Seva Sankalp Abhiyan Anganwadi Upkram : राज्यात दिनांक १७ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात येणा- या “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत महिला व बाल विकास विषयक करावयाच्या कार्यवाहीबाबत महिला व बाल विकास विभागाने दिनांक ११ सप्टेंबर, २०२६ रोजी याबाबतचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात “सेवा परमोधर्म” या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे.
त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात दिनांक १७ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत “सेवा संकल्प अभियान” राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रम यादी जाहीर
सेवा संकल्प अभियान अंगणवाडी उपक्रम | Seva Sankalp Abhiyan Anganwadi Upkram
राज्यात दिनांक १७ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात येणा-या “सेवा संकल्प अभियान” मध्ये महिला व बाल विकास विषयक विविध उपक्रम / योजनाबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे, लाभार्थ्यांना विविध सेवा उपलब्ध करणे याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्यानुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अंगणवाडी उत्सव
सदर अभियानाच्या कालावधीत प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये “अंगणवाडी उत्सव” आयोजित करण्यात यावा. यामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत.
१) अंगणवाडीतील बालके, माता, किशोरवयीन मुली तसेच स्थानिक समुदायातील प्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित करण्यात यावा.
२) महिला व बाल विकास विषयक आरोग्य, पोषण व सामाजिक सुरक्षा इ. विविध योजनांची माहिती देण्यात यावी.
३) संबंधित योजनांची पात्रता, लाभाचे स्वरूप व अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात यावी.
४) बालकांसाठी वयोगटानुसार मनोरंजनात्मक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम आयोजित करणे.
५) ग्रामपंचायत, लोकसहभाग व स्थानिक स्तरावरील इतर निधीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना फळे/मिठाई याचे वितरण करणे.
६) अंगणवाडी स्तरावर तातडीने सर्वेक्षण/पडताळणी करून संभाव्य पात्र लाभार्थ्यांची माहिती घ्यावी. त्यापैकी ज्या लाभार्थ्यांना अंगणवाडीच्या माध्यमातून लाभ देय आहे, त्यांची नोंदणी व त्यांना लाभ देण्याची विहित कार्यवाही करावी. ज्या लाभार्थ्यांना महिला व बाल विकास विभागाच्या अन्य यंत्रणांमार्फत लाभ देय आहे त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात यावी.
विशेष पोषण व आरोग्य विषयक जनजागृती
१) अंगणवाडी स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या समुदाय आधारित कार्यक्रमामध्ये सहभागी सदस्यांना पोषणविषयक जनजागृती करण्यात यावी. गाव पातळीवर पोषण संकल्प करण्यात यावा.
२) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करुन किशोरवयीन मुली व महिलांसाठी रक्तक्षय तपासणी/जनजागृती उपक्रम घ्यावेत. तसेच मासिक पाळी स्वच्छता व आरोग्याबाबतची माहिती देण्यात यावी.
३) अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांना गृहभेटीमध्ये सुपोषणविषयक समुपदेशन करण्यात यावे.
४) माता व पालकांना आरोग्य व पोषणविषयक समुपदेशन; लसीकरण व बालकांच्या वाढीच्या नियमित निरीक्षणाबाबत जनजागृती; स्तनपान व पूरक आहाराबाबत मार्गदर्शन; बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांचे समुपदेशन; आरोग्यविषयक सेवांची आवश्यकता असलेल्या महिला व बालकांना संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करणे इत्यादी कार्यवाही करण्यात यावी.
अंगणवाडी – समुदाय सहयोग
१) अंगणवाडी केंद्रांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविण्यात यावा. यासाठी स्वयं-सहायता गट; CSR संस्था/उपक्रम; स्वयंसेवी संस्था; स्थानिक लोकप्रतिनिधी; महाविद्यालये; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा सहभागी करुन घेण्यात यावे.
२) महिला उद्योजक यांचा सहभाग घेण्यात यावा. प्रत्येक सहभागी संस्था/घटकांना अंगणवाडी केंद्रास शैक्षणिक साहित्य, खेळणी/खेळ साहित्य, पोषण वाटिका, डिजिटल साधने अथवा पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्यास प्रोत्साहित करावे.
बाल संरक्षण जनजागृती
सदर अभियानाच्या माध्यमातून बाल संरक्षणासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात यावी. याबाबतची जबाबदारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांची राहील. हे उपक्रम अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत व समुदायस्तरावर राबविण्यात यावेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश करावा.
१) बाल संरक्षण यंत्रणेची माहिती; २) बालविवाह प्रतिबंध; ३) बालमजुरी प्रतिबंध; ४) बालकांवरील हिंसा/अत्याचार प्रतिबंध; ५) उपलब्ध हेल्पलाईन व संदर्भ सेवा; ६) बालक व कुटुंबीयांकडून सुरक्षित पद्धतीने तक्रार नोंदविण्याबाबत माहिती.
महिला स्वयं-सहायता गट व आर्थिक सक्षमीकरण
महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी या अभियानांतर्गत महिला स्वयं सहायता गटांच्या नोंदणीसह विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून द्यावेत. त्यानुषंगाने पात्र महिलांना स्वयं सहायता गट; उपजीविका संधी; कौशल्य विकास कार्यक्रम; उद्योजकता विकास योजना; संबंधित शासकीय योजना इत्यादी बाबींशी जोडण्यासाठी अभिसरण यंत्रणा विकसित करण्यात यावी.
“आशीर्वादाचा दिवा”
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना महिला व बाल विकास आयुक्तालय / एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय / महिला आर्थिक विकास महामंडळ च्या अधिनस्त संबधित क्षेत्रिय अधिकारी यांनी गृहभेट देऊन संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी.
बदलाची गोष्ट
महिला व बालकांविषयक राबविण्यात येणा-या विविध योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदलाच्या यशोगाथा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. यासंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया नावासह व्हिडिओ द्वारे रेकॉर्ड करून संकलित करण्यात याव्यात. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हास्तरावरील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म. व बा. वि.) / जिल्हा समन्वय अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त क्षेत्रामधील संकलित झालेल्या यशोगाथांपैकी निवडक उत्कृष्ट यशोगाथांबाबतचे व्हिडिओ / रिल्स संबंधित महिला व बाल विकास आयुक्तालय / एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय / महिला आर्थिक विकास महामंडळ यांना सादर कराव्यात. त्यानुसार उत्कृष्ट यशोगाथांबाबतचे व्हिडिओ / रिल्स हे माहिती व जनसंपर्क संचालनालय व इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग यांचेकडून उपलब्ध करण्यात येणा-या प्लॅटफ़ॉर्मवर अपलोड करण्यात यावेत.
क्षेत्रीय अधिका-यांची कार्यपध्दती
१) महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना / उपक्रमाच्या अनुषंगाने सदर अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी (माविम) यांची राहील. सदर अभियानाच्या अंमलबजावणीकरिता संदर्भाधीन शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व त्यांचे निर्देशानुसार कार्यवाही करावी. अंगणवाडी केंद्रांमार्फत राबवावयाच्या उपक्रमांच्या बाबतीत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व पर्यवेक्षिका यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी आवश्यक त्या सूचना तात्काळ देऊन नियोजित कालावधीत अभियान यशस्वीपणे पार पाडण्यात येईल याबाबत पाठपुरावा करावा.
२) त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास) यांनी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व त्यांचे निर्देशानुसार कार्यवाही करावी.
३) आयुक्त, महिला व बाल विकास, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व व्यवस्थापकीय संचालिका, माविम यांनी सदर अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी व यासंदर्भात वेळोवेळी आपल्या स्तरावरून आढावा घ्यावा.
महिला व बाल विकास विभाग सेवा संकल्प अभियान उपक्रम शासन निर्णय
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०९१११४४५०१७२३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.
महिला व बाल विकास विभाग सेवा संकल्प अभियान उपक्रम शासन निर्णय डाउनलोड करा













