Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा रजिस्ट्रेशन करणेबाबत सूचना

NMMS Scholarship Exam Registration

NMMS Scholarship Exam Registration: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) सन २०२६-२७ E.O / E.L रजिस्ट्रेशन करणेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे.

नवीन अपडेट : NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा E.O / E.L रजिस्ट्रेशन करणेबाबत परिपत्रक

NMMS Scholarship Exam Date : सन २०२६-२७ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) दि. २० डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.

परिषदेच्या https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर शिक्षणाधिकारी (माध्य.) / शिक्षण निरीक्षक यांना ऑनलाईन E.O / E.I. लॉगीन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

सदरच्या E.O / E.I. Dashbord वरुन आपल्या जिल्ह्यातील किती शाळांनी नोंदणी केली आहे तसेच किती विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरले आहेत याची तालुकानिहाय माहिती दिसत आहे.

तरी सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्रे सुरु होण्यापूर्वी दि. २७/०८/२०२६ पर्यंत E.O / E.I. रजिस्ट्रेशन ऑनलाईन करुन घेण्यात यावे. (E.O / E.I. Login ID व Password आपल्या कार्यालयाच्या ईमेलवर पाठविण्यात आलेला आहे.)

NMMS Scholarship Exam EO EI  Login

E.O / E.I. रजिस्ट्रेशन करताना बँक खात्याची माहिती या रकान्यात कार्यालयाचे बँक खात्याची माहिती भरणे अनिवार्य आहे. वैयक्तीक बँकेची माहिती देऊ नये.

NMMS Scholarship Exam 2027 Official Website

EO/EI लॉगिन सूचना (EO/EI Login Instruction) Download Here

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2026-27 पात्रता, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती

NMMS परीक्षेसाठी ऑनलाईन E.O/E.I. लॉगिन करण्याबाबत सूचना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा – २०२६-२७ परीक्षेसाठी ऑनलाईन E.O/E.I. लॉगिन करण्याबाबत सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेसाठी E.O/ E.I लॉगिन करण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

A. E.O. / E.I. Secondary नोंदणी फॉर्म

  1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mscenmms.in संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या उपक्रम मधील E.O/ E.I Dashboard वरील E.O / E.I लॉगिन या बटनावर क्लिक करा. आपणास दिलेले LOGIN व PASSWORD टाकुन लॉगिन करा.
  2. E.O. / E.I च्या Profile Update चा मेसेज येईल. या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण Profile Update करून घ्यावी.
  3. Ε.Ο/Ε.Ι / Personal Bank Account Holder Name या रकान्यात जर कार्यालयीन बैंक खाते असेल तर त्याचे नाव नमूद करावे. अथवा खातेदाराचे नाव नमूद करावे, जेणेकरून परीक्षेचे मानधन आपल्या खात्यावर पाठविणे सोयीचे होईल.
  4. Profile Update वरील सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा.

B. EO. / El. Secondary लॉगीन

  1. Submit या बटनावर क्लिक केल्यानंतर E.O / E.I Dash Board दिसेल.
  2. सदर E.O / E.I Dash Board वर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील २०२६-२७ ची ऑनलाईन शाळा नोंदणी संख्या विद्यार्थी नोंदणी संख्या व अपेक्षित वर्ग खोल्या संख्या तालुकानिहाय दिसतील.
  3. विद्यार्थी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर यथावकाश ऑनलाईन केंद्र निश्चिती करावयाची आहे.
  4. E.O / E.I Dash Board बरोल Report या बटनावर क्लिक केल्यानंतर Dropdown मध्ये खालील प्रमाणे Report दिसतील. a. Taluka-wise Report b. School-wise Report

i. या रिपोर्ट पर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील तालुकानिहाय व माध्यमनिहाय प्रविष्ट विद्यार्थी संख्या दिसेल, सदरचे तालुके आपल्या जिल्ह्यातीलच आहेत याची खात्री करावी.

ii. प्रत्येक तालुक्याच्या पुढे Details हा पर्याय देण्यात आलेला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तालुक्यातील शाळानिहाय प्रविष्ठ विद्यार्थी संख्या दिसेल. सदरच्या यादितील शाळा त्याच तालुक्यातील आहेत याची खात्री करावी.

iii. प्रत्येक शाळेच्या पुढे Details हा पर्याय देण्यात आलेला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सदर शाळेतील प्रविष्ठ विद्यार्थी यादी दिसेल.

iv. वरील अ.क्र. १ ते २ च्या सर्व तालुकानिहाय व शाळानिहाय प्रिंट आऊट काढून घेतल्यानंतर Add Center या पर्यायावर जाऊन केंद्रनिश्चिती करण्यात यावी.

