Bal Chitrakala Competition Registration 2026: महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा २०२६ साठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली असून, नोंदणीची मुदत ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
Bal Chitrakala Competition Registration 2026
परिपत्रक
उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय १४ जुलै २०२५ नुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे.
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://msbae.ac.in/ या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.

शाळेची नोंदणी व विद्यार्थी नोंदणी कालावधी तपशील
| अ.क्र. | तपशील | पासून | पर्यंत |
|---|---|---|---|
| १ | बालचित्रकला स्पर्धेकरीता संबंधित केंद्र/शाळा ऑनलाइन नोंदणी | दि. ०१.०७.२०२६ | |
| २ | बालचित्रकला स्पर्धेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करणे (संबंधित केंद्र/शाळा मार्फत) | दि. ०१.०७.२०२६ | |
| ३ | परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे | दि. ०२.०७.२०२६ |
मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे/अचूक ऑनलाईन नोंदणी शाळेमार्फत करावी.
बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा https://msbae.ac.in/ तसेच https://balchitrakala2026.msbae.in/ या लिंकवर भरावयचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांनी उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय १४ जुलै २०२५ रोजीचा शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा.
बालचित्रकला स्पर्धा – 2026 परिपत्रक शासन निर्णय डाउनलोड
- बालचित्रकला स्पर्धा – 2026 विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 2 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- Balchitrakala Spardha User Manual (वापरकर्ता मार्गदर्शिका)
- बालचित्रकला स्पर्धा मार्गदर्शक सूचना 2026
- बालचित्रकला स्पर्धा परीक्षा -2026 वेळापत्रक
- उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय १४ जुलै २०२५







