Scholarship Examination State Merit List: प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) मार्फत निर्देश देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांना कळविण्यात आले आहे की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 17/10/2025 शासन निर्णयान्वये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) मध्ये स्पृहणीय यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्ह्याच्या मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन दि. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करावा तसेच सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिणु / पश्चिम उत्तर) यांनी करावी असे शासन आदेश आहेत.
त्यानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल 2026 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील (ग्रामीण / शहरी/ सी.बी.एस.ई / आय.सी.एस.सी.) विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे छपाई करून आपणास दि. 13/08/2026 पर्यंत पाठविण्यात येत आहेत.
तरी आपल्या जिल्ह्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आपल्या जिल्ह्याच्या मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना MSCE पुणे मार्फत राज्यातील सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत.
इ 4 थी व इ 7 वी 2026 राज्य गुणवत्ता यादी | Scholarship Examination State Merit List
इ. 4 थी व इ. 7 वी 2026 राज्य गुणवत्ता यादी (ग्रामीण / शहरी / सी.बी.एस.ई / आय.सी.एस.सी.)
गुणवत्ता यादी 4th Standard
गुणवत्ता यादी 7th Standard
4th Standard आणि 7th Standard जिल्हास्तरीय / Districtwise व तालुकास्तरीय / Talukawise गुणवत्ता यादी तुम्ही https://2026-2.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईट वर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल एप्रिल 2026 या सेक्शन मधील गुणवत्ता यादी या टॅबवर डाउनलोड करू शकता.
शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार विविध संवर्गनिहाय मंजूर संच निश्चित करण्यात आले असून, इयत्ता 4 थीसाठी एकूण 16 हजार 693, तर इयत्ता सातवीसाठी विविध संवर्गांतील 16 हजार 588 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी व प्रमाणपत्रे संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतरच उपलब्ध होणार आहे.











