HSC Exam Application Form Notification: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च-२०२७ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (mahahsscboard) प्रकटन जाहीर केले आहे.
HSC Exam Application Form Notification 2026-27
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकतेच इ. १० वी व १२ वी फेब्रु-मार्च २०२७ खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) ऑनलाईन नावनोंदणीबाबत सर्व विभागीय मंडळांना सूचना देण्यात आल्या होत्या. आता इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा २०२७ साठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) फेब्रुवारी – मार्च-२०२७ (HSC Exam) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणाली मधील PFN-ID बदल न घेता २०२६-२७ ला प्रविष्ठ इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहेत. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे.
HSC Exam Application Form Time Table 2026-27
इयत्ता १२ वी फेब्रुवारी–मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे, पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय, HSC Vocational व ITI विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे १४ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भरता येतील. विलंब शुल्कासह अर्ज १ ते १५ नोव्हेंबर, तर अतिविलंब शुल्कासह १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत स्वीकारले जातील. शुल्क पावती व Pre-List विभागीय मंडळाकडे जमा करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२६ आहे. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करून दिलेली असेल, अशा महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जुळत असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळाप्रमुख / प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इयत्ता १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत सूचना
इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
१. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणाली मधील PFN-ID बदल न घेता २०२६-२७ ला प्रविष्ठ इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहेत. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे.
२. पुनर्परीक्षार्थी, नवनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुकडा विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती FYJC online मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत.
३. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
४. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे ठराविक संस्थेने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा SBI बँकेच्या Online पेमेंट गेटवे द्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये “Draft” चा “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी. अशा “Send to Board” व “Paid” Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व वरील आवेदनपत्रे Draft Mode मध्ये राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
५. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकेच्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.
६. आवेदनपत्रातील फोटोच्या संदर्भात सूचना खालीलप्रमाणे –
Photo Instructions: परीक्षेसाठी फोटो अपलोड करताना व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. फाईलचे स्वरूप JPG असावे आणि आकार 25 KB ते 40 KB च्या दरम्यान असावा (जास्तीत जास्त 40 KB पर्यंत), फोटो गेल्या ६ महिन्यांत काढलेला असावा.
छायाचित्रासाठी महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
१. स्वरूप आणि गुणवत्ता (Format & Quality):
फोटो हाय-क्वालिटी आणि स्पष्ट चेहरा असावा.
फोटोचा पार्श्वभाग (Background) पांढरा किंवा साध्या रंगाचा असावा.
२. विद्यार्थ्यांचे स्वरूप (Student Appearance):
१. विद्यार्थ्याचा चेहरा स्पष्ट आणि समोर असावा. दोन्ही डोळे आणि कान उघडे असावेत.
२. चेहऱ्यावर पूर्णपणे केस किंवा कोणतेही केस विखुरलेले नसावेत.
३. विद्यार्थ्याने शक्यतो अधिकृत शालेय गणवेशात छायाचित्र घ्यावे.
४. जर विद्यार्थी चष्मा लावत असेल, तर डोळ्यांवर प्रकाश पडून फोटो खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
३. तंत्रज्ञानाची माहिती (Technical Details):
१. फोटो JPEG (.jpg) फॉरमॅटमध्ये सेव्ह केलेला असावा. इतर FORMAT मधील (.PNG, BMP) फाईल JPG म्हणून RENAME करू नये.
२. फाईलचा आकार 25 KB ते 40 KB दरम्यान असावा.
आवेदनपत्रे मंडळाकडे पाठविल्यानंतर व प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर कोणताही फोटो बदलता येणार नाही.
७. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य चुका आढळतात. त्यामुळे prelist वर अथवा आवेदनपत्राच्या print वर विद्यार्थी / पालकांनी स्वाक्षरी घ्यावी.
८. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी अनेक दुय्यम login, college च्या main login मध्ये तयार करून computer lab मध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून मुख्य login द्वारे त्याची तपासणी करावी.
९. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
१०. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.













