Ananddayi Shanivar Upkram: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार २१ व्या शतकातील कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी संपादन करून एक सुजाण व उत्पादक नागरिक घडविण्यासाठी शालेय शिक्षणात “आनंददायी शनिवार” या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.
दि. १४ मार्च २०२४ च्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या शासनमान्य सर्व शाळांमध्ये “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नवीन अपडेट: आनंददायी शनिवार उपक्रम दि ४ ते ५/९/२०२६ रोजी आयोजित करणेबाबत, उपक्रम यादी
Table of Contents
आनंददायी शनिवार उपक्रमाची भूमिका व उद्देश
- विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे.
- शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे.
- विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक व संभाषण कौशल्य विकसित करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.
- विविध सण व उत्सवांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जोपासना करणे.
या उपक्रमाची भूमिका व उद्देश साध्य करण्यासाठी “आनंददायी शनिवार कृतिपुस्तिकेत” अनेक मार्गदर्शक कृती देण्यात आलेल्या आहेत.
याच उपक्रमाचा भाग म्हणून खाली दिलेल्या नियोजनानुसार शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रमांचे आयोजन करण्यास सूचित करण्यात आले आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हस्तकला, स्थानिक कौशल्य, पर्यावरणस्नेही दृष्टिकोन तसेच राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देण्यात यावी.
आनंददायी शनिवार उपक्रम यादी
आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल.

- प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे
- आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
- दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
- स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
- रस्ते सुरक्षा
- समस्या निराकरणाची तंत्रे
- कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
- Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
- नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य
वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.
आनंददायी शनिवार उपक्रम क्विज
आनंददायी शनिवार उपक्रम संदर्भात 5 प्रश्न सोडवा, प्रश्न आणि त्या खाली दिलेला एक पर्याय निवडा त्यानंतर NEXT करा या पद्धतीने 5 प्रश्न सोडवा आणि शेवटी प्रश्नांचे उत्तरासहित Result पाहा.
आनंददायी शनिवार उपक्रम कृती पुस्तिका
शिक्षकांना शाळास्तरावर उपक्रमाची अंमलबजावणी करणे सुलभ होण्याकरिता मार्गदर्शक म्हणून “आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका” विकसित करण्यात आलेली आहे. ही कृतिपुस्तिका परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका PDF डाउनलोड करा
आनंददायी शनिवार शासन निर्णय डाउनलोड करा
आनंददायी शनिवार उपक्रमांचे वेळापत्रक
१. ऑगस्ट २०२६
- उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा: २२/८/२०२६
- सादरीकरण/प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार: २२/८/२०२६
- उपक्रमाचे नाव: उपलब्ध साधनांचा उपयोग करून आकर्षक राखी तयार करणे व जवानांना पाठवणे.
- यामुळे विकसित होणारे गुण: कृती कौशल्य, नवनिर्मिती, देशप्रेम इ.
२. सप्टेंबर २०२६
- उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा: ४ ते ५/९/२०२६
- सादरीकरण/प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार: ५/९/२०२६
- उपक्रमाचे नाव: शाडू मातीपासून विविध प्राण्यांच्या मूर्ती तयार करणे.
- उदाहरणे: बैल, कासव, ससा, हरीण इ.
- या मूर्तींचा उपयोग विविध सणांसाठी करता येईल.
- यामुळे विकसित होणारे गुण: कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरणस्नेह इ.
३. सप्टेंबर २०२६ — शिक्षक दिन
- उपक्रमाचा कालावधी: ५/९/२०२६
- सादरीकरण/प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार: ५/९/२०२६
- उपक्रमाचे नाव: शिक्षक दिन साजरा करणे.
- यामुळे विकसित होणारे गुण: नवनिर्मिती, आदर, शाळेविषयी प्रेम इ.
४. सप्टेंबर २०२६
- उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा: ७/९/२०२६ ते ११/९/२०२६
- सादरीकरण/प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार: १२/९/२०२६
- उपक्रमाचे नाव: शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती तयार करणे.
- या मूर्तींचा उपयोग विविध सणांसाठी करता येईल.
- यामुळे विकसित होणारे गुण: कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरणस्नेह इ.
५. ऑक्टोबर २०२६
- उपक्रम कोणत्या कालावधीत आयोजित करावा: २६/१०/२०२६ ते ३०/१०/२०२६
- सादरीकरण/प्रदर्शनासाठी संबंधित शनिवार: ३१/१०/२०२६
- उपक्रमाचे नाव:
- मातीचे दिवे तयार करणे.
- विविध वस्तूंपासून आकाशकंदील तयार करणे.
- किल्ले-दुर्ग यांच्या प्रतिकृती तयार करणे.
- या वस्तूंचा उपयोग विविध सणांसाठी करता येईल.
- यामुळे विकसित होणारे गुण: कृती कौशल्य, नवनिर्मिती, पर्यावरणस्नेह इ.
अंमलबजावणीबाबत सूचना
संबंधित उपक्रम आपल्या अधिनस्त सर्व शाळांमध्ये राबविण्याबाबत सूचना देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे व अहवाल याबाबत प्रस्तुत परिषदेस मेल करावा. सदर उपक्रमांना समाजमाध्यमाद्वारे व स्थानिक वृत्तपत्रामार्फत व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी. असे आवाहन SCERT Pune कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा.