C. केंद्र निश्चित करणे.

  1. EO. / El Dash Board च्या उजव्या बाजूस असलेल्या Add Center या बटनावर क्लिक करावे. प्रथम केंद्र म्हणून निवडलेल्या शाळेचा ११ अंकी UDISE Code अचूकपणे नमूद करावा.
  2. शाळेचा ११ अंको UDISE Code नमूद केल्यानंतर SARAL वरुन आलेली (Auto generate झालेली) शाळेची सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करावी. जी माहिती आलेली नसेल अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
  3. केंद्रावरच्या एकूण ब्लॉकची संख्या अचूकपणे नमूद करा. (२४ विद्यार्थ्यासाठी एक ब्लॉक याप्रमाणे ब्लॉकची संख्या अचूकपणे नमूद करावी.)
  4. Center Location :- जिल्हा मुख्यालय जवळील केंद्र असेल तर LOCAL हा पर्याय निवडावा. जिल्हा मुख्यालय बाहेरील केंद्र असेल तर OUTSIDE हा पर्याय निवडावा.
  5. वरील सर्व माहिती योग्यरीत्या भरलेली आहे. याची खात्री करून Save या बटनावर क्लिक करावे.
  6. Save या बटनावर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर your center details saved successfully चा massage येईल. OK या बटनावर क्लिक करा.
  7. वरील प्रमाणे आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे केंद्र निश्चित करण्यात यावेत.
  8. प्रत्येक केंद्रासाठी किमान १५० व जास्तीत जास्त ९६० अपेक्षित आहेत. भौगोलिक परिस्थितीत आदिवासी विभाग यांना सदरहू संख्या शिथिलक्षम असेल.
  9. दोन तालुक्यांमध्ये एक केंद्र करताना संबंधित शाळेचे केंद्रापर्यतचे अंतर हे जास्तीत जास्त ५० ते ६० कि.मि. इतके असणे अपेक्षित आहे.

D. Center List

  1. या रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील केंद्रांची यादी दिसेल.
  2. सदरची यादी केंद्र निश्चित केल्यानंतर दिसेल.

E. School Mapping

  1. या रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील केंद्रांची यादी दिसेल.
  2. केंद्रांना शाळा जोडण्यासाठी MAP या पर्यायावर क्लिक करा.
  3. तालुका निहाय शाळा व विध्यार्थी संख्या दिसेल. शाळेस टिकमार्क केल्यानंतर केंद्राची Students Capacity दिसेल.
  4. केंद्रास जोडावयाच्या शाळेस टिकमार्क करण्यात यावे.
  5. सदर केंद्रावर शाळा जोडल्यानंतर खाली शेवटी Submit या बटनावर क्लिक करा.
  6. वरील प्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांना शाळा जोडण्यात याव्यात.
  7. आपल्या जिल्ह्यातील सर्व केंद्राचे व सर्व शाळांचे Mapping पूर्ण झाले आहे हे Confirm करूनच डॅशबोर्ड वर Submit Centre List या टॅब वर क्लिक करा.

F. Add Centre Conductor

  1. या रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील ज्या केंद्राच्या केन्द्रसंचालकाची माहिती भरावयाची आहे त्या केंद्राचे नाव (NMMS Centre) शेजारील बॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर केंद्रांची यादी दिसेल.
  2. ज्या केंद्राच्या केंद्रसंचालकाची माहिती भरायची आहे ते केंद्र निवडावे व त्या केंद्रसंचालकाची संपूर्ण माहिती भरून Submit बटनावर क्लिक करावे.

G. Centre Conductor List

  1. या रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांची यादी व सर्व केंद्राच्या केंद्रसंचालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

NMMS Scholarship Exam 2027 Official Website

EO/EI लॉगिन सूचना (EO/EI Login Instruction) Download Here

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेविषयी संपूर्ण माहिती

NMMS Scholarship Exam EO EI  Registration

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment