Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

वीर गाथा प्रकल्प 6.0 नोंदणी, वेळापत्रक, विषय जाहीर, संपूर्ण माहिती

Veer Gatha Project 6.0

Veer Gatha Project 6.0 Registration : वीर गाथा 6.0 प्रकल्प 2026-27 अंतर्गत इयत्ता 3 री ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय, वर्गवारी, प्रकल्पाचे स्वरूप, वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सविस्तर माहिती पाहूया.

वीर गाथा प्रकल्प 6.0

संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वीर गाथा 6.0 हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Gallantry Awards Portal (GAP) अंतर्गत वीर गाथा प्रकल्पाची स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली. देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमीडिया) प्रकल्प सादर करता येतात.

सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.

तसेच प्रत्येक शाळेत स्वतंत्र “वीर गाथा कॉर्नर” स्थापन करण्यात यावा. या कॉर्नरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व प्रतिभेला वाव देण्यात यावा.

या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्यात यावे. तसेच उपक्रमांची उच्च दर्जाची (HD) छायाचित्रे आणि संबंधित माहिती/आकडेवारी जतन करून ठेवावी जेणेकरून भारत सरकारकडे (GoI) आवश्यकतेनुसार सादर करणे सोयीचे होईल.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) असे विविध प्रकल्प करू शकतात.

सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार MYGOV या पोर्टलवर अपलोड करावेत.

शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.

वीर गाथा प्रकल्प 6.0 विषय आणि वर्गवारी

इयत्तावर्गवारी / स्तरप्रकल्पाचे स्वरूप
इयत्ता ३ री ते ५ वीपूर्वतयारी स्तर (Preparatory Stage)कविता / परिच्छेद (१५० शब्द) / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing)
इयत्ता ६ वी ते ८ वीपूर्वमाध्यमिक स्तर (Middle Stage)कविता / परिच्छेद (३०० शब्द) / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War)
इयत्ता ९ वी ते १२ वीमाध्यमिक स्तर (Secondary Stage)कविता / परिच्छेद (७५० शब्द) / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) इत्यादी

सूचक विषय

Vir Gatha 6.0 Subject
Vir Gatha 6.0 Subject
Vir Gatha 6.0 Subject

वीर गाथा प्रकल्प 6.0 स्पर्धेच्या काही महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे

  1. शाळांनी वीर गाथा प्रकल्प 6.0 मधील कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) इ. सर्व प्रवेशिका नोंदणी MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.
  2. शाळा स्तरावरून MYGOV या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर Rubrics मूल्यांकन Annexure I अवलोकन करून, मूल्यांकन करावे.

वीर गाथा प्रकल्प 6.0 साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील. त्यामध्ये जिल्हा स्तर, राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील. घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्यांची संख्या पुढीलप्रमाणे असेल:

जिल्हास्तर – ०४ विजेते (प्रत्येक श्रेणीतील एक) यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे. (श्रेणी 1 व २ मधून प्रत्येकी १ विजेता आणि श्रेणी ३ मधून २ विजेते – यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून 1 विजेता व इयत्ता ११ वी १२ वी मधून 1 विजेता)

राज्यस्तर – ०८ (प्रत्येक श्रेणीतील दोन) यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. (श्रेणी 1 व २ मधून प्रत्येकी २ विजेते आणि श्रेणी ३ मधून ४ विजेते – यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून २ विजेते व इयत्ता ११ वी १२ वी मधून २ विजेते)

राष्ट्रीय स्तरावरील १०० विजेते (सुपर १००) असतील. त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे

  • श्रेणी 1 : इयत्ता ३ री ते ५ वी = २५ विजेते
  • श्रेणी 2 : इयत्ता ६ वी ते ८ वी = २५ विजेते
  • श्रेणी ३: इयत्ता 9 वी ते १२ वी = ५० विजेते (इ.९ वी ते १० वी मधून २५ विजेते व इ.११ वी ते १२ वी मधून २५ विजेते)

विजेत्यांचा सत्कार – राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सत्कार केला जाणार आहेत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते 12 वी पर्यंत वीर गाथा ६.0 प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ६.0 स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी.

तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेषित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशा सूचना SCERT कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी परिपत्रक वाचा. लिंक खाली दिली आहे.

वीर गाथा 6.0 प्रकल्प 2026-27 वेळापत्रक

कालावधीउपक्रम / कार्यवाही
9 सप्टेंबर 2026 पर्यंतराज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण विभाग व सर्व शिक्षण मंडळांकडून त्यांच्या संबंधित शाळांना वीर गाथा 6.0 प्रकल्प राबविण्याबाबत सूचना देणे.
12 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शाळांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांशी Virtual / Face-to-Face Interaction आयोजित करणे.
12 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026शालेय स्तरावर प्रकल्प उपक्रमांचे आयोजन व मूल्यमापन. शाळांनी दिलेल्या विषयांवर उपक्रम घेऊन त्यांचे मूल्यांकन करणे.
5 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2026शालेय स्तरावरील उपक्रमांनंतर प्रत्येक शाळेने MyGov Portal वर प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्तम प्रवेशिका अपलोड करणे. एकूण 4 प्रवेशिका.
21 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2026जिल्हास्तरीय मूल्यमापन – जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांकडून शाळांकडून प्राप्त प्रवेशिकांचे मूल्यांकन.
21 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2026जिल्हास्तरावरील सर्वोत्तम प्रवेशिका MyGov Portal द्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांकडे पाठविणे.
16 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील मूल्यमापन – राज्य/UT नोडल अधिकाऱ्यांकडून प्रवेशिकांचे मूल्यांकन.
16 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026सर्वोत्तम प्रवेशिका MyGov Portal द्वारे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडे राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठविणे.
8 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2026राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन – शिक्षण मंत्रालयाने गठित केलेल्या समितीकडून.
28 डिसेंबर 2026 पर्यंतराष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापनाचा निकाल शिक्षण मंत्रालयाकडे सादर करणे.
30 डिसेंबर 2026 पर्यंतशिक्षण मंत्रालयाकडून निकाल संरक्षण मंत्रालयाकडे (MoD) पाठविणे.

Veer Gatha Project 6.0 Registration

Websites for References: The Following links can be referred by Schools:

अधिक माहितीसाठी परिपत्रक डाउनलोड करा

Veer Gatha Project

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment