Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

iGOT Karmayogi Courses Login Viksit Maharashtra 2047 Step by Step Guide 2026

iGOT Karmayogi Courses Viksit Maharashtra 2047 Step by Step Guide 2026

iGOT Karmayogi Courses Login Guide 2026 : कर्मयोगी भारत (IGOT Karmayogi) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकसित महाराष्ट्र ई-लर्निंग मॉड्यूल (Viksit Maharashtra-२०४७ E-Learning Module) हा महत्त्वपूर्ण कोर्स सुरु करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील आणि त्याअंतर्गत येणा-या सर्व कार्यालयांमधील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी हा कोर्स दि. 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या लेखात iGOT Karmayogi Courses Login Guide, Viksit Maharashtra Courses Enroll, Certificate Download Step by Step Guide Official Direct Link सविस्तर माहिती दिलेली आहे.

iGOT Karmayogi ॲप म्हणजे काय? (About App)

iGOT Karmayogi हे केंद्र सरकारच्या Mission Karmayogi – National Programme for Civil Services Capacity Building या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले ऑनलाइन शिक्षण आणि प्रशिक्षण व्यासपीठ आहे.

हे ॲप विशेषतः शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाशी संबंधित विविध विषयांचे ज्ञान, नवीन कौशल्ये आणि प्रशासकीय कार्यक्षमता विकसित करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.

या ॲपवर विविध विषयांवरील शेकडो ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध असून, कर्मचारी आपल्या सोयीनुसार कधीही आणि कुठूनही प्रशिक्षण घेऊ शकतात.

iGOT Karmayogi ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये

1. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्यासपीठ : हे ॲप केवळ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

2. विविध ऑनलाइन अभ्यासक्रम : प्रशासकीय कामकाज, व्यावसायिक कौशल्ये, विषयज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

3. ऑनलाइन प्रशिक्षण : व्हिडिओ आणि इतर डिजिटल माध्यमांतून स्वतःच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येते.

4. चाचणी व मूल्यमापन : अभ्यासक्रम पूर्ण करताना प्रश्नमंजुषा (Quiz), असाइनमेंट (Assignment) आणि मूल्यमापन (Assessment) यांचा समावेश असतो.

5. सुलभ वापर : ॲपचा इंटरफेस वापरण्यास सोपा असून, विविध अभ्यासक्रम सहजपणे शोधता येतात.

6. नियमित अद्ययावत माहिती : कर्मचाऱ्यांच्या ज्ञान आणि कौशल्यविकासासाठी अभ्यासक्रमांमध्ये वेळोवेळी नवीन माहितीचा समावेश केला जातो.

iGOT Karmayogi App Download Latest Version Click Here

iGOT Karmayogi Courses Viksit Maharashtra 2047 E-Learning Module

विकसित महाराष्ट्र २०४७
By Yashwantrao Chavan Academy of Development Administration (YASHADA)

Viksit Maharashtra 2047 E-Learning Module Description

भारताच्या स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र @2047’ हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.

हे व्हिजन डॉक्युमेंट शासकीय विभाग, उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती, खासगी व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिक यांच्या सल्लामसलतीतून विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या दीर्घकालीन, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हे व्हिजन ४ धोरणात्मक स्तंभ आणि १६ प्रमुख विषयांवर आधारित आहे.

प्रशासनाच्या सर्व स्तरांवर या व्हिजनचा प्रभावी प्रसार आणि त्याची सुलभ समज निर्माण करण्याच्या उद्देशाने ही ई-लर्निंग सामग्री विकसित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षणार्थींना ‘विकसित महाराष्ट्र @2047’ या व्हिजनची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विकासाची दिशा, भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे अपेक्षित योगदान, राज्याची प्राधान्य क्षेत्रे तसेच महाराष्ट्राच्या परिवर्तनाला गती देणारे प्रमुख उपक्रम आणि धोरणात्मक हस्तक्षेप यांची समग्र माहिती मिळेल.

Learning Outcome

  • ‘विकसित महाराष्ट्र @2047’ या व्हिजनची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि त्याचा ‘विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी असलेला संबंध स्पष्ट करणे.
  • महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेले ४ धोरणात्मक स्तंभ आणि १६ प्रमुख विषय समजून घेणे.
  • महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चित करण्यात आलेली प्राधान्य क्षेत्रे आणि धोरणात्मक दिशा समजून घेणे.
  • ‘विकसित महाराष्ट्र @2047’ अंतर्गत राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला गती देण्यासाठी राबविण्यात येणारे प्रमुख उपक्रम आणि धोरणात्मक हस्तक्षेप ओळखणे.
  • ‘विकसित महाराष्ट्र @2047’ या व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रशासनाची भूमिका आणि योगदान समजून घेणे.

अभ्यासक्रमातील मॉड्यूल आणि मूल्यमापन पद्धती

‘विकसित महाराष्ट्र @2047’ या ई-लर्निंग अभ्यासक्रमामध्ये एकूण 5 मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक मॉड्यूलमध्ये संबंधित विषयाची माहिती व्हिडिओद्वारे दिली जाणार असून, त्यानंतर चिंतन चाचणी (Assessment) घेण्यात येणार आहे.

1. अभ्यासक्रमातील मॉड्यूल

अ.क्र.मॉड्यूलचे नावकालावधी
1विकसित महाराष्ट्र 2047 – परिचय23 मिनिटे 51 सेकंद
2प्रगतीशील स्तंभ40 मिनिटे 30 सेकंद
3शाश्वत स्तंभ33 मिनिटे 11 सेकंद
4सर्वसमावेशक स्तंभ34 मिनिटे 44 सेकंद
5सुशासन स्तंभ28 मिनिटे 16 सेकंद

एकूण व्हिडिओ कालावधी : 2 तास 40 मिनिटे 32 सेकंद.

2. मूल्यमापन पद्धती (Assessment)

या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींनी शिकलेल्या विषयांचे आकलन तपासण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये मूल्यमापनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • चिंतन चाचणी (Reflection Assessment) : पहिल्या मॉड्यूलनंतर 5 प्रश्नांची चाचणी देण्यात आली आहे.
  • अंतिम मूल्यमापन (Final Assessment) : पाचही मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर 10 प्रश्नांची अंतिम मूल्यमापन चाचणी आहे.

Viksit Maharashtra 2047 E-Learning Module हा कोर्स कोणासाठी आहे?

iGOT Karmayogi Courses Viksit Maharashtra 2047 Circuler

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील आणि त्याअंतर्गत येणा-या सर्व कार्यालयांमधील संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी हा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.

iGOT Karmayogi ॲपवर नोंदणी कशी करावी? (Registration Process)

igot karmayogi android app

iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी खालील चार स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात.

टीप: iGOT Karmayogi App/Portal साठी बहुतेक सर्वांचे यापूर्वी Registration झालेले आहे. त्यामुळे Login With OTP पर्याय निवडून तुम्ही खाली दिलेल्या स्टेप नुसार लॉगिन करू शकता.

iGOT Karmayogi  Registration Process

Step 1 : शासकीय ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करा.

iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे अधिकृत शासकीय ई-मेल आयडी (Government Email ID) असणे आवश्यक आहे. या ई-मेल आयडीचा वापर करून आपण प्लॅटफॉर्मवर आपले खाते तयार करू शकता.

Step 2 : शासकीय ई-मेल आयडी नसल्यास काय करावे?

आपल्याकडे शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध नसेल, तर आपल्या कार्यालयातील किंवा संबंधित विभागातील MDO Admin (Nodal Administrator) यांच्याशी संपर्क साधावा.

MDO Admin यांच्या मदतीने आपली नोंदणी मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक ई-मेल आयडीच्या माध्यमातून करून घेता येते.

Step 3 : MDO Admin यांची माहिती कशी मिळवावी?

आपल्या कार्यालयातील MDO Admin यांचे नाव आणि संपर्कासंबंधी माहिती मिळवण्यासाठी iGOT Karmayogi च्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरील Click Here या पर्यायावर क्लिक करा. किंवा आपल्या तालुका/मनपा स्तरावरील शासकीय विभागातील तालुका नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करा.

iGOT Karmayogi Courses Login Guide | Viksit Maharashtra-2047 E-Learning Module

iGOT Karmayogi App Download Login Guide
  • त्यानंतर Login ऑप्शन निवडून Login with OTP यावर क्लिक करा
iGOT Karmayogi App Sign in Guide
  • तिथे तुमचा नोंदणी असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि OTP टाकून लॉगिन करा
iGOT Karmayogi App Sign in Guide OTP
  • आता लॉगिन केल्यानंतर Searches Courses Tab मध्ये Viksit Maharashtra-2047 E-Learning Module हा कोर्स सर्च करा
iGOT Karmayogi App Viksit Maharashtra-2047 E-Learning Module
  • आता कोर्स Enroll करा आणि टास्क पूर्ण करून कोर्स Complete करा
  • शेवटी प्रमाणपत्र डाउनलोड करा

iGOT Karmayogi Courses Certificate Download

iGOT Karmayogi App किंवा Portal मार्फत लॉगिन करून तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर Certificate Download कसे करायचे? याबबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम iGOT Karmayogi App किंवा Portal द्वारे लॉगिन करा (लॉगिन प्रक्रिया वरील प्रमाणे)
  • त्यानंतर My Learning या टॅब मध्ये क्लिक करा
iGOT Karmayogi My Learning
  • आता तिथे Contents ऑप्शन दिसेल त्यामध्ये In Progress मध्ये तुम्ही सध्या सुरू केलेले कोर्स चे Details दिसतील. त्याबाजूला Completed ऑप्शन निवडा
iGOT Karmayogi  Certificate Download
  • आता तुम्ही कोर्स पूर्ण केलेली लिस्ट दिसेल त्यासमोर/खाली Certificate Download यावर क्लिक करा आणि तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या.

निष्कर्ष

‘विकसित महाराष्ट्र @2047’ हा अभ्यासक्रम महाराष्ट्राच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाची दिशा समजून घेण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. iGOT Karmayogi या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित पाच मॉड्यूलचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची उद्दिष्टे, शासनाची धोरणात्मक दिशा आणि प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका समजून घेण्यास मदत होणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील तसेच अधिपत्याखालील सर्व कार्यालयांमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा अभ्यासक्रम 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वेळेत iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सर्व मॉड्यूल आणि अंतिम मूल्यमापन पूर्ण करावे.

कारण विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग, योग्य प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

Related
AI Saathi for Educators DIKSHA Course 2026 : Enroll Link

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment