Adivasi Vibhag Ashram Shala Akrutibandh 2026: आदिवासी विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित शासनाच्या मंजुरीने वेळोवेळी मंजूर प्राथमिक (इ. 1 ली ते 7 वी)- 556, माध्यमिक (इ. 8 वी ते 10 वी) -519, कनिष्ठ महाविद्यालये(इ.11 वी व 12 वी) -200, अतिरिक्त प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या 200 अतिरिक्त तुकड्या मधील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निर्गमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासन निर्णय
महाराष्ट्र राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन व तसेच आवश्यकतेनुसार नवीन पदनिर्मिती प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्च स्तरीय सचिव समितीने इतिवृत्तात नमूद मान्यतेनूसार, आकृतीबंध या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात येत आहे.
सदर इतिवृत्तात नमूद केल्यानुसार, पदनाम, वेतनश्रेणी, जुनी मंजूर पदे व नव्याने निर्मित पदे यांचा आकृतीबंधानुसार मंजूर पदे याची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ) नियमित पदे
गट-क
1. माध्यमिक मुख्याध्यापक
- वेतन श्रेणी : S-17 : 47600-151100
- S-22 : 60000-190800 (वरिष्ठ श्रेणी)
- शाळांची संख्या : 519 माध्यम. विद्यालये
- सध्या मंजूर पदे : 519
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 519
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 519
2. कनिष्ठ महा. शिक्षक
- वेतन श्रेणी : S-16 : 44900-142400
- S-20 : 56100-177500 (वरिष्ठ श्रेणी)
- S-22 : 60000-190800 (निवड श्रेणी 20% पदासाठी)
- शाळांची संख्या : २०० कनिष्ठ महाविद्यालये
- सध्या मंजूर पदे : 0011
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 0011
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 1600
3. माध्यमिक शिक्षक
- वेतन श्रेणी : S-14 : 38600-122800
- S-15 : 41800-132300 (वरिष्ठ श्रेणी)
- S-17 : 47600-151100 (निवड श्रेणी 20% पदासाठी)
- एकूण माध्यमिक शाळा : 519 + 60 तुकड्या
- सध्या मंजूर पदे : २१३६
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 6010
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 2136
4. प्राथमिक मुख्याध्यापक
- वेतन श्रेणी : S-14 : 38600-122800
- S-15 : 41800-132300 (वरिष्ठ श्रेणी)
- S-17 : 47600-151100 (निवड श्रेणी 20% पदासाठी)
- प्राथमिक शाळा – 556
- सध्या मंजूर पदे : 556
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 13 (-)
- नव्याने वाढ / घट : 519
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 37
5. प्राथमिक शिक्षक
- वेतन श्रेणी : S-10: 29200-92300
- S-13: 35400-112400 (वरिष्ठ श्रेणी)
- S-14: 38600-122800 (निवड श्रेणी 20% पदासाठी)
- एकूण प्राथमिक शाळा – 556 + 140 तुकड्या
- सध्या मंजूर पदे : 1730
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 1730
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 3476
6. पदवीधर प्राथमिक शिक्षक
- वेतन श्रेणी : S-14: 38600-122800
- S-15: 41800-132300 (वरिष्ठ श्रेणी)
- S-17 : 47600-151100 (निवड श्रेणी 20% पदासाठी)
- प्राथमिक शाळा – 556
- सध्या मंजूर पदे : 556
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 550
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 556
7. पुरुष अधीक्षक
- वेतन श्रेणी : S-12 : 32000-101600
- शाळांची संख्या : 556
- सध्या मंजूर पदे : 550
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 550
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 556
8. स्त्री अधीक्षिका
- वेतन श्रेणी : S-12 : 32000-101600
- शाळांची संख्या : 556
- सध्या मंजूर पदे : 550
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 550
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 556
9. कनिष्ठ लिपिक
- वेतन श्रेणी : S-6: 19900-63200
- शाळांची संख्या : 519 माध्यम. विद्यालये
- सध्या मंजूर पदे : 505
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 505
- नव्याने वाढ / घट : 00
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 519
10. प्रयोगशाळा सहाय्यक
- वेतन श्रेणी : S-6: 19900-63200
- शाळांची संख्या : २०० कनिष्ठ महाविद्यालये
- सध्या मंजूर पदे : 0
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 611
- नव्याने वाढ / घट : 200
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 200
11. ग्रंथपाल
- वेतन श्रेणी : S-8: 25500-81100
- शाळांची संख्या : २०० कनिष्ठ महाविद्यालये
- सध्या मंजूर पदे : 0
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 611
- नव्याने वाढ / घट : 200
- आकृतीबंधानुसार मंजूर करण्यात येत असलेली पदसंख्या : 200
एकूण
- सध्या मंजूर पदे : 10474
- सुधारित संचमान्यतेनुसार अनुज्ञेय पदे : 10355
- नव्याने वाढ / घट : (-)119
- आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या : 10355
आ) मृत संवर्गातील पदे

टिप: उपरोक्त अ.क्र. 12 ते 17 रकान्यामध्ये दर्शविलेल्या पदांवरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यू इ. कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर सदर नियमित पद रद्द होईल व सदर पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेतल्या जातील.
ई) बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा

उपरोक्त परिच्छेद 2 मध्ये आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थाद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील आ) मृत संवर्गातील पदे येथे दर्शविलेल्या मृत संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य समजण्यात यावीत. अधिसंख्य त्रदविलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यूइ. कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर सदर अधिसंख्य पदे रद्द होतील व सदर पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेतल्या जातील.
तसेच ब) बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा येथे दर्शविलेल्या मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेताना वित्त विभागाच्या दि.२७.०४.२०२२ रोजीच्या शासन निर्णयांतील तसेच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची तसेच प्रशासकीय विभागाची मान्यता घेण्याची दक्षता घ्यावी.
सदर शासन निर्णय हा मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि. 04.06.2026 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास अनुसरुन व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौस आपुक-199/2026, दि.28.07.2026 अन्वये दिलेल्या सहमतीने व मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202608071849350724 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी: आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासन निर्णय डाउनलोड करा















