PAT Live Report Download Guide Online Training 2026 : राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा PAT Live Report, त्याचे फायदे व अध्यापनात उपयोग तसेच सदरील report डाउनलोड करण्याबाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची SCERT PAT Live Report Online Training Youtube Link व PAT Live Report डाउनलोड करण्याबाबतचे सविस्तर User Manual लिंक या लेखात दिली आहे.
PAT Live Report राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण
मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षात एकूण चार माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करून त्यात PAT बाबत चर्चा होणे आवश्यक असल्याचे सूचित केले आहे.
विद्या समीक्षा केंद्र (VSK) मार्फत PAT Live Report डाउनलोड करण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तथापि सद्य स्थितीत केवळ ७०,००० शिक्षकांनी हा अहवाल डाउनलोड केल्याचे दिसून येत आहे. PAT मध्ये एकूण ७८,००० शाळांनी PAT ३ चे गुणांकन हे VSK च्या chatbot वर नोंदविले आहे. त्यापैकी केवळ १५,००० शाळांनी अहवाल डाउनलोड केला आहे.
त्यामुळे या बाबत शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करून शिक्षकांचे उद्बोधन करण्याची आवश्यकता आहे. सदरील प्रशिक्षणात PAT Live Report डाउनलोड करण्याची प्रक्रिया, त्याचे वाचन व अध्यापनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात केंद्रस्तरावर होणाऱ्या शिक्षण परिषदा तसेच शाळा स्तरावर होणाऱ्या माता पालक शैक्षणिक मेळाव्यात सदरील PAT Live Report चे वाचन व चर्चा झाल्यास पालकांनाही आपल्या पाल्याच्या अध्ययन निष्पत्ती, संपादणुकीची सद्यस्थिती समजून येईल.
SCERT मार्फत घेण्यात येणाऱ्या Periodic Assessment Test (PAT / संकलित चाचणी) चा निकाल सद्यस्थितीत SwiftChat या Application द्वारे “PAT Live Report” या स्वरूपात प्रत्येक शाळेला वर्ग निहाय, उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सदर अहवालामध्ये वर्गाची जिल्हा व राज्याशी तुलनात्मक कामगिरी, विषयनिहाय व अध्ययन निष्पत्तीनिहाय (Learning Outcome-wise) कामगिरी, विद्यार्थ्यांची विषयनिहाय एकूण कामगिरी तसेच उपचारात्मक अध्यापनाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे विषयनिहाय गट (कोहॉर्ट) याबाबतची माहिती समाविष्ट असते.
तथापि, Dashboard व VSK Data बरून असे निदर्शनास आले आहे की, अनेकांना सदर अहवाल डाउनलोड करण्याची कार्यपद्धती तसेच त्याचा अध्यापन नियोजनासाठी प्रत्यक्ष उपयोग याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. परिणामी, उपलब्ध डेटाचा उपयोग उपचारात्मक अध्यापनासाठी अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही.
या करीता राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण SCERT च्या YouTube channel द्वारे Live प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणास सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित राहतील या करीता आपल्यास्तरावरून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदरील प्रशिक्षण हे शुक्रवार दि 23/10/2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणासाठी अधिकारी वर्ग यांना ईमेल द्वारे zoom meeting ची लिंक देण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. सदरील लिंक ही केवळ अधिकारी वर्गासाठी राहील,
SCERT PAT Live Report Online Training Youtube Link
PAT Live Report करीता मार्गदर्शक सूचना
मुख्याध्यापक व शिक्षक यांनी प्रशिक्षणाच्या दिवशी SCERT च्या या YouTube लिंक (www.youtube.com/@SCERTMaharashtra) ला भेट द्यावी.
प्रशिक्षण चालू असताना YouTube च्या Description मध्ये उपस्थिती नोंद करण्यासाठी लिंक देण्यात येणार आहे. त्यावर केवळ इंग्रजी अक्षरे अंक वापरून लिंक मधील माहिती भरल्या जाईल याची दक्षता घ्यावी. सदर लिंक प्रशिक्षणानंतर दि. 25/10/2026 रोजी रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल.
मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी SwiftChat या Application मधील “PAT Live Report” या Bot द्वारे आपल्या शाळेचा PAT निकाल अहवाल डाउनलोड करावा.
PAT Live Report डाउनलोड User Manual लिंक
- सदर Bot ची लिंक: https://links.swiftchat.ai/klGsN9
- PAT Live Report Download Guide User Manual PDF
- SwiftChara VSK संदर्भातील शंका-समाधान व सद्यस्थिती अद्ययावत माहितीसाठी WhatsApp Community Link: https://tinyurl.com/42stufew
How To PAT Live Report Download Step by Step Guide
SCERT महाराष्ट्रामार्फत घेण्यात येणाऱ्या Periodic Assessment Test (PAT) चा निकाल SwiftChat ॲपमधील Maharashtra Live Reports Bot द्वारे पाहता व PDF स्वरूपात डाउनलोड करता येतो. या अहवालाच्या मदतीने शिक्षकांना विद्यार्थ्यांची विषयानुसार प्रगती समजून घेऊन अध्यापनाचे नियोजन करता येते.
PAT Live Report डाउनलोड करण्यासाठी आवश्यक बाबी
- Android किंवा iOS मोबाईल.
- SwiftChat ॲप.
- मोबाईल क्रमांकाची OTP द्वारे पडताळणी.
- शाळेचा School Code.
- शिक्षकांचा Teacher Code.
Step 1: सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये SwiftChat ॲप इन्स्टॉल करा. त्यानंतर ॲप सुरू करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा.
Step 2: SwiftChat ॲपमध्ये आपला मोबाईल क्रमांक नोंदवा. त्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून क्रमांकाची पडताळणी पूर्ण करा. ही नोंदणी एकदाच करायची आहे.

Step 3: SwiftChat ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या Bot Store मधून Maharashtra Live Reports Bot सुरू करा. त्यासाठी User Manual मधील QR Code Scanner चा वापर करता येतो.
Bot सुरू करण्यासाठी थेट लिंक: https://links.swiftchat.ai/klGsN9

Step 4: Maharashtra Live Reports Bot उघडल्यानंतर चॅटमध्ये Hi असा संदेश पाठवा. त्यानंतर आपल्या पसंतीची भाषा निवडा.
Step 5: Bot कडून विचारण्यात आलेल्या Designation पर्यायांमधून Teacher हा पर्याय निवडा.

Step 6: यानंतर आपल्या शाळेचा School Code विचारला जाईल. संबंधित शाळेचा कोड अचूक टाका आणि पुढील सूचना पाळा.
Step 7: शाळेच्या तपशीलांची खात्री करून ते योग्य असल्यास Confirm करा. त्यानंतर PAT Report हा पर्याय निवडा.
Step 8: आता आपला Teacher Code टाका. त्यानंतर दाखविलेल्या शिक्षकविषयक तपशीलांची पडताळणी करा आणि माहिती योग्य असल्याची खात्री करून Confirm करा.
Step 9: शिक्षक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आवश्यक इयत्ता (Grade) निवडा.
Step 10: इयत्ता निवडल्यानंतर संबंधित अहवाल डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. Download the PDF Report या पर्यायावर क्लिक करून आपल्या शाळेचा PAT अहवाल PDF स्वरूपात डाउनलोड करा.

PAT Live Report चा अध्यापनात उपयोग कसा करावा?
PAT Live Report मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिक्षक विद्यार्थ्यांची विषयानुसार कामगिरी, अध्ययन निष्पत्तीनुसार संपादणूक आणि उपचारात्मक अध्यापनाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करू शकतात.
या अहवालाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे अध्ययनातील अडथळे समजून घेणे, गरजेनुसार विद्यार्थ्यांचे गट तयार करणे, उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे आणि पुढील मूल्यमापनातून झालेली प्रगती तपासणे शक्य होते.
शिक्षण परिषद, शाळास्तरीय बैठका आणि माता-पालक शैक्षणिक मेळाव्यांमध्ये या अहवालाच्या आधारे चर्चा केल्यास पालकांनाही आपल्या पाल्याच्या अध्ययन प्रगतीची माहिती मिळू शकते.
PAT Live Report डाउनलोड करण्यासाठी User Manual
User Manual लिंक: https://tinyurl.com/42stufew










