Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना योजना शासन निर्णय

Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana

Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana 2026-27: राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्ता १ ली ते १२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला १ लाख ५० हजार रुपये, तर अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ७५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत अनुदान पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात येते. तसेच अपघातामुळे शस्त्रक्रिया किंवा रुग्णालयात उपचार करावे लागल्यासही आर्थिक मदतीची तरतूद आहे. ही योजना नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे, कोणत्या अपघातांसाठी किती अनुदान मिळते, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात आणि प्रस्ताव कोठे सादर करावा, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना अपघातामुळे होणारी शारीरिक हानी, कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू अशा प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पूर्वी विद्यार्थ्यांसाठी ही योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. मात्र, विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईचे दावे निकाली काढण्यास विलंब होत असल्याने शासनाने विमा योजना बंद करून सानुग्रह अनुदान योजना सुरू केली.

या योजनेत २१ जून २०२२ रोजी शासन निर्णयाद्वारे सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार अपघाताच्या विविध प्रकारांसाठी अनुदानाची रक्कम आणि प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा अपघातामुळे उपचार अथवा शस्त्रक्रिया करावी लागल्यास शासनाकडून ठरावीक मर्यादेत सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यामुळे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यास मदत होते.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना कोणासाठी आहे?

Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan ही Yojana महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुला-मुलींसाठी लागू आहे. म्हणजेच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाला नियमानुसार अनुदान मिळू शकते. तसेच विद्यार्थ्याला अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास किंवा कोणत्याही कारणाने जखमी होऊन रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयीन खर्चाच्या मर्यादेत अनुदानाची तरतूद आहे.

मात्र, शासन निर्णयानुसार काही घटना या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू आणि मोटार शर्यतीतील अपघात यांचा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना सानुग्रह अनुदान किती मिळते?

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघाताच्या स्वरूपानुसार वेगवेगळी आर्थिक मदत दिली जाते. शासन निर्णयात निश्चित करण्यात आलेल्या अनुदानाच्या रकमा पुढीलप्रमाणे आहेत.

  1. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला १ लाख ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते.
  2. तसेच विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशामुळे किंवा पोहताना मृत्यू झाल्यासदेखील १ लाख ५० हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
  3. अपघातामुळे विद्यार्थ्याचे दोन अवयव किंवा दोन्ही डोळे निकामी झाल्यास अथवा एक अवयव आणि एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान मिळते.
  4. अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्यास ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी कायम अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

विद्यार्थ्याला अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयीन खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी नियमानुसार देय असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.

त्याचप्रमाणे विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास, उदाहरणार्थ क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू अंगावर पडल्याने, आग लागल्याने, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज अंगावर पडल्याने उपचार घ्यावे लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयीन खर्चाच्या मर्यादेत जास्तीत जास्त १ लाख रुपये अनुदानाची तरतूद आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना प्रस्ताव कागदपत्रे यादी

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रांसह सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सादर करावा लागतो. शासन निर्णयानुसार प्रस्ताव 3 प्रतींमध्ये तयार करून सादर करणे आवश्यक आहे. अपघाताच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास :

  • प्रथम खबर अहवाल (FIR).
  • घटनास्थळ पंचनामा.
  • इनक्वेस्ट पंचनामा.
  • मृत विद्यार्थ्याचा शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला. हा अहवाल अथवा दाखला सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरी केलेला असणे आवश्यक आहे.

२. अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास :

३. अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास :

  • शस्त्रक्रियेबाबत रुग्णालयाचे प्रमाणपत्र.
  • शस्त्रक्रियेच्या तपशीलाची माहिती असलेले प्रमाणपत्र.
  • संबंधित प्रमाणपत्रावर सिव्हिल सर्जन यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे.

४. विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशामुळे किंवा पोहताना मृत्यू झाल्यास :

  • मृत विद्यार्थ्याचा शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला.
  • संबंधित अहवाल अथवा दाखल्यावर सिव्हिल सर्जन यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे.

५. विद्यार्थी अपघातामुळे जखमी झाल्यास :

  • रुग्णालयात केलेल्या उपचारांबाबतचे प्रमाणपत्र.
  • उपचाराचा तपशील नमूद असलेले रुग्णालयाचे प्रमाणपत्र.
  • संबंधित प्रमाणपत्रावर सिव्हिल सर्जन यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे.

याशिवाय शासन निर्णयासोबत दिलेल्या विहित नमुन्यातील ‘विवरणपत्र-अ’ मध्ये अर्जदाराचे नाव, विद्यार्थ्याशी असलेले नाते, शाळेचे नाव, अपघाताची तारीख, उपचार घेतलेल्या रुग्णालयाचे नाव, उपचाराचा कालावधी, उपचारासाठी झालेला खर्च आणि दावा करण्याचे कारण यांची माहिती भरावी लागते. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे जोडून पालकांची स्वाक्षरी करावी. तसेच मुख्याध्यापक किंवा संस्थेच्या प्राचार्यांचा अभिप्राय, स्वाक्षरी आणि शिक्का घेणे आवश्यक आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज कोठे करावा?

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये तयार करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत सादर करावा लागतो. 06 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार या प्रस्तावांच्या छाननीसाठी आणि मंजुरीच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

सुधारित तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित संबंधित गटशिक्षणाधीकारी यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे सादर करावेत. बृहन्मुंबई क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण निरीक्षक (योजना), बृहन्मुंबई यांच्याकडे दाखल करावेत. संबंधित अधिकारी प्रस्तावाची छाननी करून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करतात.

या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) किंवा महानगरपालिका उपायुक्त, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त, संबंधित शिक्षणाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश असतो. शिक्षणाधिकारी (योजना) किंवा बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक (योजना) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात.

समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) किंवा शिक्षण निरीक्षक (योजना) यांनी संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम एकाच हप्त्यात धनादेशाद्वारे सात दिवसांच्या आत जमा करावी, अशी तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी घोषित करण्यात आले असून शिक्षणाधिकारी (योजना) आणि शिक्षण निरीक्षक (योजना), बृहन्मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी, प्रसिद्धी, वेळोवेळी आढावा घेणे आणि दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना योजना फॉर्म, शासन निर्णय

Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana Form
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana Form

निष्कर्ष

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही अपघातामुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा अपघातामुळे करावे लागणारे उपचार व शस्त्रक्रिया यांसाठी शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे या योजनेची माहिती पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनाला असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित गटशिक्षणाधीकारी यांच्या मार्फत शिक्षणंधिकारी यांच्याकडे वेळेत सादर करावा. योग्य माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा: विद्यार्थ्यांसाठीच्या योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम सुधारित योजना 2026: विद्यार्थ्यांना आता मिळणार 50 हजार ते 80 हजार रुपये वार्षिक भत्ता
बालसंगोपन सुधारित योजना 2026: ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्रे यादी संपूर्ण माहिती
लेक लाडकी सुधारित योजना 2026 : ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्रे यादी संपूर्ण माहिती

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment