Drought Affected Students Examination Fees Waived 2026 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अवर्षणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. मात्र यासाठी 5 अटी व शर्ती पूर्ण असणे आवश्यक आहे. या लेखात त्या 5 अटी व शर्ती आणि सुधारित दुष्काळ ग्रस्त तालुक्यांची यादी GR PDF लिंक दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 परीक्षा शुल्क माफीसाठी 20 लाखांहून अधिक निधी मंजूर
३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या GR नुसार, अवर्षणग्रस्त व दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या संबंधित परीक्षांचा खर्च एकूण २० लाख ३८ हजार ६३० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या चालू खात्यातून हा खर्च अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे परीक्षा शुल्काचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, या सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या 5 अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क माफीसाठी 5 महत्वपूर्ण अटी व शर्ती
अवर्षण / दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे.
- जे विद्यार्थी त्याच परीक्षेला दुसऱ्यांदा किंवा पुनर्प्रविष्ठ (Repeater) म्हणून बसले असतील आणि ज्यांना इतर योजनेतून १००% लाभ मिळत असेल, त्यांना दुहेरी लाभ दिला जाणार नाही.
- ज्या विद्यार्थ्यांनी बहिःस्थ (External) म्हणून नोंदणी केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर सवलत अनुज्ञेय असणार नाही.
- ज्या विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष शहरात राहून नोकरी/धंदा करतात, परंतु त्यांच्या नावावर गावामध्ये शेतजमीन आहे, अशा विद्यार्थ्यांना सदर सवलत अनुज्ञेय असणार नाही.
- कला परिसंस्थांकडून परीक्षा शुल्क माफ करण्याच्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव मागविण्यात यावेत. प्राप्त प्रस्तावातील प्रमाणित माहिती, योजनेचे निकष व पात्रता यांची सखोल तपासणी करुनच परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कार्यवाही करावी.
- शिष्यवृत्ती पडताळणी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या मागासवर्गीय अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधीच ५०% किंवा १००% परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची माहिती कला परिसंस्थांकडून मागविण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांना ५०% लाभ मिळाला आहे, त्यांना उर्वरित ५०% रकमेची माफी देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला लाभाची द्विरुक्ती होणार नाही.
पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक दिलासा
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
संबंधित कला संस्थांनी विद्यार्थ्यांची पात्रता, योजनेचे निकष आणि यापूर्वी मिळालेल्या शुल्क माफीच्या लाभाची पडताळणी करून आवश्यक प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. शासनाने निश्चित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ शासन निर्णय PDF
मदत व पुनर्वसन विभागाने सन २०२६ च्या खरीप हंगामात राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यात दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर दुष्काळी तालुक्यांची संख्या अंतिमतः ३०४ इतकी निश्चित करण्यात आली. या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आणि सवलतींच्या अनुषंगाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याच धर्तीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही सवलत लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात शासनाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
- दुष्काळग्रस्त भागातील उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीचा शासन निर्णय डाउनलोड करा
- दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी शासन निर्णय डाउनलोड करा


Related
YCMOU दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा; ऑनलाइन अर्जासाठी 7 कागदपत्रे आवश्यक










