Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

इ ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ पूर्वतयारी सूचना – संपूर्ण माहिती

प्राथमिक (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक (इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२६-२७ च्या पूर्व तयारीबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (mscepune) अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती व सुधारित शासन निर्णय PDF लिंक या लेखात दिली आहे.

PSE UPS Scholarship Examination 2026-27

PSE UPS Scholarship Examination 2026-27 : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२६-२७ च्या पूर्व तयारीबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (mscepune) अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या लेखात याबाबत संपूर्ण माहिती व सुधारित शासन निर्णय PDF लिंक दिली आहे.

प्राथमिक इ. ४ थी व उच्च प्राथमिक इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा – २०२७ पूर्वतयारी

  • PSE Full Form : Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE)
  • UPS Full Form : Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS) – 2027

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि १७/१०/२०२५ नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२७ च्या परीक्षेचे आयोजन (Scholarship Examination Date2027) फेब्रुवारी २०२७ मध्ये करण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. ४ थी व इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दि. २६/०६/२०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये ५% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सदर राखीव ठेवलेल्या ५% निधीमधून जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शाळांतील इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२७ ची अधिसूचना माहे ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद / मनपा शाळांचे शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी आवेदनपत्र शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणा करण्याची तरतूद करावी.

तसेच इ. ४ थी व इ. ७ वी २०२७ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांना पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ नुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून संकलित करण्यास आपल्या स्तरावरून कळवावे.

सदर माहिती भरलेली प्रपत्र शाळेतच ठेवावी, जेणेकरून सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध होऊन ऑनलाइन लिंक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाइन भरणे सुलभ, जलद व बिनचूक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे. असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (mscepune) दिले आहे.

प्राथमिक इ. ४ थी व उच्च प्राथमिक इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा – २०२७ संपूर्ण माहिती

शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप

प्राथमिक (इयत्ता ४ थी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या दोन्ही प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. परीक्षेच्या वेळी प्रत्येक पेपरसाठी A, B, C आणि D अशा चार संचांमध्ये प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याला दिल्या जातात.

या दोन्ही परीक्षांसाठी विचारलेल्या प्रश्नांना चार पर्याय दिले जातात आणि त्यापैकी केवळ एकच पर्याय अचूक असतो, ज्याची निवड विद्यार्थ्याला करावी लागते.

परीक्षेसाठी पात्रता

PSE UPS या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच, तो विद्यार्थी शासनमान्य असलेल्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये इयत्ता चौथी किंवा इयत्ता सातवीत शिकत असलेला असावा.

इयत्ता ४ वी पात्र शिष्यवृत्ती रक्कम

pse 4th class msce scholarship amount

इयत्ता ७ वी पात्र शिष्यवृत्ती रक्कम

ups 7th class msce scholarship amount

परीक्षेचे माध्यम

इयत्ता ४ थी व ७ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा एकूण ७ माध्यमांमध्ये घेतली जाते, ज्यामध्ये मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. या सात मुख्य माध्यमांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमांचे एकूण सहा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जे विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्रात ‘सेमी इंग्रजी’ हा पर्याय निवडतात, त्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील ‘गणित’ आणि पेपर २ मधील ‘बुद्धिमत्ता चाचणी’ या विषयांच्या प्रश्नपत्रिका त्यांच्या मूळ माध्यमासह इंग्रजी माध्यमातूनही (अशा दोन्ही भाषांतून) उपलब्ध करून दिल्या जातात.

आवश्यक वयोमर्यादा

PSE UPS Scholarship परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १ जून २०२५ रोजी शासनाने निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावे. इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय कमाल १० वर्षे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांचे वय कमाल १४ वर्षे असणे विहित केलेले आहे.

तसेच, इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा कमाल १३ वर्षे असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ती कमाल १७ वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र ( ऑनलाईन अर्ज) केवळ शाळेमार्फत ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे असून, ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जात नाही.

अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळांवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे, तसेच विद्यार्थ्याची सर्व माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असल्याची पडताळणी मुख्याध्यापकांनी स्वतः करणे बंधनकारक आहे.

प्राथमिक इ ४ थी व उच्च प्राथमिक इ ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा शासन निर्णय

PSE UPS Scholarship Examination msce pune circuler
PSE UPS Scholarship Examination msce pune circuler

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment