Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलणार?

Anganwadi Sevika Madatnis Protsahan Bhatta

Anganwadi Sevika Madatnis Protsahan Bhatta 2026: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रोत्साहन भत्त्याचे निकष अधिक परिणामकारक करण्यासाठी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, बालकांची उपस्थिती आणि गृहभेटी अशा विविध कामांचा विचार करून सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सध्या किती मिळतो प्रोत्साहन भत्ता?

राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. हा भत्ता १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आला आहे.

सध्याच्या तरतुदीनुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा ₹१,५०० ते ₹२,०००, तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा ₹५०० ते ₹१,००० इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

राज्यात किती अंगणवाडी कर्मचारी कार्यरत?

राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, आरोग्य आणि विकास तसेच गर्भवती मातांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी यंत्रणा कार्यरत आहे.

राज्यात एकूण १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत.

कोणत्या निकषांमध्ये होऊ शकते सुधारणा?

प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष ठरवताना पोषणविषयक कामे, आरोग्यविषयक सेवा, पूर्वशालेय शिक्षण, बालकांची उपस्थिती आणि गृहभेटी यांसारख्या कामांचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या निकषांच्या आधारे प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे मूल्यमापन आणि प्रोत्साहन भत्त्याची पद्धत यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

इतर योजनांचाही आढावा

या बैठकीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांचाही आढावा घेण्यात आला. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीबाबतही मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या बैठकीस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related
अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट; ग्रॅच्युइटी आणि वयोमर्यादा 60 वर्षे करण्याबाबत शासन सकारात्मक
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळी बोनस (भाऊबीज भेट) मंजूर
अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी मोठी अपडेट! ऑक्टोबर महिन्याच्या मानधनासाठी निधी मंजूर!

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment