CBSE Date Sheet 2027 Class 10 Class 12 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत. यंदा परीक्षांचे वेळापत्रक परीक्षांच्या प्रारंभाच्या तब्बल १०१ दिवस आधी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ८३ विषयांचा, तर बारावीच्या परीक्षेसाठी १२१ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. मंडळाने शाळांकडून प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम विषय निवडीच्या माहितीनुसार परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
CBSE Date Sheet 2027 Class 10
दहावीच्या परीक्षेला १६ फेब्रुवारी रोजी चित्रकला (Painting) या विषयाच्या परीक्षेने सुरुवात होईल. १७ फेब्रुवारी रोजी गणित (स्टँडर्ड व बेसिक), २२ फेब्रुवारी रोजी विज्ञान, २४ फेब्रुवारी रोजी संगणक अनुप्रयोग, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा (Artificial Intelligence), २६ फेब्रुवारी रोजी इंग्रजी, ३ मार्च रोजी हिंदी, ४ मार्च रोजी मराठीसह विविध भाषांचे विषय, ८ मार्च रोजी सामाजिक शास्त्र आणि ९ मार्च रोजी उर्वरित काही विषयांच्या परीक्षा होणार आहेत.




CBSE Date Sheet 2027 Class 12
बारावीच्या परीक्षेला १६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र (Physics) या विषयाच्या परीक्षेने सुरुवात होईल. २३ फेब्रुवारी रोजी लेखाशास्त्र (Accountancy), २५ फेब्रुवारी रोजी भूगोल, २७ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र, २ मार्च रोजी मानसशास्त्र, ३ मार्च रोजी मराठीसह विविध भाषांचे विषय, ५ मार्च रोजी इंग्रजी, ९ मार्च रोजी गणित आणि उपयोजित गणित, १६ मार्च रोजी अर्थशास्त्र, १९ मार्च रोजी राज्यशास्त्र, २५ मार्च रोजी जीवशास्त्र आणि ३१ मार्च रोजी संगणक विज्ञान, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस व माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यातही विविध विषयांच्या परीक्षा सुरू राहतील. बारावीची अंतिम परीक्षा १० एप्रिल २०२७ रोजी संपणार आहे.





CBSE Date Sheet 2027 Class 10 Class 12 Download Here
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सर्व परीक्षांना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरुवात होईल. विषयानुसार परीक्षेचा कालावधी दोन किंवा तीन तासांचा असेल. परीक्षांच्या वेळापत्रकाची आखणी करताना विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच एकाच विद्यार्थ्याने निवडलेल्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी तब्बल ४० हजारांहून अधिक विषय संयोजनांचा विचार करण्यात आला आहे.
यंदाच्या बोर्ड परीक्षांसाठी बारावीचे १९.८ लाखांहून अधिक, तर दहावीचे २६.५ लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणीकृत झाले आहेत. परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार असून, शिक्षक आणि शाळांनाही शैक्षणिक उपक्रम व परीक्षा व्यवस्थापनाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी विषयानुसार परीक्षेच्या तारखा तपासून आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे. CBSE ने प्रसिद्ध केलेले संपूर्ण वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळ: https://www.cbse.gov.in
सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असून, शाळा, शिक्षक आणि पालकांनाही आगामी परीक्षांचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.
Related
महाराष्ट्र: 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक











