Bal Sangopan Yojana Form Circular 2026 : बालसंगोपन योजनेत एकल पाल्यांचे फॉर्म भरले जात नसल्याबाबत आणि एकल माता पाल्यांची स्वतंत्र्य नोंद शाळेत ठेवण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी अर्ज करू शकतात.
उपरोक्त विषयांकीत प्रकरणी यापूर्वी निर्गमित केलेल्या पत्रान्वये सूचना निर्गमित करुनही अनेक शाळांमध्ये एकल महिलांच्या पाल्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत. केवळ योजनेची माहिती सांगितली आहे. करिता सर्व शाळांमध्ये सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा सांख्यिकीय आढावा घेण्याबाबत विनंती केली आहे.
तथापि यासंदर्भात जिल्हानिहाय सांख्यिकीय आढावा घेवून जिल्हानिहाय कार्य अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याबाबत सूचित केले आहे.
तरी, पत्रात नमूद प्रपत्रात माहिती संकलित होईल या दृष्टिकोनातून जिल्हानिहाय आढावा घेवून संकलित अहवाल या कार्यालयास तसेच शासनास पाठविण्यात यावा, ही विनंती करण्यात आली आहे.
प्रपत्रातील मुद्दे
- शाळेतील एकल पाल्यांची संख्या
- त्यापैकी २.५ लाख उत्पन्नापेक्षा कमी असलेली विद्यार्थी संख्या
- त्यापैकी बालसंगोपन योजना मिळत असलेली विद्यार्थी संख्या
- उर्वरित विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले ते संख्या
- किती विद्यार्थ्यांचे फॉर्म अजून भरायचे राहिले ते संख्या
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना GR आणि अर्ज नमूना PDF

बालसंगोपन योजना काय आहे?
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही अडचणीच्या परिस्थितीत असलेल्या बालकांना संगोपनासाठी आधार देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत अनाथ, एक पालक असलेली बालके, कौटुंबिक संकटात असलेली बालके तसेच काही विशिष्ट सामाजिक व आरोग्यविषयक परिस्थितीतील पालकांच्या बालकांना लाभ देण्याची तरतूद आहे.
या योजने अंतर्गत प्रतिमहिना 2,250 इतके अनुदान दिले जाते. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांना मिळणारे सहाय्यक अनुदान 250 प्रति लाभार्थी करण्यात आले आहे.













