ZP School Cleaning Circuler: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांची स्वच्छता करण्यासाठी विशिष्ट कर्मचारी उपलब्ध नसल्याने आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शाळेतील पोषक वातावरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वतंत्र सफाई कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे स्वच्छतागृहे आणि शालेय परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. मात्र आता जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांबाबत ग्राम विकास विभागाने एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे.
शालेय शिक्षण विभांगातर्गत शाळांच्या सुविधाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (VC) बैठक शुक्रवार, दि.२१ मार्च, २०२५ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती.
सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची व स्वच्छता गृहांची स्वच्छता (ZP School Cleaning) करण्यासाठी विशिष्ट कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत याबाबत जबाबदारी स्विकारल्यास स्वच्छता ठेवणे शक्य होईल, असे मत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी मांडले होते.
त्याअनुषंगाने मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांनी ५००० व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषदेच्या शाळामधील स्वच्छतागृहाची स्वच्छता ग्रामपंचयात कर्मचारी यांनी करावी असे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांनी आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी. असे निर्देश ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहे.
हे ही वाचा : राज्यातील सर्व शिक्षकांसाठी प्रशस्त App वरील टास्क पूर्ण करणेबाबत आदेश – संपूर्ण माहिती












