Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ; सुधारित 305 तालुक्यांची यादी व शासन निर्णय PDF लिंक या लेखात दिली आहे.

SSC HSC Exam 2027 Fee Waiver

SSC HSC Exam 2027 Fee Waiver : महाराष्ट्र शासनाने सन 2026 च्या खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) आणि Trigger-2 (दुसरी कळ) लागू झालेल्या अशा एकुण 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील यातून सूट मिळाली आहे. सुधारित 305 तालुक्यांचा शासन निर्णय PDF लिंक या लेखात दिली आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

ssc hsc exam fee maf

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या निर्देशानुसार, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, राज्य शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचाही समावेश आहे.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य मंडळाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ

या निर्णयाचा लाभ फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्र भरून घेताना सध्या परीक्षा शुल्क आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही कार्यवाही सुरू ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांची यादी

SSC HSC Exam 2027 Fee Waiver gr

हे ही वाचा : 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam 2027 Fee Waiver gr 2
SSC HSC Exam 2027 Fee Waiver gr 3
SSC HSC Exam 2027 Fee Waiver gr 4

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना

राज्य मंडळाच्या निर्देशानुसार, विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात.

तसेच, परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा शुल्क माफीबाबत पुढील सूचना

या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील सविस्तर सूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क माफीची अंमलबजावणी, पात्रतेचे निकष आणि पुढील प्रक्रिया याबाबत मंडळाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

SSC HSC Exam 2027 Fee Waiver Circuler

दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांची यादी शासन निर्णय PDF

सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) आणि Trigger-2 (दुसरी कळ) लागू झालेल्या 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत शासन निर्णय PDF डाउनलोड करा

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांची Trigger-1 यादी शासन निर्णय PDF डाउनलोड करा

हे ही वाचा: MHT CET आणि बारावीच्या गुणांवर ठरणार गुणवत्ता यादी; इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशासाठी समिती गठित

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment