Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

संचमान्यता २०२६-२७ च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाच्या सूचना

संचमान्यता २०२६-२७ च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाच्या सूचना याबाबतचे परिपत्रक जारी

Sanch Manyata Update

Sanch Manyata Update : सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत शिक्षण संचलनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडून राज्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) केंद्रप्रमुख (सर्व) यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.

संचमान्यता २०२६-२७ च्या अनुषंगाने कामकाजाबाबत सूचना

वरील विषयांच्या अनुषंगाने कळविण्यात आले आहे की, सन २०२५-२६ च्या संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ व शासनस्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ च्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार यु-डायस पोर्टलवरील नोंद असलेल्या दि.३० सप्टेंबर, २०२६ रोजी पटावर नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सन २०२६-२७ च्या योग्य संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशिल, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण व इतर माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.

तद्‌नुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी तपशील, सरल व यु-डायस पोर्टलवरील तपशील क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणेच्या सहयोगाने दि.१६.०९.२०२६ पूर्वी अद्यावत करण्याची कार्यवाही करावी.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी तपशील, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण या व इतर आवश्यक माहिती अद्यावत करतांना एकसमान राहील, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

संच मान्यता सुधारित निकष 15 मार्च शासन निर्णय

Sanch Manyata 2026-27 Circuler

संच मान्यतेच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर

राज्यातील शालेय शिक्षण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते.

यासाठी सरल प्रणालीतील विद्यार्थी प्रणाली, शाळा प्रणाली तसेच शाळेचा प्रकार आणि विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती विचारात घेतली जाते. शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले निकष विचारात घेऊन इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीपर्यंतच्या वर्गांची, साधारणपणे ३० सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळानिहाय शिक्षक व शिक्षकेतर पदांची संच मान्यता निश्चित केली जाते.

प्राथमिक शाळांची संच मान्यता संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिनवर, तर माध्यमिक शाळांची संच मान्यता संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिली जाते.

संबंधित शिक्षणाधिकारी त्यांच्या अधिनस्त शाळांना संच मान्यता वितरित करतात. प्रशासन, शाळा व्यवस्थापन तसेच संबंधित शाळांना ऑनलाइन संच मान्यतेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करता येणार आहे.

संच मान्यता ही शाळेतील मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदांची माहिती निश्चित करण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून, उपलब्ध करून देण्यात आलेल्या संच मान्यता माहिती संकेतस्थळाचा सर्व संबंधितांना चांगला उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी : संच मान्यता (Sanch Manyata) पोर्टल (1 to 10) आणि संच मान्यता (Sanch Manyata) पोर्टल (11 to 12) येथे भेट द्या.

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment