Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम FLNAT परीक्षा 2026 पुढे ढकलली; सुधारित तारीख लवकरच

Nav Bharat Saaksharta Karyakram Assessment Test

NILP ULLAS Nav Bharat Saaksharta Karyakram Assessment Test 2026 : उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) पुढे ढकलण्याबाबत कळविण्यात आले आहे.

NILP ULLAS FLNAT Full Form

  • NILP Full Form – New India Literacy Programme (नव भारत साक्षरता कार्यक्रम)
  • ULLAS Full Form – Understanding Lifelong Learning for All in Society (समाजातील सर्वांसाठी आजीवन शिक्षणाची समज)
  • FLNAT Full Form – The Foundational Literacy and Numeracy Assessment Test (पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी)

उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम FLNAT चाचणी 2026

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (The Foundational Literacy and Numeracy Assessment Test (FLNAT) दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार होती.

सदर परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आवश्यक पूर्वतयारी, परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थीची नोंदणी/यादी, भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय करण्याबाबत आवश्यक सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत.

मात्र, काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली सदर FLNAT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

त्यामुळे सर्व संबंधितांनी सदर परीक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवावी.

तसेच, परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी/कर्मचारी व इतर संबंधित घटकांना याबाबत योग्य ती माहिती देऊन, सदर परीक्षेबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सदर FLNAT परीक्षेची सुधारित तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर तो स्वतंत्रपणे यथावकाश कळविण्यात येईल. सुधारित तारीख व वेळ प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील. तरी, सदर बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://ullas.education.gov.in/nilp

Nav Bharat Saaksharta Karyakram Assessment Test Circuler

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment