Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

SLDP 2026: मॉड्यूल निर्मितीसाठी नोंदणी, शाळांच्या यशोगाथा सादर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

School Leadership Development Program

School Leadership Development Program 2026 : शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणे आणि शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम (SLDP) अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करणेबाबत महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MIEPA – Maharashtra Institute of Educational Planning and Administration) छत्रपती संभाजीनगर कार्यालयाडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सविस्तर पाहूया.

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणेबाबत

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या सूचनांनुसार मिपा-SLA संस्थेमार्फत सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कामकाज करणाऱ्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत एकूण 69 शैक्षणिक मॉड्यूल्स विकसित केलेले आहेत.

सदर मोड्यूल्स NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल https://ncsl.niepa.ac.in/ मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या खालील वेबपेज वर प्रकाशित करण्यात आले आहे. https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra.php

सदर मोड्यूल्स, निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्ससाठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो.

त्यानुसार सन 2026-27 मध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित मोड्यूल्स विकसित करावयाचे आहेत. तरी आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेअंतर्गत केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, DIET अंतर्गत अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य, महानगरपालिका अंतर्गत प्रशासन अधिकारी, शिक्षण उपनिरिक्षक, शिक्षण निरिक्षक तसेच राज्यस्तर शिक्षण विभागातील अधिकारी यांना सदर पत्र अवलोकनार्थ दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्यांना मोड्यूल्स विकसन कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे. त्यांना खालील ऑनलाईन लिंकवर दि.23/09/2026 पर्यंत नोंदणी करण्याबबाबत सूचित करावे व त्यातून त्यांचे साहित्य राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी.

नोंदणी लिंक – https://forms.gle/EnR5PvfmPJS8jjjF9

SLDP शाळांची यशोगाथा मार्गदर्शक सूचना

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करणेबाबत.

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा (Case Study) मिपा संस्था, छत्रपती संभाजीनगर मार्फत NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल https://ncsl.niepa.ac.in/ मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या वेबपेज https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra.php वर प्रकाशित करण्यात आले आहे.

संदर्भिय पत्रानुसार सन 2026-27 मध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने शाळांमध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठवावयाच्या आहेत.

त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान 02 ज्यात शासकीय/जिल्हा परिषद/नगर परिषद/महानगरपालिका/कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन या कार्यालयाच्या miepasla2019@gmail.com या ईमेलवर दि.30/09/2026 पर्यंत Google Input मध्ये Arial Unicode MS या Font मध्ये टंकलिखित करुन Word व PDF स्वरुपात पाठवाव्यात.

यशोगाथा लेखनासाठी क्षेत्र / विषय निवडण्यासाठी संदर्भ यादी

1. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

2. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये कौशल्य आधारित आणि व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

3. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये पायाभूत शिक्षण मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यात सक्षम करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

4. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये लिंग समभाव व समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न.

5. आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध कृती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

6. समता, सामाजिक ज्ञान आणि दिव्यांगासाठीचे शिक्षण समावेशन यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

शाळा यशोगाथा लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना

1. लेखनाची भाषा मराठी/हिंदी/इंग्रजी

2. एकूण लेखन शब्द मर्यादा अंदाजे 2500 ते 3000 शब्द

3. वरील यादीतील क्षेत्रांपैकी एकाच क्षेत्रावर आधारित लेखन अपेक्षित

4. मुख्याध्यापक व इतर सहकारी यांनी शाळेत घडविलेले सकारात्मक परिवर्तन यावर लेखन अपेक्षित

5. सकारात्मक परिवर्तनाबाबत लेखन करतांना फोटो व व्हीडीओ लिक समाविष्ट करणे आवश्यक

6. शाळेत / विद्यार्थ्यांत झालेले सकारात्मक परिवर्तन याबाबतची स्पष्ट माहिती यशोगाथेत आवश्यक आहे.

7. शाळा निवड – पूर्व प्राथमिक/ प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक

8. शाळा व्यवस्थापन – शासकीय/ जिल्हा परिषद / नगर परिषद/ महानगरपालिका / कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित

शाळेची प्रारंभिक माहिती बाबत मुद्दे

1. शाळेचे पूर्ण नाव, पत्ता व ईमेल आयडी

2. मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी

3. शाळेचे व्यवस्थापन

4. शाळेचे माध्यम

5. शाळेतील इयत्ता —- ते ….

6. एकूण विद्यार्थी संख्या

महत्वाचे

1. Google Input मध्ये Arial Unicode MS font.

2. Word व PDF फाईल miepasla2019@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात

अधिक माहितीसाठी शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महत्वाचे परिपत्रक

sldp Module Circuler
SLDP Case study Circuler

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment