Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

हर घर तिरंगा सेल्फी अपलोड सर्टिफिकेट डाउनलोड लिंक | Har Ghar Tiranga Campaign 2026

हर घर तिरंगा अभियान 2026 अंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमांची यादी, Selfie Online अपलोड करण्याची प्रक्रिया आणि प्रमाणपत्र डाउनलोड (Link) सविस्तर माहिती.

Har Ghar Tiranga Campaign 2026

Har Ghar Tiranga Campaign 2026: हर घर तिरंगा अभियान यंदा 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या दरम्यान राबविण्यात येत आहे. यावर्षीची मोहीम ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षांच्या गौरवाला समर्पित आहे. या अभियानांतर्गत तिरंगा रॅली, ई-बाईक रॅली, राज्यस्तरीय कार्यक्रम, रांगोळी, सेल्फी विथ तिरंगा आणि इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या लेखात हर घर तिरंगा अभियान 2026 मधील उपक्रम व कार्यक्रमांची संपूर्ण यादी, Har Ghar Tiranga Selfie Online Upload कशी करायची? Certificate Download कसे करायचे? अधिकृत डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

हर घर तिरंगा अभियान | Har Ghar Tiranga Campaign 2026

‘हर घर तिरंगा’ ही मोहीम ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सुरू करण्यात आली असून, भारत देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा आपल्या घरी आणावा आणि अभिमानाने फडकवावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

आपला राष्ट्रीय ध्वजाशी असलेला संबंध आतापर्यंत प्रामुख्याने औपचारिक आणि संस्थात्मक स्वरूपाचा राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तिरंगा आपल्या घरी आणणे, हे राष्ट्रीय ध्वजाशी वैयक्तिक नाते जोडण्याचे तसेच राष्ट्र उभारणीसाठी असलेल्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक ठरले.

या उपक्रमामागील प्रमुख उद्देश नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती व आदर वाढवणे हा आहे.

यावर्षी ‘हर घर तिरंगा 2026’ ही मोहीम ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या गौरवाला समर्पित करण्यात आली आहे. राष्ट्रीय गीतामध्ये व्यक्त झालेली देशभक्ती, तिरंग्याबद्दलचा अभिमान आणि मातृभूमीवरील प्रेम या भावनांचा उत्सव या मोहिमेतून साजरा केला जाणार आहे. (अधिक वाचा)

हर घर तिरंगा अभियान निमित्त उपक्रम/कार्यक्रम

हर घर तिरंगा अभियान राज्यात साजरा करणेबाबत राज्यामध्ये दिनांक ०९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत साजऱ्या करावयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम/उपक्रमांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करुन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा असे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहे.

विभागन विभीषिका स्मृतीदिन निमित्त उपक्रम

१. विभाजन विभीषिका स्मृतीदिन निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम व नाट्य आयोजन

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय : पुराभिलेख संचालनालय, मुंबई

२. विभाजन विभीषिका स्मृतीदिन निमित्त प्रदर्शन

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय : पुराभिलेख संचालनालय, मुंबई

३. विभाजन विभीषिका स्मृतीदिन निमित्त शॉर्ट फिल्म

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय : दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव

४. विभाजन विभीषिका स्मृतीदिन निमित्त शालेय व महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजन करणे

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • उच्च व तंत्र शिक्षण विभाग
    • शालेय शिक्षण विभाग

५. विभाजन विभीषिका स्मृतीदिन निमित्त शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये Mygov portal यावर दिनांक ९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत सहभागी होणे

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • उच्च व तंत्र शिक्षण विभाग
    • शालेय शिक्षण विभाग

घरोघरी तिरंगा व वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने विविध उपक्रम

१. वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करणे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजन

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सर्व विभाग/सर्व कार्यालय/सर्व महामंडळे/शाळा/महाविद्यालय/महानगरपालिका/जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय

२. वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
    • मा. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय

३. घरोघरी तिरंगा अभियान तसेच वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शन आयोजन करणे

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सर्व विभाग/सर्व कार्यालय/सर्व महामंडळे/शाळा/महाविद्यालय/महानगरपालिका/जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय

४. हर घर तिरंगा अभियानानिमित्त तिरंगा रंगाची रोपणाई करणे.

कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :

  • सर्व कार्यालय/
  • सर्व महानगरपालिका व त्या अंतर्गत सर्व कार्यालय
  • सर्व जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सर्व कार्यालय

५. राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजन करणे

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय : सांस्कृतिक कार्य संचालनालय

६. तिरंगा ई-बाईक रॅली

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व त्या अंतर्गत सर्व कार्यालय/
    • सर्व महानगरपालिका व त्या अंतर्गत सर्व कार्यालय
    • सर्व जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सर्व कार्यालय

७. तिरंगा रॅली

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सर्व विभाग/सर्व कार्यालय/सर्व महामंडळे/शाळा/महाविद्यालय/
    • महानगरपालिका/जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय

८. सेल्फी विथ तिरंगा

  • वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिरंगा सेल्फी, वंदे मातरम् गीत असलेला व्हिडिओ https://harghartiranga.com/ या वेबसाईटवर अपलोड करणे.
  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • सर्व विभाग/सर्व कार्यालय/सर्व महामंडळे/शाळा/महाविद्यालय/
    • महानगरपालिका/जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय

९. वंदे मातरम् या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रांगोळी

  • कार्यवाहीचा विभाग/कार्यालय :
    • उच्च व तंत्र शिक्षण विभाग
    • शालेय शिक्षण विभाग
    • अंतर्गत सर्व शाळा/महाविद्यालय

अधिक माहितीसाठी हर घर तिरंगा अभियान साजरे करणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा

Har Ghar Tiranga Selfie Upload Certificate Download कसे करावे?

how to Har Ghar Tiranga Campaign upload selfie and Certificate Download Link Online step by step guide in marathi
  • सर्वप्रथम अधिकृत Har Ghar Tiranga https://harghartiranga.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर तिथे Home पेजवर उजव्या बाजूला Upload a Selfie या पर्यायवर क्लिक करा. आता फोटो मध्ये दिसत असलेली खालील माहिती भरा.
Har Ghar Tiranga upload Selfie guide
  • जसे Name > Mobile Number > Country/State > Location Type (Urban/Rural) State > District > Block > Gram Panchayat माहिती भरा.
  • आता Browse Files मधून Upload Media या पर्यायातून फोटो अपलोड करा किंवा Click Picture हा पर्याय वापरुन Live फोटो काढा आणि अपलोड करा. (Note: Image size should not exceed 10MB)
Har Ghar Tiranga Selfie upload LIVE Capture or Browse Files
  • आता फोटो अपलोड झाल्यावर Submit बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला लगेचच तिथे Download Certificate हा पर्याय निवडून हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या. तसेच तिथूनच तुम्ही Download Video देखील डाउनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही Become a part of the Har Ghar Tiranga Campaign 2026 मध्ये सहभागी होऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या सोशल मीडिया वर #HarGharTiranga #HarGharTiranga2026 #हरघरतिरंगा२०२६ हे हॅश टॅग वापरुन पोस्ट करू शकता.

अधिक माहितीसाठी/ स्वयंसेवक नोंदणीसाठी/सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी खालील संकेतस्थळाला कृपया भेट द्यावी. https://harghartiranga.com/

अधिक माहितीसाठी हर घर तिरंगा अभियान साजरे करणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment