Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, संपूर्ण माहिती

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२६-२७ साठी ऑनलाईन अर्ज सुरू, वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती, आवश्यक पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

NMMS Scholarship exam Apply Online

NMMS Scholarship Exam Apply Online 2026-27 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ इ. ८ वी साठी सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

NMMS Scholarship Exam आवश्यक पात्रता

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थिनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

NMMS Scholarship Amount | शिष्यवृत्ती दर

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.

  • शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
  • इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

विद्यार्थ्यांची निवड

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

NMMS Scholarship परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २० डिसेंबर, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

NMMS Scholarship Exam Time Table 2026-27

१) बौध्दिक क्षमता चाचणी — Mental Ability Test (MAT)

  • एकूण गुण : ९०
  • एकूण प्रश्न : ९०
  • कालावधी : ९० मिनिटे
  • दिव्यांगासाठी : ३० मिनिटे जादा वेळ
  • वेळ : १०.३० ते १२.००

विश्रांती : १२.३० ते १३.३०

२) शालेय क्षमता चाचणी — Scholastic Aptitude Test (SAT)

  • एकूण गुण : ९०
  • एकूण प्रश्न : ९०
  • कालावधी : ९० मिनिटे
  • दिव्यांगासाठी : ३० मिनिटे जादा वेळ
  • वेळ : १३.३० ते १५.००

पात्रता गुण (एकत्रित) : ४०%

(सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत.
(SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

परीक्षेसाठी विषय

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील. प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये

  • सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५)
  • समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
  • गणित (एकूण गुण – २०)

असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

  • सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसायनशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
  • समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
  • गणित २० गुण.

माध्यम

परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.

(सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरबलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

मागील वर्षाच्या NMMS प्रश्नपत्रिका PDF Download

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या

अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

NMMS Scholarship Apply Online Time Table 2026

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असून, परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

१) नियमित शुल्कासह

  • ऑनलाईन आवेदनपत्र भरणे : ०८/०९/२०२६ ते ०७/१०/२०२६
  • NMMS Scholarship Apply Online 2026 Last Date : 7/10/2026
  • शुल्क : १२०/-
  • शाळा संलग्नता फी : संलग्नता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी

२) विलंब शुल्कासह

  • ऑनलाईन आवेदनपत्र भरणे : ०८/१०/२०२६ ते १४/१०/२०२६
  • शुल्क : २४०/-

३) अतिविलंब शुल्कासह (शाळा/संस्था जबाबदार असेल तर)

  • ऑनलाईन आवेदनपत्र भरणे : १५/१०/२०२६ ते २१/१०/२०२६
  • शुल्क : ३६०/-
  • (४८०/-)

NMMS Scholarship Apply Online 2026-27 | ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

NMMS Scholarship exam Apply Online 2026

दिनांक ०८/०९/२०२६ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
https://www.mscepune.inhttps://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

NMMS विद्यार्थी ऑनलाइन अर्ज कसा भरावा?

विद्यार्थी अर्जामध्ये भरावयाची माहिती

सर्वप्रथम वरील NMMS 2026-27 अधिकृत पोर्टल उघडा. School Login मध्ये आपल्या शाळेच्या UDISE Code आणि Password च्या माध्यमातून लॉगिन करा.

1. विद्यार्थ्याची प्राथमिक माहिती

  • UDISE Code — आपोआप येईल
  • Standard — 8 वी आपोआप येईल
  • अनुदानित/विनाअनुदानित शाळेची माहिती
  • केंद्रीय विद्यालय / जवाहर नवोदय विद्यालय / सैनिक शाळा याबाबत Yes/No
  • शासकीय वसतिगृह व सुविधांचा लाभ घेतो का — Yes/No

2. विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी

  • विद्यार्थ्याचा Photo with Signature अपलोड करावा.
  • स्वाक्षरी स्पष्ट असावी.
  • फोटो/स्वाक्षरीच्या इमेजचा आकार 2 KB ते 100 KB असावा.

3. वैयक्तिक माहिती

  • आडनाव
  • नाव
  • वडिलांचे नाव
  • आईचे नाव
  • Gender
  • जन्मतारीख
  • आधार क्रमांक — असल्यास भरावा; नसल्यास रकाना रिकामा ठेवावा.
  • इयत्ता 7वीची Grade आणि मिळालेले टक्के.

4. सामाजिक व इतर माहिती

  • Rural/Urban
  • दिव्यांग असल्यास Yes व Disability Type
  • दिव्यांगत्वाची टक्केवारी
  • परीक्षेसाठी Writer आवश्यक असल्यास Yes
  • जात संवर्ग व Caste Name
  • EWS आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास Yes.

5. पत्ता व बँक माहिती

  • विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता
  • 6 अंकी PIN Code
  • MAT आणि SAT परीक्षेचे माध्यम
  • Bank Account असल्यास:
    • Account Number
    • IFSC Code
    • Bank Name
    • Branch
    • Branch Address

6. Family Details

  • वडिलांचे शिक्षण व व्यवसाय
  • आईचे शिक्षण व व्यवसाय
  • कुटुंबातील एकूण सदस्य
  • भाऊ व बहिणींची संख्या
  • विद्यार्थ्याचा क्रमांक
  • पालकांचा मोबाईल नंबर
  • पालकांचा Email ID
  • कुटुंबाचे उत्पन्न

7. Declaration व Submit
Declaration मध्ये विद्यार्थ्याच्या इयत्ता 7वीतील गुणांची टक्केवारी, एकूण मिळालेले गुण आणि एकूण गुण अचूक भरावेत.

त्यानंतर Preview करून संपूर्ण अर्ज तपासा. चूक असल्यास Edit करून दुरुस्ती करा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर Submit करा.

Submit केल्यानंतर विद्यार्थी Pending Payment Student List मध्ये दिसेल. त्यानंतर Make Payment मधून परीक्षा शुल्क भरावे लागेल.

अशा पद्धतीने शाळा लॉगिन वरून विद्यार्थी फॉर्म भरता येईल यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक/ वर्गशिक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

निकाल घोषित करणे

सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२७ च्या पहिल्या किंवा दुसऱया आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

अनधिकृततेबाबत इशारा

शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

NMMS Scholarship Exam Apply Online महत्वाच्या लिंक

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment