Varishtha Nivad Vetan Shreni Prashikshan Schedule 2026-27: वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना राज्यातील सर्व DIET व जिल्हा परिषद कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता दिवाळी सुट्टीत सदर प्रशिक्षण नियोजित आहे. आजच्या या लेखात वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वेळापत्रक, प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन गुणांकन आणि मार्गदर्शक सूचना काय आहेत? सविस्तर पाहूया.
Table of Contents
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वेळापत्रक
राज्यातील जिल्हा स्तरावर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिनांक २८ ऑक्टोंबर २०२६ अखेर संपन्न झालेले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य यांना देण्यात येणारे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक १३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नियोजित आहे.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन
एकूण गुणः २००
उत्तीर्णतेचा निकषः ५०%
टप्पेः प्रशिक्षणकाळ व प्रशिक्षणोत्तर
प्रशिक्षणकाळातील मूल्यमापन – १०० गुण
- तंत्रज्ञानाचा वापर (५ स्वाध्याय) – ५० गुण
- लेखी परीक्षा – ५० गुण
प्रशिक्षणोत्तर काळातील मूल्यमापन – १०० गुण
- ५ लेखी स्वाध्याय- ५० गुण
- प्रकल्प / संशोधन
- अहवाल – ५० गुण
उत्तीर्णतेचे निकष
- किमान २५/५० गुण + प्रत्येक स्वाध्ययात किमान ५ गुण
- किमान २५/५० गुण (लेखी परीक्षा)
- किमान २५/५० गुण + प्रत्येक स्वाध्ययात किमान ५ गुण
- किमान २५/५० गुण (प्रकल्प संशोधन उपक्रम)
५०% पेक्षा कमी गुण मिळाल्यास… अनुत्तीर्णः पुन्हा नोंदणी व शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
मार्गदर्शक सूचना
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षण पूर्वतयारी
१) प्रशिक्षणाचे जिल्हयाचे प्रमुख म्हणून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे कामकाज पाहतील, तर तालुकास्तरचे प्रशिक्षण केंद्र समन्वयक म्हणून प्रशिक्षणाची जबाबदारी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यांची राहील. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता हे पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून प्रशिक्षणाचे संनियंत्रण करतील. तसेच आवश्यकता असल्यास केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी / गटशिक्षणाधिकारी/अध्यापकाचार्य यांनाही केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवावी.
२) प्रशिक्षणासंदर्भात नियोजन करण्यासाठी परिषदेमार्फत देण्यात आलेल्या पोर्टलद्वारे आपल्या जिल्ह्यातील स्तरनिहाय (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकारनिहाय (वरिष्ठ व निवड) प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आपल्याला उपलब्ध झाली आहे.
३) तालुकास्तरावर प्रशिक्षणार्थी संख्येनुसार अथवा स्थानिक परिस्थितीनुसार एकत्र करून पुरेशाप्रमाणात सुविधा असणारे प्रशिक्षणस्थळ निश्चित करावे.
४) एका प्रशिक्षण ठिकाणी किमान १ वर्ग (५० प्रशिक्षणार्थी) व कमाल ४ वर्ग (२०० प्रशिक्षणार्थी) यामयदित नियोजन करावे, स्तरनिहाय व प्रशिक्षण प्रकारनिहाय वर्गांची निश्चिती करावी. प्रशिक्षण वर्ग निवड करताना तळमजल्यावरील वर्गाची निवड करावी.
५) प्रशिक्षणस्थळ निवड करताना वर्गाची स्वच्छता, पिण्याचे पाण्याची सुविधा, स्वतंत्र स्वच्छतागृह या सुविधांबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता प्रशिक्षण प्रमुख यांनी घ्यावी.
६) प्रशिक्षणार्थ्यांना देण्याचे वाचनसाहित्य व सुलभकांसाठीचे घटकसंच पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहेत यांची खात्री करावी.
७) प्रशिक्षणार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व भौतिक सुविधायुक्त असे योग्य प्रशिक्षणाचे स्थळ निश्चित करावे. (उदा. LCD प्रोजेक्टर असलेले वर्ग, स्मार्ट क्लास रूम, प्रिंटर व आवश्यक बाबी)
८) प्रशिक्षणस्थळी सक्षम इंटरनेटची व्यवस्था असावी.
९) पी.पी.टी. दाखवण्यासाठी एल. सी. डी. प्रोजेक्टरची (व्हिडिओ/ऑडिओ) सोय प्रशिक्षणाच्या ठिकाणी करावी. (प्रत्येक कक्षात १ LCD प्रोजेक्टर)
१०) आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवरील लॉगिनच्या माध्यमातून सुलभक यादी (Trainers List), प्रशिक्षण स्थळ (Training Center), केंद्र समन्वयक (Co-ordinator List) इत्यादी बाबी दिनांक ०५/११/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अद्ययावत करण्यात यावी.
११) प्रत्येक वर्गाचे प्रत्येकी सहा ते सात प्रशिक्षणार्थी याप्रमाणात आठ गट तयार करावेत. दोन गटास एक याप्रमाणे सुलभकाची नेमणूक करावी. प्रत्येक सुलभकाने आपल्या गटातील प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणा दरम्यान आणि प्रशिक्षणोत्तर कार्याचे निकषावर आधारित मूल्यांकन करणे अपेक्षित आहे तशी सूचना सुलभकांना द्यावी,
१२ ) प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी प्रशिक्षणार्थ्यांला पुढील सूचना पत्राद्वारे निर्गमित करण्यात याव्यात.
- अ) प्रशिक्षणाचे स्थळ, दिनांक व वेळ कळविण्यात यावे. प्रणालीच्या माध्यमातून इ मेल पाठवावेत.
- ब) तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना भोजन अल्पोपहार सुविधा नसल्याचे पूर्वसूचित करणेत यावे.
- क) प्रशिक्षणला येण्यापूर्वी स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद, वही सोबत आणावी. ड) प्रशिक्षणार्थ्यांने पूर्व व उत्तर चाचणी मोबाइलद्वारे सोडविणे आवश्यक आहे.
- ई) आपण शिकवत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका सोबत असाव्यात (वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी) ए) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळामूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF), यासारखे साहित्य परिषदेच्या संकेत स्थळावरील (www.maa.ac.in) सदर साहित्याचे वाचन करावे.
प्रशिक्षणादरम्यान
१) प्रशिक्षण नियोजनाप्रमाणे सुरु आहे याविषयीचा आढावा समन्वयकांमार्फत घेणे व आवश्यक सूचना देणे.
२) प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण साहित्याचे वाटप करणे. साहित्य मिळाल्याची पोहच घेणे.
३) प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्याबद्दलची तासीका निहाय दैनिक स्वाक्षरी पत्रक प्रशिक्षण पोर्टलवरून डाउनलोड करून ती प्रत्येक तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होईल असे पहावे. प्रत्येक तासिके दरम्यान स्वाक्षरी घेऊन तासिकानिहाय उपस्थितीची नोंद पोर्टलवर विहीत वेळेमध्येच अपलोड करावी.
४) अपलोड न केलेले अथवा प्रलंबित उपस्थितीपत्रक अपलोड करण्याची सुविधा दिली जाणार नाही.
५) प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणीचे नियोजन परीक्षापद्धतीप्रमाणे करावे.
६) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात यावे.
७) प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय व प्रकल्प / कृतिसंशोधन नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर (४० दिवसांत) आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थात जमा करणेविषयीची तारीख, वेळ याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
प्रशिक्षणानंतर
१) प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून पाच स्वाध्याय व प्रकल्प/ कृतिसंशोधन / नवोपक्रम अहवाल जमा करुन घ्यावेत.
२) आपल्या केंद्रावरील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या कडून पाच स्वाध्याय व प्रकल्प / कृतिसंशोधन नवोपक्रम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या केंद्रावरील सुलभकांना तपासणी, गुणांकन आणि तक्त्यात गुणांची नोंद करण्याकरीता दोन दिवसांसाठी निमंत्रित करण्यात यावे.
३) गुणांची नोंदणी करताना काळजीपूर्वक करावी तथापि एकदा नोंदविण्यात आलेले गुण कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षण खर्च
१) वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिनांक १३/११/२०२६ ते दिनांक २२/११/२०२६ या कालावधीत एकाच टप्प्यात आयोजित करावे.
२) प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ५० प्रशिक्षणार्थी चा एक वर्ग करण्यात यावा व त्यानुसारच पोर्टलवर batches नोंदणी करावी.
३) अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यचे १० दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत आयोजित केले जाईल याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करणेत यावेत.
४) कला व क्रीडा शिक्षकाचे तालुकास्तरीय ७ दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत (दिनांक १३ नोव्हें. ते १९ नोव्हें. एकूण ०७ दिवस) होईल. त्यांच्या मुल्याकन व उपस्थिती बाबतच्या नोंदी संबधित जिल्ह्याने ठेवाव्यात, तसेच विभाग स्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कला व क्रीडा शिक्षकांना दिनांक १९ नोव्हें. रोजी कार्यमुक्त करण्यात यावे.
५) कला व क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण दिनांक २० नोव्हें.. ते २२ नोव्हें. या कालावधीत विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याचेमार्फत आयोजित केले जाईल. संबधित विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
८) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना देण्यात येणाऱ्या निधीची बाबनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.

तरी वरील सूचनांप्रमाणे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व तालुकास्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण विहित कालावधीमध्ये सर्व सूचनांच्या काटेकोर पालनासह करण्यात यावे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीची विहित मयदित खर्च करण्यात यावा.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण शासन निर्णय व वेळापत्रक PDF
- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना परिपत्रक PDF डाउनलोड करा
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी संदर्भातील परिपत्रक डाउनलोड करा
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी डायरेक्ट लिंक
- राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रि-स्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 20-07-2021 शासन निर्णय
- अधिकृत वेबसाईट : https://www.maa.ac.in/














