School Health and Wellness Programme (SHWP) Online Training 2026 : आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत म्हणून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुषंगाने Pre Test Guide तसेच याबाबतचे प्रशिक्षण वेळापत्रक याबाबत सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
Table of Contents
शालेय आरोग्य कार्यक्रम काय आहे?
भारत सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने “आयुष्मान भारत” या उपक्रमांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health and Wellness Programme) सुरू करण्यात आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह) व शासन अनुदानित शाळांमध्ये शालेय आरोग्य प्रोत्साहन कार्यक्रम इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जात आहे.
सदर कार्यक्रमामध्ये अध्यापनाच्या नियमित अभ्यासक्रमाचा समावेश असेल तसेच शालेय आरोग्य कार्यक्रम सत्राचा समावेश हा नियमित वेळापत्रकातच असेल. सशक्त राष्ट्रनिर्मितीचे खालील उद्दिष्टे समोर ठेवून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निधी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर व वर्धा अशा एकूण ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.
उपरोक्त ११ जिल्ह्यांतील १३३५५ शाळेतील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांचेसाठी एकूण ४००६५ शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण साहित्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
School Health and Wellness Programme ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन
School Health and Wellness Programme Online Training उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness Ambassador) म्हणून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तथापि, उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक व एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक यांची आरोग्यवर्धिनी दूत म्हणून तात्काळ नियुक्ती करून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निकषातील शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांची लिंकद्वारे विहित कालावधीत १००% नोंदणी करण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.
लिंकद्वारे नोंदणी करण्याबाबत दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तदनुषंगाने सद्यस्थितीत बहुतांश शाळांनी संगणकीय प्रणालीवर नोंदणी केली आहे.
SHWP Online Training Date
संबंधित जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह) व शासकीय अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींचे ऑनलाइन प्रशिक्षण दि. २१/०९/२०२६ ते २४/०९/२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सदर ऑनलाइन प्रशिक्षणासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेळापत्रक सोबत दिले आहे, त्याचे अवलोकन व्हावे.
शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेळापत्रक | SHWP Training Time Table
School Health and Wellness Programme ऑनलाइन प्रशिक्षण दि. २१/०९/२०२६ ते २४/०९/२०२६ या कालावधीत खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे.

शालेय आरोग्य कार्यक्रम पोर्टलवरील आवश्यक माहिती
१) Home :
सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक, धोरणे, उद्दिष्टे याविषयी माहिती दिलेली आहे.
२) Register School :
सदर टॅबमध्ये स्कूल युडायस कोड देण्यात आला असून आपल्या शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, पिनकोड व प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
३) Pre Test :
सदर टॅबमध्ये शाळेचा युडायस कोड नोंदवल्यानंतर नोंदणी केलेल्या मुख्याध्यापक व शाळेतील दोन शिक्षक यांची नावे दिसतील. त्यासमोर Go To Pre Test हा स्वतंत्र Tab दिसेल.
यावरती क्लिक करून सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. सदर Pre Test ही मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
सर्व प्रशिक्षणार्थींनी Pre Test दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत भरणे बंधनकारक आहे. Pre Test सबमिट केल्यानंतरच आपणास सत्रास उपस्थिती लावता येईल.
४) Training Material :
सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रशिक्षण साहित्याची मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये यादी दिलेली आहे.
उदा. पोस्टर्स, अभ्यासक्रम, उपक्रम पुस्तिका, उपक्रम दिनदर्शिका, प्रशिक्षण घटकसंच इत्यादी.
यांचा वापर करून सदर प्रशिक्षण साहित्य आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. मराठी भाषेमधील प्रशिक्षण साहित्य संच आपल्या शाळेवर पोहोच झाला आहे.
५) Coordinator :
सदर टॅबमध्ये जिल्हास्तरीय शालेय आरोग्य कार्यक्रम समन्वयक यांची नावे, संपर्क क्रमांक दिलेले आहेत.
६) Schedule :
सदर टॅबमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमातील Pre Test पूर्ण करून सबमिट केल्यानंतरच सत्र (Session) जॉईन करता येईल.
SHWP Training Pre Test Guide



Pre-Test for School Health and Wellness Program Link
प्रत्येक सत्र जॉईन करण्यासाठी एक ते अकरा Theme मधील दिलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार सदर Theme क्रमांकातील Join वरती क्लिक करून सत्राची उपस्थिती नोंदविता येईल.
प्रत्येक सत्रात उपस्थिती बंधनकारक आहे.
Post Test दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत भरून सबमिट करणे अनिवार्य आहे.
सदर ऑनलाइन प्रशिक्षणासाठी राज्यस्तरावरील आरोग्य व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे १००% मुख्याध्यापक व प्रशिक्षणार्थी दोन शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षणातील प्रत्येक सत्रास १५ मिनिटे वेळे अगोदर उपस्थित राहतील, याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांचेवर निश्चित करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर या प्रशिक्षणाचे परिपत्रक, मार्गदर्शक सूचना आणि SHWP पोर्टल वर तुम्ही भेट देवू शकता.













