SHWP Registration : आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health and Wellness Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची लिंकद्वारे नोंदणी करणेबाबत SCERT, Pune कार्यालयाकडून नवीन परिपत्रक काढून कळविण्यात आले आहे.
नवीन अपडेट : शालेय आरोग्य कार्यक्रम (SHWP Online Training) ऑनलाईन प्रशिक्षण वेळापत्रक जाहीर Pre Test Guide
शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण नोंदणी करणेबाबत
भारत सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने “आयुष्मान भारत” या उपक्रमांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) सुरु करण्यात आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय (स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळासह) व शासन अनुदानित शाळांमध्ये शालेय आरोग्य प्रोत्साहन कार्यक्रम इ. ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे.
सदर कार्यक्रमामध्ये अध्यापनाच्या नियमित अभ्यासक्रमाचा समावेश असेल तसेच शालेय आरोग्य कार्यक्रम सत्राचा समावेश हा नियमित वेळापत्रकातय असेल. सशक्त राष्ट्रनिर्मितीचे खालील उदिष्टे समोर ठेवून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. परिपत्रकातील संदर्भीय क्र. २ नुसार सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी निधी प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर, वर्धा अशा एकूण ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. या ११ जिल्ह्यातील १,३३,५५ शाळेतील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचेसाठी एकूण ४०,०६५ शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण साहित्य कीटचे वाटप करण्यात आले आहे.
वरील जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness Ambassador) म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तथापि, उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक व एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक यांची आरोग्यवर्धिनी दूत म्हणून तात्काळ नियुक्ती करून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निकषातील शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांची पुढील लिंकद्वारे विहित कालावधीत १००% नोंदणी करणेबाबतची संपूर्ण कार्यवाही करावी.
सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे प्रत्येक शाळेतील प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक यांनी स्वतःची नोंदणी करून शाळेतील दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्त्री) यांची पुढे दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करावी. खालील लिंकद्वारे दिनांक २४ ऑगस्ट, २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीचा संपर्कासाठी स्वतःचा mail id आवश्यक असून लिंकवर तो देण्यात यावा. सदर प्रशिक्षणासाठी निकषाप्रमाणे १००% नोंदणी होणेबाबत आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
School Health and Wellness Programme Registration Link

शालेय आरोग्य कार्यक्रम (SHP) नोंदणीसाठी लिंक: https://scertmaha.ac.in/shp
शालेय आरोग्य कार्यक्रम पोर्टलवरील आवश्यक माहिती
१) Home: सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक, धोरणे, उद्दिष्टे याविषयी माहिती दिलेली आहे.
२) Register School: सदर टॅबमध्ये स्कूल युडायस कोड देण्यात आला असून आपल्या शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, पिनकोड व प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
३) Pre Test: सदर टॅबमध्ये शाळेचा यु डायस कोड नोंदवल्यानंतर नोंदणी केलेल्या मुख्याध्यापक व शाळेतील दोन शिक्षक यांची नावे दिसतील त्यासमोर Go To Pre Test हा स्वतंत्र Tab दिसेल. यावरती क्लिक करून सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. सदर PreTest ही मराठी व इंग्रजी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी Pre Test दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत भरणे बंधनकारक आहे. PreTest सबमिट केल्यानंतरच आपणास सत्रास उपस्थिती लावता येईल.
४) Training Material: सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रशिक्षण साहित्याची मराठी व
इंग्रजी भाषेमध्ये यादी दिलेली आहे. उदा. पोस्टर्स, अभ्यासक्रम, उपक्रम पुस्तिका, उपक्रम दिनदर्शिका, प्रशिक्षण घटकसंच इत्यादी. यांचा वापर करून सदर प्रशिक्षण साहित्य आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. मराठी भाषेमधील प्रशिक्षण साहित्य संच आपल्या शाळेवर पोहोच झालाच आहे.
५) Coordinator: सदर टॅबमध्ये जिल्हास्तरीय शालेय आरोग्य कार्यक्रम समन्वयक यांची नावे, संपर्क क्रमांक दिलेले आहेत.
६) Schedule: सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमातील PreTest पूर्ण करून सबमिट केल्यानंतरच सत्र (Session) जॉईन करता येईल. प्रत्येक सत्र जॉईन करण्यासाठी एक ते अकरा Theme मधील दिलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार सदर Theme क्रमांकातील जॉईन वरती क्लिक करून सत्राची उपस्थिती नोंदविता येईल. प्रत्येक सत्रात उपस्थिती बंधनकारक आहे.
Post Test दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत भरून सबमिट करणे अनिवार्य आहे.
School Health and Wellness Programme Time Table 2026

School Health and Wellness Programme Pre Test Guide 2026



अधिक माहितीसाठी : शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health and Wellness Programme) संदर्भातील परिपत्रक डाउनलोड करा













