Maharashtra State Board Form no 17 Online Application 2026: इयत्ता १० वी (SSC) आणि इयत्ता १२ वी (HSC) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या मंडळ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (mahahsscboard) महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार खाजगी विद्यार्थी (HSC SSC Form no 17) यांना १ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरता येणार असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात निर्धारित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म नं १७ ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच नावनोंदणी पूर्ण करावी.
Maharashtra State Board Form no 17 Online Application 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज
प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इ. १०वी व इ. १२ वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
१. फेब्रु-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
| टप्पा | कालावधी | प्रक्रिया | विलंब शुल्क |
|---|---|---|---|
| नियमित नावनोंदणी | शनिवार, दि. ०१/०८/२०२६ ते बुधवार, दि. ३०/०९/२०२६ | विद्यार्थ्यांनी नियमित नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रत (Print Out), ऑनलाइन नावनोंदणी शुल्क भरल्याची पोहोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावीत. | नाही |
| विलंब शुल्कासह नावनोंदणी | गुरुवार, दि. ०१/१०/२०२६ ते गुरुवार, दि. १५/१०/२०२६ | विद्यार्थ्यांनी विलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रत (Print Out), ऑनलाइन नावनोंदणी शुल्क भरल्याची पोहोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावीत. | प्रति विद्यार्थी ₹१०० |
| अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी | शुक्रवार, दि. १६/१०/२०२६ ते शनिवार, दि. ३१/१०/२०२६ | विद्यार्थ्यांनी अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरून मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क भरल्याची पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावीत. | प्रति विद्यार्थी प्रतिदिन ₹२० |
२. खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
३. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १०वी/इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज त्यांच्या यापूर्वी शिकलेल्या शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी त्यांनी मागील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी व परराज्यातील/परदेशातील विद्याध्यनि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या रहिवासी दाखल्यावरील पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
४. नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी,

५. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदा मूळ कागदपत्रे स्कैन करून अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
६. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) बाजून ते upload करावेत, विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
७. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत,
८. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे-
- इ.१०वी व इ. १२वी रु.१११०/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रक्रिया शुल्क (Processing Fee)
- रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
- रु.२०/-अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रति दिन
९. इ. १०वी १२वी फेब्रु मार्च २०२७ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील, ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोहोचपावती विद्यार्थी / संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल.
१०.अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी परीक्षेस प्रविश होणान्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्याच्या यापूर्वी शिकलेल्या माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाच्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्याच्या मागील शाळेचे उच्च माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे या उच्च माध्यमिक शाळेने आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
११. दिव्यांग विद्याच्यर्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र / UDID Card ची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ माध्यमिक महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.
१२. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५वी किवा इ. ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी साठी (१७ नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल.
१३. ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत Website वर दिलेल्या Helpline वर संपर्क साधावा,
१४. पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र (Eligible) विद्याध्यर्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
Maharashtra State Board Form no 17 Online Application
Maharashtra State Board Official Website
Maharashtra State Board Form no 17 PDF Download
दहावी आणि बारावी परीक्षा खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज प्रकटन डाउनलोड करा







