Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा; ऑनलाइन अर्जासाठी 7 कागदपत्रे आवश्यक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून (YCMOU Nashik) दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा मिळणार, यासाठी ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक 7 कागदपत्रांची यादी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या लेखात दिली आहे.

YCMOU Drought Affected Students Exam Fee Refund

YCMOU Drought Affected Students Exam Fee Refund : सन 2026 च्या खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील शालेय शिक्षण, महाविद्यालय तसेच विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. नुकतेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU Nashik), पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा (Exam Fee Refund) देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. या लेखात आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात विभागीय केंद्रांना पत्र पाठविले आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीअंतर्गत भरलेल्या शुल्काचा परतावा (YCMOU Exam Fee Refund) देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क परताव्यासाठी 7 कागदपत्रे आवश्यक

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सुविधेद्वारे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सादर करण्यासाठी ती तयार ठेवावीत. यासाठी खालील 7 कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  1. नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक : विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना नोंदविलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.
  2. प्रवेश शुल्काची पावती : विद्यापीठात प्रवेश घेताना भरलेल्या प्रवेश शुल्काची पावती.
  3. उत्पन्नाचा दाखला : संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला.
  4. रहिवासी दाखला : विद्यार्थ्याचा रहिवासी असल्याचा दाखला.
  5. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा Cancelled Cheque : बँक खातेदाराचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल अशी प्रत आवश्यक आहे.
  6. आधार कार्डची प्रत : विद्यार्थ्याच्या आधार कार्डची प्रत.
  7. पॅन कार्ड : विद्यार्थ्याच्या पॅन कार्डची प्रत.

हे ही वाचा: YCMOU गृहपाठ (Home Assignment) वेळापत्रक जाहीर, Student Login Online Submission संपूर्ण माहिती

ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यापीठामार्फत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पद्धत आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच अर्ज भरण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर आवश्यक माहिती व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावीत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदतीबाबतची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासाव्यात.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा मिळाल्यास आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवणे महत्त्वाचे आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://ycmou.ac.in/

YCMOU Drought Affected Students Exam Fee Refund
YCMOU Drought Affected Students Exam Fee Refund Circuler

Related
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; 5 अटी व शर्ती जाहीर
दहावी-बारावी परीक्षा फी परत कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment