Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

शालेय शिक्षण ३ री ते १० वी विज्ञान प्रयोग व कृतींची यादी PDF डाउनलोड

शालेय शिक्षण इयत्ता ३ री ते १० वी च्या वर्गासाठी विज्ञान विषयातील प्रयोग व कृतींची यादी PDF Download लिंक दिलेली आहे.

Science Experiments Activities

Science Experiments Activities List For School: शालेय शिक्षण इयत्ता ३ री ते १० वी च्या वर्गासाठी विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना विविध संकल्पना प्रत्यक्ष कृती व प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेता याव्यात, यासाठी आवश्यक विज्ञान प्रयोग व कृतींची यादी देण्यात आली आहे. या कृतींमधून विद्यार्थ्यांना निरीक्षण, प्रयोग करणे, तुलना करणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे यांचा अनुभव मिळतो. तसेच इयत्ता निहाय PDF डाउनलोड लिंक देखील दिली आहे.

इयत्ता ३ री प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 3 PDF

Science Experiments Activities List For School std 3rd

इयत्ता : ३ री

विषय : परिसर अभ्यास

घटक: पाण्याविषयी थोडी माहिती

  1. प्रयोगाचे शीर्षक: काकडी आणि लिंबू यांच्या रसातही पाणी असते.
  2. प्रयोगाचे शीर्षक: पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ ओळखणे
  3. प्रयोगाचे शीर्षक: द्रवाला स्वतःचा आकार नसतो
  4. प्रयोगाचे शीर्षक: पाण्याचे स्थायू रूपातून द्रवरूपात रूपांतर होणे
  5. प्रयोगाचे शीर्षक: हवेत बाष्प असते.
  6. प्रयोगाचे शीर्षक: काही पदार्थ पाण्यात विरघळतात.

Science Experiments Activities List For School std 3rd Download Here

इयत्ता ४ थी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 4 PDF

Science Experiments for Class 4 page 1
Science Experiments for Class 4 page 2
Science Experiments for Class 4 page 3

प्रयोग क्रमांक १ घटक: सजीवांचे परस्परांशी नाते

  • प्रयोगाचे शीर्षक: गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यास वनस्पती कुजतात

प्रयोग क्रमांक २ घटक: छोटे आजार, घरगुती उपचार

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: द्रावण तयार करणे/जलसंजीवनी / ORS तयार करणे

प्रयोग क्रमांक ३ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: सोडावॉटर बॉटल कार्य

प्रयोग क्रमांक ४ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: तरंगणाऱ्या व बुडणाऱ्या वस्तु ओळखणे

प्रयोग क्रमांक ५ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: गढूळ पाण्यातील पदार्थांचे निरीक्षण करणे

प्रयोग क्रमांक ६ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पाणी निवळणे

प्रयोग क्रमांक ७ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पाणी गाळणे

प्रयोग क्रमांक ८ घटक: पिण्याचे पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: सूक्ष्मजीवांचे निरीक्षण

प्रयोग क्रमांक ९ घटक: घरोघरी पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पाण्याचा उंचावरील टाकीपासून घरापर्यंतचा प्रवास

प्रयोग क्रमांक १० घटक: आहाराची पौष्टिकता

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: दुधाला विरजण लावून दही तयार करणे

प्रयोग क्रमांक ११ घटक: आहाराची पौष्टिकता

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: मटकीला मोड आणणे

प्रयोग क्रमांक १२ घटक: मोलाचे अन्न

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे

प्रयोग क्रमांक १३ घटक: हवा

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: हवा पाण्यापेक्षा हलकी असते

प्रयोग क्रमांक १४ घटक: हवा

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: हवेतील ऑक्सिजन हा घटक ज्वलनास मदत करतो

Science Experiments for Class 4 PDF Download Here

इयत्ता ५ वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 5 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: पृथ्वी आणि जीवसृष्टी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पावसाच्या पाण्याचे निरीक्षण करणे

प्रयोग क्रमांक २ घटक: पृथ्वी आणि जीवसृष्टी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: बी रुजवून रोप तयार करणे

प्रयोग क्रमांक ३ घटक: पृथ्वी आणि जीवसृष्टी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: कुंडीतील रोपाची वाढ पहाणे

प्रयोग क्रमांक ४ घटक: अन्न टिकविण्याच्या पद्धती

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: बुरशीचे निरीक्षण

प्रयोग क्रमांक ५ घटक: अन्न टिकविण्याच्या पद्धती

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: लोणचे तयार करणे

प्रयोग क्रमांक ६ घटक: पाणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी घरगुती फिल्टर तयार करणे

प्रयोग क्रमांक ७ घटक: कामांत व्यस्त आपली आंतरेन्द्रीये

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: स्टेथोस्कोप तयार करुन त्याचे कार्य पाहणे

प्रयोग क्रमांक ८ घटक: पदार्थ, वस्तू आणि उर्जा

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: बंदिस्त जागेतील द्रव पदार्थ दाब दिल्यास जागा मिळेल तेथून बाहेर पडतो

प्रयोग क्रमांक ९ घटक: पृथ्वीचे फिरणे

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: दिवस व रात्र

प्रयोग क्रमांक १० घटक: पृथ्वीचे फिरणे

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: अमावस्येला चंद्र न दिसणे

प्रयोग क्रमांक ११ घटक: पृथ्वीचे फिरणे

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: पृथ्वीचे परिवलन

Science Experiments for Class 5 PDF Download Here

इयत्ता ६ वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 6 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन

  • प्रयोग/कृती/दिग्दर्शन/प्रात्यक्षिक प्रयोगाचे शीर्षक: जमिनीच्या थरांचा शोध घेणे

प्रयोग क्रमांक २ घटक: सजीव सृष्टी

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक ३ घटक: सजीव सृष्टी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: वनस्पतीतील उत्सर्जन प्रक्रियेचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक ४ घटक: सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: वनस्पतीच्या रचनेचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक ५ घटक: पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: मेणबत्तीच्या मेणाचा वापर करून पदार्थाच्या अवस्थांतराचे निरीक्षण करणे

प्रयोग क्रमांक ६ घटक: पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: तापमापीच्या सहाय्याने तापमान मोजणे

प्रयोग क्रमांक ७ घटक: पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: पाण्याच्या उत्कलन बिंदूवर मीठ, साखर यांचा परिणाम अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ८ घटक: पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: आयोडीनच्या संप्लवन क्रियेचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक ९ घटक: बल व बलाचे प्रकार

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: स्थितीक विद्युत बलाचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक १० घटक: कार्य आणि उर्जा

  • प्रात्यक्षिक प्रयोगाचे शीर्षक: बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने उष्णता उर्जा निर्माण करणे

प्रयोग क्रमांक ११ घटक: साधी यंत्रे

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: तरफेच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे

प्रयोग क्रमांक १२ घटक: प्रकाश व छाया निर्मिती

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रकाशाचे रेषीय संक्रमण अभ्यासाणे

प्रयोग क्रमांक १३ घटक: चुंबकाची गंमत

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: दैनंदिन वापरातील चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ ओळखणे.

प्रयोग क्रमांक १४ घटक: चुंबकाची गंमत

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: चुंबकांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १५ घटक: चुंबकाची गंमत

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: चुंबकाच्या प्रतिकर्षण व आकर्षण गुणधर्माचा अभ्यास करणे.

Science Experiments for Class 6 PDF Download Here

इयत्ता ७ वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 7 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: सजीवसृष्टी आणि अनुकूलन आणि वर्गीकरण

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: अ) कमळ, निवडूंग, देवदार, बटाटा, अमरवेल या वनस्पतीतील अनुकूलनाचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक २ घटक: सजीवसृष्टी आणि अनुकूलन आणि वर्गीकरण

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: आ) बदक, उंट, गाय, कबुतर, साप या प्राण्यांतील अनुकूलनाचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ३ घटक: वनस्पतीः रचना व कार्य

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: वनस्पतींच्या मुळांचे कार्य अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ४ घटक: वनस्पतीः रचना व कार्य

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: वनस्पतींच्या पानांची रचना, पानांची मांडणी, शिराविन्यास यांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ५ घटक: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: हवेला वस्तुमान आणि वजन असते

प्रयोग क्रमांक ६ घटक: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: हवेचा दाब

प्रयोग क्रमांक ७ घटक: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: हवेच्या दाबाचा परिणाम

प्रयोग क्रमांक ८ घटक: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: मृदेचे गुणधर्म तपासणे

प्रयोग क्रमांक ९ घटक: अन्नपदार्थांची सुरक्षा

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: विविध चाचणींचा वापर करून अन्नपदार्थातील भेसळ ओळखणे.

प्रयोग क्रमांक १० घटक: भौतिक राशींचे मापन

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: लांबी, वजन व आकारमान यांचे अंदाजे व प्रत्यक्ष मापन करणे.

प्रयोग क्रमांक ११ घटक: स्थितीक विद्युत

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: स्थितिक विद्युतचे अस्तित्व अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १२ घटक: उष्णता

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार (वहन, अभिसरण, प्रारण) अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १३ घटक: आपत्ती व्यवस्थापन

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: शाळेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेऊन आपत्तीकालीन खबरदारीबाबत जागरुक होणे.

प्रयोग क्रमांक १४ घटक: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: कांद्याच्या पेशीची रचना अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १५ घटक: बदलः भौतिक व रासायनिक

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: रासायनिक व भौतिक बदलांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १६ घटक: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या विविध पद्धती अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १७ घटक: पदार्थः आपल्या वापरातील

  • प्रात्यक्षिक प्रयोगाचे शीर्षक: साबण निर्मिती प्रक्रिया अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १८ घटक: प्रकाशाचे परिणाम

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रकाशाच्या विकिरणाचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १९ घटक: ध्वनी: ध्वनीची निर्मिती

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता मोजणे.

प्रयोग क्रमांक २० घटक: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: चुंबकीय बलरेषांचा अभ्यास करणे.

Science Experiments for Class 7 PDF Download Here

इयत्ता ८ वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 8 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दही / ताकातील लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंचे निरीक्षण व अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक २ घटक: सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: पावावरील बुरशीचे निरीक्षण व अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ३ घटक: बल व दाब

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: संतुलित व असंतुलित बलांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ४ घटक: बल व दाब

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: जडत्वाच्या प्रकारांचा अभ्यास अ. विराम अवस्थेतील जडत्व – नाणे व पुष्ठा आ. गतीचे जडत्व – पंखा, भोवरा इ. दिशेचे जडत्व – सिडी, गोटी, नाणे

प्रयोग क्रमांक ५ घटक: बल व दाब

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: आर्किमिडीजच्या तत्वाचा पडताळा घेणे.

प्रयोग क्रमांक ६ घटक: धाराविद्युत आणि चुंबकत्व

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: धाराविद्युतचा चुंबकीय परिणाम अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ७ घटक: धातू-अधातू

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रयोगशाळेत आर्यन ऑक्साइड हे संयुग तयार करून गुणधर्माचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ८ घटक: धातू-अधातू

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: धातू व अधातूंच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माचा तुलनात्मक अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ९ घटक: प्रदूषण

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: परिसरातील अप्रदूषित व प्रदूषित जलाशयांचा तुलनात्मक अभ्यास

प्रयोग क्रमांक १० घटक: मानवी शरीर व इंद्रिय संस्था

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: प्रतिकृतीच्या सहाय्याने मानवी श्वसन संस्था अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ११ घटक: मानवी शरीर व इंद्रिय संस्था

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: प्रतिकृतीच्या सहाय्याने मानवी हृदयाची रचना अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १२ घटक: आम्ल, आम्लारी ओळख

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दर्शकांचा / लिटमस कागद वापर करून आम्ल व आम्लारी ओळखणे.

प्रयोग क्रमांक १३ घटक: ध्वनी

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते.

प्रयोग क्रमांक १४ घटक: प्रकाशाचे परावर्तन

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: सपाट आरशातून होणारे प्रकाशाचे परावर्तन व परावर्तनाचे नियम अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १५ घटक: परिसंस्था

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: परिसरातील परिसंस्थेमध्ये आढळणारे जैविक व अजैविक घटक अभ्यासणे.

Science Experiments for Class 8 PDF Download Here

इयत्ता ९ वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 9 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: गतीचे नियम

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक २ घटक: धाराविद्युत

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: रोधकाच्या संदर्भात विद्युतधारा (1) आणि विभवांतर (V) यांच्या अवलंबत्वाचा अभ्यास करणे आणि त्याचा रोध काढणे तसेच (V) आणि (1) आलेख काढणे

प्रयोग क्रमांक ३ घटक: द्रव्याचे मोजमाप

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: रासायनिक संयोगाच्या नियमाची पडताळणी करणे.

प्रयोग क्रमांक ४ घटक: आम्ल आम्लारी व क्षार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दिलेल्या द्रावणातील आम्लारीधर्मी (धन) मूलके व आम्लधर्मी (ऋण) मूलके ओळखणे.

प्रयोग क्रमांक ५ घटक: आम्ल आम्लारी व क्षार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: PH कागदाचा / वैश्विक दर्शकाचा उपयोग करून दिलेल्या नमुन्यांचा pH काढणे.

प्रयोग क्रमांक ६ घटक: आम्ल आम्लारी व क्षार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: आम्ल व आम्लारीची क्रियाशीलता उदासिनीकरण तत्वाने अभ्यासणे

प्रयोग क्रमांक ७ घटक: आम्ल आम्लारी व क्षार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दिलेल्या द्रावणापैकी आम्ल, आम्लारी व क्षार दर्शकाच्या साहाय्याने ओळखणे.

प्रयोग क्रमांक ८ घटक: प्रकाशाचे परावर्तन

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: आरशांमधील कोनातील बदलामुळे निर्माण झालेल्या प्रतिमांच्या संख्येवरून प्रतिमा संख्या सूत्र अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ९ घटक: प्रकाशाचे परावर्तन

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: वेगवेगळ्या अंतरावरील पदार्थाची प्रतिमा घेवून अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर काढणे.

प्रयोग क्रमांक १० घटक: ध्वनीचा अभ्यास

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: ध्वनी परावर्तनाचा नियम पडताळून पाहणे.

प्रयोग क्रमांक ११ घटक: कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: सक्रिय कोळसा हा विरंजक घटक आहे हे सिद्ध करणे.

प्रयोग क्रमांक १२ घटक: कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साइड वायू तयार करून त्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १३ घटक: पदार्थ आपल्या वापरातील

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: खाण्याचा व धुण्याचा सोडा यांचे गुणधर्म अभासणे.

प्रयोग क्रमांक १४ घटक: पदार्थ आपल्या वापरातील

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दैनंदिन जीवनातील पदार्थाचे pH मूल्य वैश्विक दर्शकाच्या साहाय्याने शोधणे.

प्रयोग क्रमांक १५ घटक: वनस्पतीचे वर्गीकरण

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: परिसरातील विविध वनस्पतींचे (स्पायरोगायरा, अगॅरीकस, फ्युनारिया, सूचिपर्ण, वेचे, सायकस, सदाफूली) वर्गीकरण करणे व नामनिर्देशित आकृती काढणे.

प्रयोग क्रमांक १६ घटक: वनस्पतीचे वर्गीकरण

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: जास्वंद आणि निशिगंध या दोन वनस्पतींच्या विविध अवयवांचे निरीक्षण करून त्यातील फरक वनस्पती वर्गीकरणाच्या निकषाद्वारे स्पष्ट करणे.

प्रयोग क्रमांक १७ घटक: परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: सभोवताली आढळणारे विविध घटक (उत्पादक, भक्षक) प्रकार, उदाहरणे नोंदविणे व त्याआधारे अन्नसाखळ्या रेखाटणे.

प्रयोग क्रमांक १८ घटक: परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: तुमच्या शाळेजवळील छोट्या डबक्यामध्ये व त्याच्या सभोवताली आढळणाऱ्या विविध सजीवांची यादी करणे व त्यांच्या पोषणपद्धतीनुसार अन्नसाखळी व अन्नजाळे स्पष्ट करणे.

प्रयोग क्रमांक १९ घटक: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रयोगशाळेत दुधापासून दही बनविणे व त्यातील जीवाणूंचा सूक्ष्मदर्शकाच्या

प्रयोग क्रमांक २० घटक: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंचे निरीक्षण करणे.

प्रयोग क्रमांक २१ घटक: पर्यावरणीय व्यवस्थापन

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: परिसरात जमा झालेला कचरा विभागणे व विघटनशील कचरा वापरून सेंद्रीय खत निर्मिती करणे.

प्रयोग क्रमांक २२ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: पर्णरंध्राचा अभ्यास करण्यासाठी पानांचा पापुद्रा घेऊन त्याची तात्पुरती काचपट्टी तयार करणे.

प्रयोग क्रमांक २३ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वाढतात, हे प्रयोगाने पडताळून पाहणे.

प्रयोग क्रमांक २४ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: बाजारात उपलब्ध असलेल्या पिकलेल्या संकरित व देशी केळी यांच्या गुणधर्माचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक २५ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: तयार काचपट्टयांच्या आधारे प्राणीऊतीमध्ये असलेल्या पट्टकी (striated muscle) स्रायू तंतू आणि चेतापेशी ओळखणे आणि त्यांच्या सुबक नामनिर्देशित आकृत्या काढणे.

प्रयोग क्रमांक २६ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: तयार काचपट्ट्याच्या आधारे वनस्पतीमधील मूलऊती आणि दृढऊती ओळखणे आणि त्यांच्या सुबक नामनिर्देशित आकृत्या काढणे.

प्रयोग क्रमांक २७ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया

  • प्रयोगाचे शीर्षक: परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही वनस्पतीच्या खोडाच्या छेदाचा अभ्यास करणे.

Science Experiments for Class 9 PDF Download Here

इयत्ता १० वी प्रयोग/कृती यादी | Science Experiments for Class 10 PDF

प्रयोग क्रमांक १ घटक: मूलद्रव्यांचे वर्गीकरण

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: दिलेल्या क्षारांमधील क्लोराइड, ब्रोमाइड व आयोडाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे.

प्रयोग क्रमांक २ घटक: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करणे व अभिक्रियेचा प्रकार ओळखणे,

प्रयोग क्रमांक ३ घटक: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करून त्यांचे संयोग, विस्थापन, अपघटन आणि दुहेरी अपघटन अभिक्रिया यामध्ये वर्गीकरण करणे.

प्रयोग क्रमांक ४ घटक: धाराविद्युत

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: विद्युतवाहक तारेच्या वेटोळ्यांतून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ५ घटक: उष्णता

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या साहायाने अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक ६ घटक: उष्णता

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: गरम पाणी थंड होत असताना त्याचे तापमान मोजणे आणि काल तापमान यांचा आलेख काढणे,

प्रयोग क्रमांक ७ घटक: उष्णता

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक ८ घटक: प्रकाशाचे परावर्तन

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पडताळणे.

प्रयोग क्रमांक ९ घटक: प्रकाशाचे परावर्तन

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: वेगवेगळ्या आपाती कोनासाठी प्रिझममधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे व विचलित कोन मोजणे,

प्रयोग क्रमांक १० घटक: भिंग व भिंगांचे प्रकार

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: बहिगॉल भिंगाचे नाभीय अंतर काढणे.

प्रयोग क्रमांक ११ घटक: धातूविज्ञान

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: Zn, Fe, Cu आणि AI या धातूंची ZnSO, FeSO, CuSO, Al, (SO₂), या क्षारांच्या द्रावणावर होणारी अभिक्रिया अभ्यासणे आणि या धातूंची क्रियाशिलतेच्या उतरत्या क्रमाने मांडणी करणे.

प्रयोग क्रमांक १२ घटक: कार्बनी संयुगे

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: कार्बनी संयुगांतील ऑक्सिडीकरण आणि समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १३ घटक: सजीवांमधील जीवनप्रक्रिया भाग -१

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: गुणसूत्री विभाजन व अर्धगुणसूत्री विभाजन यांचा अभ्यास करणे..

प्रयोग क्रमांक १४ घटक: सजीवांमधील जीवनप्रक्रिया भाग -2

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: अमिबामधील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या सहायाने अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १५ घटक: सजीवांमधील जीवनप्रक्रिया भाग -2

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: जास्वंदीच्या फुलातील प्रजननांगांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १६ घटक: सजीवांमधील जीवनप्रक्रिया भाग -2

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: मानवी पुनरूत्पादन संस्थांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १७ घटक: पर्यावरणीय व्यवस्थापन, उपघटक- परिसंस्था

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: परिसरातील परिसंस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक १८ घटक: प्राण्यांचे वर्गीकरण, उपघटक- अपृष्ठवंशीय प्राणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: अ. गांडूळ ब. झुरळ यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक १९ घटक: प्राण्यांचे वर्गीकरण, उपघटक- अपृष्ठवंशीय प्राणी

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: अ. मासा ब. कबुतर यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक २० घटक: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, उपघटक- औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र

  • प्रयोग प्रयोगाचे शीर्षक: अॅसेटिक अॅसिडच्या (इथेनॉइक अॅसिडच्या) गुणधर्माचा अभ्यास करणे,

प्रयोग क्रमांक २१ घटक: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, उपघटक- औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.

प्रयोग क्रमांक २२ घटक: पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, उपघटक- जैविक खते

  • दिग्दर्शन प्रयोगाचे शीर्षक: अ. अझोला ब. अॅनाबीना क. अझोटोबॅक्टर ड. नोस्टॉक यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे.

प्रयोग क्रमांक २३ घटक: आपत्ती व्यवस्थापन

  • कृती प्रयोगाचे शीर्षक: आपल्या इमारतीचे किंवा घराचे आपत्ती व्यवस्थापनाविषयक सर्वेक्षण करणे.

प्रयोग क्रमांक २४ घटक: सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग २, उपघटक – बिजांकुरण

  • प्रात्यक्षिक प्रयोगाचे शीर्षक: श्वसन प्रक्रियेत कार्बनडाय ऑक्साइड वायू बाहेर टाकला जातो हे प्रयोगाने दाखविणे.

Science Experiments for Class 9 PDF Download Here

महत्त्वाची सूचना : या लेखातील प्रयोग, कृती व उपक्रम हे शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिले आहेत. कृपया सर्व प्रयोग आणि कृती शिक्षक किंवा पालकांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य ती काळजी घेऊनच करावेत. प्रयोगादरम्यान होणाऱ्या कोणत्याही अपघातास किंवा नुकसानीस हा ब्लॉग जबाबदार राहणार नाही. 

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment