INSPIRE-MANAK योजना सत्र 2026-27 करीता Online नामांकने सादर करणेबाबत राज्य विज्ञान शिक्षण संस्थेकडून कळविण्यात आले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती व नोंदणी लिंक या लेखात दिली आहे.
Inspire Manak Award योजना काय आहे?
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात आले आहे की, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची INSPIRE-MANAK (Million Minds Augmenting National Aspirations and Knowledge) ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख (Flagship) योजना आहे.
या योजनेअंतर्गत सन 2026-27 मध्ये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांतील इ. 6 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 5 उत्तम, नावीन्यपूर्ण, मूळ कल्पनांची Online नामांकने www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर सादर करावयाची आहेत.
या करिता नामांकने सादर करण्याचा कालावधी 15 जुलै 2026 पासून सुरू झालेला असून, अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.
New Registration for School Authority
ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळविण्यात आले आहे.

- Please Enter 11 Digit School U-DISE Code / School Code
- Please enter below code to login
- Note: Captcha Code is case sensitive
- Submit
या संदर्भात आपल्या तातडीच्या लक्षाची आणि सक्रिय सहकार्याची आवश्यकता आहे. 31 ऑगस्ट 2026 अखेर महाराष्ट्र राज्यातून एकूण 1,208 शाळांमधून 4,165 नामांकने सादर करण्यात आलेली आहेत.
अंतिम मुदत आता अत्यंत जवळ आल्यामुळे उर्वरित पात्र शाळांकडून नामांकने वेळेत सादर होण्यासाठी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तसेच अंतिम टप्प्यातील गर्दी व तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आपण सर्व जिल्हा, तालुका/गट व शाळा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन प्रत्येक शाळेने विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित आपल्या पाच उत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पना/आविष्कारांची नामांकने निर्धारित मुदतीत सादर करण्यास प्रोत्साहित करावे.
सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी.
तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. वेळोवेळी आपल्या जिल्ह्याची नामांकनाची स्थिति त्यादृष्टीने सर्व शाळा मुख्याध्यापक यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.
आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. सर्व शाळांमध्ये अनिवार्यपणे नावीन्यपूर्ण कल्पना पेटी (Innovative idea box) लावण्यात यावा अशा प्रकारची कार्यवाही आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्वरित करण्यात यावी. आपण स्वतः या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या योजनेची दर्जेदार व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
अधिक माहितीसाठी
- INSPIRE-MANAK योजना सत्र 2026-27 करीता Online नामांकने सादर करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा
- Inspire Manak Award Registration Official Website















