Bal Chitrakala Competition Guidelines: बालचित्रकला स्पर्धा 2026 स्पर्धा व्यवस्थापन परिपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती.
टप्पा १ : स्पर्धापूर्व तयारी व विषय प्रसिद्धी
पोर्टल लॉगिन
दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता शाळेच्या अधिकृत लॉगिनवरून बालचित्रकला स्पर्धा पोर्टलवर प्रवेश करून गटनिहाय विषय डाउनलोड करावेत.
विषय प्रसिद्धी व गोपनीयता
प्राप्त झालेले विषयाची गोपनीयता स्पर्धा सुरू होईपर्यंत राखणे बंधनकारक आहे. विषय स्पर्धेच्या दिवशी व ठिकाणी ब्लॅकबोर्डवर
स्पष्ट व ठळक अक्षरात लिहावेत.
स्पर्धेचा दिवस (बालचित्रकला स्पर्धा दिनांक)
बालचित्रकला स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या नियोजित वेळेतील कोणत्याही दोन तासांमध्ये घेण्यात यावी.
विद्यार्थ्यांना सूचना
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गटनिहाय विषयांची ओळख करून द्यावी आणि स्पर्धेचे नियम व वेळेची कल्पना द्यावी.
टप्पा २ : चित्रकला ड्रॉईंग पेपर
अधिकृत शिक्का : विद्यार्थ्यांना पेपर देण्यापूर्वी चित्राच्या पाठ-मागील बाजूस उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात कला शिक्षण मंडळाने दिलेल्या नमुन्याप्रमाणे शिक्का व शाळेचा अधिकृत शिक्का मारावा.
विद्यार्थ्यांचा तपशील
विद्यार्थ्यांनी शिक्क्यामधील सर्व आवश्यक माहिती (नाव, गट, बैठक क्रमांक, शाळेचे नाव इ.) अचूक भरल्याची खात्री करावी.
पर्यवेक्षकाची स्वाक्षरी: भरलेली माहिती तपासून पर्यवेक्षकाने स्वतःची स्वाक्षरी व दिनांक नोंदवणे बंधनकारक आहे.
(टीप : स्वाक्षरी व शिक्का नसलेले पेपर
मूल्यांकनासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.)

टप्पा ३ : वेळ व घंटा संकेत
स्पर्धेचा एकूण कालावधी २ तास असेल. वेळेचे नियोजन खालीलप्रमाणे ठेवावे:
१) पहिली घंटा (सुरुवात) : कागद वाटप व मार्गदर्शन पूर्ण झाल्यावर स्पर्धा सुरू झाल्याची घंटा द्यावी.
२) दुसरी घंटा (१ तास पूर्ण) : १ तासाचा अवधी संपल्यावर विद्यार्थ्यांना उर्वरित वेळेची जाणीव करून
देण्यासाठी इशारा घंटा द्यावी.
३) तिसरी घंटा (अंतिम – समाप्ती) : २ तास पूर्ण होताच अंतिम घंटा देऊन चित्रकाम पूर्णपणे थांबवावे.
स्पर्धा सुरू असताना केंद्राचे नाव, केंद्र क्रमांक व विद्यार्थी सहभाग असे छायाचित्र घेऊन ठेवावे.
स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांची अनुपस्थिती लॉगिन पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक राहील. अनुपस्थित विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
टप्पा ४ : जमा करणे, पॅकिंग व हस्तांतरण
रंग सुकवणे: चित्रांचे रंग व्यवस्थित सुकले आहेत याची खात्री करूनच चित्रे जमा करावीत.
ब्राऊन पेपर पॅकिंग: सर्व जमा केलेल्या कलाकृती गटनिहाय वेगळ्या करून सुरक्षितपणे ब्राऊन पेपर (Brown Paper) मध्ये बांधून सीलबंद (Seal) कराव्यात.
पॅकेटवरील लेबल: सीलबंद पॅकेटवर शाळेचे नाव, पत्ता, स्पर्धेचा गट, एकूण जमा चित्रसंख्या आणि मुख्याध्यापक/पर्यवेक्षकांची स्वाक्षरी असलेले लेबल लावावे.
सीलबंद जमा करणे
जिल्हा/तालुका समन्वयकांशी संपर्क साधून हे गटनिहाय सीलबंद पॅकेट
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
शाळांनी संबंधित महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी
यांच्याकडे सुरक्षितपणे हस्तांतरित करून पोच पावती घ्यावी.
बृहन्मुंबई क्षेत्रातील शाळांनी शिक्षण निरीक्षक, मुंबई
(उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांच्याकडे हस्तांतरित करून पोच पावती घ्यावी.
शाळेचे नाव : ___________
पत्ता : _________________
स्पर्धेचा गट : ___________
एकूण जमा चित्रसंख्या : __
मुख्याध्यापक स्वाक्षरी : ___
टप्पा ५ : प्रशासकीय प्रश्न व तांत्रिक मदत
मुख्याध्यापक व शिक्षकांची जबाबदारी स्पर्धेत कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची पूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, कला शिक्षक व वर्ग पर्यवेक्षक यांची राहील.
हेल्पलाइन संपर्क
स्पर्धेदरम्यान काही तांत्रिक (उदा. लॉगिन समस्या) किंवा
प्रशासकीय अडचण उद्भवल्यास तात्काळ मंडळाने उपलब्ध
करून दिलेल्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धा पोर्टल : https://balchitrakala2026.msbae.in/
तांत्रिक सहाय्य :
8355870544
7972341657
9209403938
शुभेच्छा संदेश
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ आयोजित ‘राष्ट्रीय बालचित्रकला स्पर्धा २०२६’ च्या विद्यार्थी नोंदणीकरिता लाभलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या उपक्रमात मोलाचे योगदान देणारे शालेय शिक्षण संचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक, सहसमन्वयक, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कला शिक्षक आणि माझ्या बालकलाकार मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कल्पकता आणि सृजनशीलता फुलवण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे. सर्व शाळा व कला शिक्षकांनी नोंदणी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे; जेणेकरून बालकलाकारांनी कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या मनातील सुंदर कल्पना रंग व रेषांच्या माध्यमातून मुक्तपणे साकारतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय बालचित्रकला स्पर्धा २०२६
श्री. विनोद दांडगे
संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
डॉ. किशोर इंगळे
संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई







