Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे सप्टेंबरचे मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

Anganwadi Sevika Salary

Anganwadi Sevika Salary September 2026 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे सप्टेंबर 2026 महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाने जारी केलेल्या शासन 174 कोटी रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा निधी वितरित करण्यास शासन मान्यता दिली आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 28 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

सप्टेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता | Anganwadi Sevika Salary

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, ती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त राबविण्यात येते.

28 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सप्टेंबर 2026 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी 174 कोटी रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करून खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

174 कोटींच्या निधीची तरतूद

शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या आर्थिक तरतुदीनुसार संबंधित लेखाशीर्षाखालील विद्यमान तरतुदीतून हा अतिरिक्त निधी वितरित करण्यात येणार आहे.

संबंधित तरतुदीमध्ये 2026-27 साठी 2,100 कोटी रुपयांची विद्यमान तरतूद असून, त्यापैकी यापूर्वी 1,044 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता या शासन निर्णयाद्वारे 174 कोटी रुपये अतिरिक्त निधी वितरित करण्यात येत आहे.

हा निधी प्रामुख्याने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे सप्टेंबर 2026 महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा विचार करून निर्धारित पद्धतीने या निधीचा विनियोग करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने जारी केला असून, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संकेतांक 202609281135426330 असा आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन शासन निर्णय PDF Download

Anganwadi Sevika Salary September 2026 GR
Anganwadi Sevika Salary September 2026 GR

Related Post : अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी मिळणार? महिला व बालविकास मंत्री यांनी दिली महत्वाची माहिती

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment