Maratha Students Education fee Concession 2026 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत. तसेच, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा मराठा विद्यार्थ्यांकडून अधिक शिक्षण शुल्क आकारले जाऊ नये याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात परिपत्रक व यापूर्वी 5 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केले आहे. (परिपत्रक व GR डाउनलोड लिंक या लेखात दिली आहे.)
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा लाभ कधीपासून?
राज्य शासनाने 5 जून 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने लाभ मिळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीशी संबंधित विषयांवर कार्यवाही करण्यासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 14 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झाली.
या बैठकीत 5 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली. काही शैक्षणिक संस्था व महाविद्यालये मराठा विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शिक्षण शुल्क भरून घेत असल्याचेही उपसमितीच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यानंतर उपसमितीच्या निर्देशानुसार संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
OBC विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिक्षण शुल्क आकारता येणार नाही
शासन परिपत्रकातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा विद्यार्थ्यांकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये, यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या शैक्षणिक सवलतींची अंमलबजावणी करणे शैक्षणिक संस्थांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र, प्रत्यक्ष लाभाचे स्वरूप, पात्रतेचे निकष आणि अभ्यासक्रमनिहाय सवलती यांसाठी संबंधित शासन निर्णय व विभागाच्या नियमांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
MahaDBT पोर्टलवर आवश्यक बदल करण्याचे निर्देश
पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा लाभ ऑनलाइन पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी (MahaDBT Scholarship) पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्या सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत.
तसेच, संबंधित विभागांनी चालू व आगामी वित्तीय वर्षात आवश्यक निधीची स्वतंत्र तरतूद करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क सवलत किंवा इतर शैक्षणिक लाभांसाठी अर्ज करताना संबंधित योजनेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती अधिकृत पोर्टलवरून तपासणे आवश्यक राहील.
शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाई
मराठा विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सवलतींची अंमलबजावणी न करणाऱ्या शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, संबंधित विभागांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या किंवा सुरू असलेल्या कार्यवाहीचा सद्यःस्थितीदर्शक अहवाल सामान्य प्रशासन विभागाला तातडीने सादर करायचा आहे. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची विनंतीही शासनाने केली आहे.
मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क सवलतींचा लाभ मिळण्यासाठी शासनाने संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि पात्र विद्यार्थ्यांना संबंधित लाभ कधीपासून मिळतात, याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष राहणार आहे.
Maratha Students Education fee Concession Circuler GR PDF
- Maratha Students Education fee Concession Circuler PDF Download Here
- मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत. शासन निर्णय 05-06-2026 येथे डाउनलोड करा


Related
मुलींना मोफत शिक्षण अधिकृत शासन निर्णय येथे डाउनलोड करा










