Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

ऑगस्ट २०२६ शैक्षणिक ग्रामसभेमध्ये प्राधान्याने चर्चा करावयाची विषयसूची

ऑगस्ट २०२६ महिन्यामध्ये आयोजित शैक्षणिक ग्रामसभेमध्ये शिक्षण विषयक बाबींची प्राधान्याने चर्चा करणेबाब विषयसूची

Educational Gram Sabha Meeting Agenda

Educational Gram Sabha Meeting Agenda: ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभेमध्ये शाळांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने शैक्षणिक विषयांचा समावेश करून प्राधान्याने चर्चा होण्यासाठी खालील विषयांच्या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषद कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहे.

शैक्षणिक ग्रामसभेमध्ये प्राधान्याने चर्चा करावयाची विषयसूची

१. शाळेची पटनोंदणी व विद्यार्थ्यांची उपस्थिती

• मुलांचे सर्वेक्षण.
• शाळाबाह्य मुलांची पटनोंदणी.
• विशेष गरजा असलेल्या मुलांची पटनोंदणी.
• सर्व गैरहजर मुलांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे.
• विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न.
विशेष गरजा असलेल्या मुलांचे समावेशक शिक्षण.
• विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व समुपदेशन.

२. मूलभूत सुविधा

• पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
• शाळेची रंगरंगोटी.
• शाळा इमारत, वर्गखोल्या, स्वयंपाकघर, खिडक्या, दरवाजे, फरशी आदींची दुरुस्ती.
• संरक्षण भिंत व नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम.
• विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था.
शिक्षकांसाठी आवश्यक फर्निचर.
• स्वतंत्र स्वच्छतागृहे.
• खेळाचे मैदान.
• वीजपुरवठा.
• बागबगीचा.
• रॅम्प व रेलिंगची सुविधा.

३. भौतिक व मानवी सुविधा

• शिक्षकांची उपलब्धता.
• विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन.
• शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर.
• मूल्यांकनासाठी आवश्यक सुविधा.
• ग्रंथालय, प्रयोगशाळा व ई-लर्निंग सुविधा.
• शैक्षणिक साहित्याची उपलब्धता.
• खेळ व सांस्कृतिक साहित्य.
• विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य.
• शैक्षणिक सहली व प्रदर्शन भेटी.
• इतर स्थानिक शैक्षणिक बाबी.

४. कौशल्य विकास

• खेळांचे प्रशिक्षण.
• संगीत, वाद्य, नृत्य व अभिनय कौशल्य प्रशिक्षण.
• संगणक व तंत्रज्ञान प्रशिक्षण.

५. व्यवस्थापन

  • शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठका.
  • पालक सभा.
  • ग्रामपंचायतीसोबत समन्वय बैठका.
  • स्वच्छता व नीटनेटकेपणा.
  • मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता.
  • आरोग्य शिबिरे.
  • विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे संगोपन.
  • शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण.

या शासन निर्देशानुसार ऑगस्ट २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभेत शाळेची पटनोंदणी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य विकास आणि शाळा व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर प्राधान्याने चर्चा करण्यात येणार आहे.

अधिक महितीसाठी ऑगस्ट २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment