री ते 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा

UDISE Plus SO2 Form mpsp Circuler
UDISE Plus SO2 Form mpsp Circuler

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment