SQAAF Schools Evaluation : शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२६-२७ मध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयाकडून महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या लेखात सविस्तर माहिती तसेच SQAAF संदर्भातील शासन निर्णय, माहिती पुस्तिका डाउनलोड लिंक दिली आहे.
SQAAF मूल्यांकन 2026-27 | SQAAF Schools Evaluation
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे दि १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन, बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन करण्यात येणार आहे.
सन २०२४-२५ मध्ये १०२६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले होते. सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.
बाह्य मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी ५४० शाळांचे त्रयस्थ पक्षाद्वारे मूल्यांकन करण्याकरिता निवड करण्यात आली आहे. सदरील यादीत A+ श्रेणी मिळालेल्या शाळांची संख्या ४२८ व A श्रेणी मिळालेल्या १०६७ शाळांपैकी सर्वाधिक गुण मिळवलेल्या ११२ शाळांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील उपरोक्त नमूद ५४० शाळांचे त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी NABET-QCI या शासकीय स्वायत्त संस्थेची निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार NABET-QCI ही सोबत दिलेल्या यादीतील शाळांचे मूल्यांकन करणार आहे. मूल्यांकनाबाबत आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र अधिनस्थ शाळांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२६-२७ सूचना
1. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या कालावधीत मूल्यांकन कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.
2. मूल्यांकनाचे कामकाज Pi-Jam फाऊंडेशन यांनी बनवलेल्या App द्वारे किंवा लिंकद्वारे पूर्ण केले जाणार आहे.
3. NABET-QCI मार्फत शाळा मूल्यांकनाचे शाळानिहाय नियोजन कळविण्यात येईल.
4. सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील शाळांना NABET-QCI यांचे दोन प्रतिनिधी भेट देणार आहेत.
5. शाळा भेटीच्या वेळी कोणताही सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, याबाबत आपल्या स्तरावरून सर्व निवडपात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित करावे.
6. मूल्यांकनाच्या वेळी इतर शाळांच्या बरोबर तुलना न करता नैतिकदृष्ट्या योग्य मूल्यांकन केले जात आहे का, याबाबत वेळोवेळी आपल्या स्तरावरून आढावा घ्यावा.
7. मूल्यांकनाला जाणाऱ्या तज्ज्ञ सुलभकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था व प्रवास व्यवस्था NABET-QCI यांच्याकडूनच केली जाणार आहे.
8. तज्ज्ञ सुलभकांनी निवास व्यवस्थेबाबत सहकार्य मागितल्यास तालुका/जिल्हा स्तरावरील शासकीय विश्रामगृहांना निवास व्यवस्थेबाबत विनंती पत्र आपल्या स्तरावरून देण्यात यावे.
9. मुख्याध्यापक यांनी समन्वयाने कामकाज करण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
10. स्वयं मूल्यांकन सन २०२४-२५ मध्ये मुख्याध्यापक यांनी सादर केलेले पुरावे तसेच बाह्य मूल्यांकन सन २०२५-२६ मध्ये तपासलेले पुरावे तज्ज्ञ सुलभकांना उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित मुख्याध्यापक यांना सूचित करावे.
11. NABET-QCI यांनी प्रत्येक तज्ज्ञ सुलभक हे मूल्यांकनासाठी शाळेची निवड झाल्याबाबत व मूल्यांकनासाठी तज्ज्ञ सुलभक म्हणून निवड केल्याबाबत किमान एक आठवडा अगोदर शाळेला ईमेल/पत्र/भ्रमणध्वनी संदेश इत्यादीद्वारे पूर्वकल्पना देणार आहेत.
तसेच प्रत्यक्ष शाळा भेटीला जाण्यापूर्वी तीन दिवस अगोदर भ्रमणध्वनी संदेशाद्वारे “आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आम्ही येत आहोत” अशी पूर्वकल्पना देणार आहेत. याबाबत आपण सर्व निवडपात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित करावे.
12. मूल्यांकनाच्या वेळी निवडपात्र शाळांकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू किंवा आर्थिक स्वरूपात रक्कम तज्ज्ञ सुलभकांना देऊ नये, याबाबत आपल्या स्तरावरून सर्व निवडपात्र शाळांना सूचित करावे.
13. त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी येणाऱ्या तज्ज्ञ सुलभकांच्या माहितीसाठी आपण राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA-SQAAF) येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी खालील परिपत्रक डाउनलोड करा.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) शासन निर्णय
- शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२६-२७ मध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनाबाबत परिपत्रक डाउनलोड करा
- SQAAF संदर्भातील सर्व माहिती अधिकृत वेबसाईट
- शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance Accreditation Framework-SQAAF) मान्यता प्रदान करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि 15-03-2024 शासन निर्णय
- राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority – SSSA) स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि 15-03-2024 शासन निर्णय
















खूपच उपयोगी माहिती आहे.